' ४० फुटी आंब्याच्या झाडाची, एकही फांदी न कापता बांधलेल्या, ४ मजली घराची गोष्ट

४० फुटी आंब्याच्या झाडाची, एकही फांदी न कापता बांधलेल्या, ४ मजली घराची गोष्ट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ट्री हाऊस ही संकल्पना काही नवीन नाही. ही “ट्री हाऊस” म्हणताना साधारणपणे एक किंवा दोन खोल्यांची घरं डोळ्यासमोर येतात, मात्र उदयपूर येथील एक ट्री हाऊस हे खर्‍या अर्थानं हाऊस आहे. इथे एक दोन खोल्याच नाहीत तर चक्क चार मजले आहेत. संपूर्णपणे पर्यावरणअनुकूल असं हे घर चाळीस फूट उंचीच्या आंब्याच्या डेरेदार वृक्षावर तोललेलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

उदयपूर येथील प्रदीप सिंह यांचं हे घर असून याचं वैशिष्ट्य हे आहे, की ते बांधण्यासाठी सिमेंटचा वापर केलेला नाही. झाडाला कमीत कमी हानी होईल याची सर्वतोपरी काळजी घेत या वृक्षावर हे चार मजली घर बांधलं गेलं आहे. या घरात दोन बेडरूम, एक स्वयंपाकघर, एक ग्रंथालय आणि बैठकीची खोली आहे.

 

tree house inmarathi

 

हे अनोखं ट्री हाऊस ज्या भागात आहे तो परिसर फळझाडांसाठी परिचित आहे. अनेक प्रकारची ४ हजारांहून जास्त फळझाडं या परिसरात असल्यानं त्यांच्या संवर्धनाकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं जातं असे, मात्र जसजशी लोकसंख्या वाढू लागली, रहात्या घरांची मागणी वाढू लागली तशी झाडं तोडली जाऊ लागली.

प्रदीप सिंह यांना या वृक्षतोडीचं फार दु:ख होत असे. म्हणूनच जेव्हा ट्री हाऊस बांधण्याची कल्पना आली, तेव्हा झाडाला धक्का न पोहोचविता पर्यावरणअनुकूल असं घर कसं बांधता येईल यावर बारकाईनं विचार करण्यात आला.

प्रदीप सिंह उदयपूरमधे जागेच्या शोधात असताना प्रॉपर्टी डिलरनं त्यांना अशा अनेक जागा दाखविल्या जिथे झाडं होती मात्र इमारत बांधण्यासाठी ती कापावी लागणार होती. प्रदीप सिंह यांनी पसंत पडलेल्या जागेवरील वृक्ष मुळापासून काढून ते इतरत्र पुन्हा लावण्याची कल्पना प्रॉपर्टी डिलरकडे मांडली, मात्र त्याने यातील वेळ आणि खर्च सांगत काढता पाय घेतला.

आता प्रदीप सिंह यांनी याकडे एक आव्हान म्हणून पाहिले आणि झाड न तोडता त्याचा आधार घेत घर कसं बांधता येईल? यावर विचार सुरु केला. एका वास्तुकाराच्या मदतीनं सिंह यांनी स्वत:च घराचं डिझाईन बनविलं. ज्यावेळेस हे घर बांधण्यास सुरवात केली, तेव्हा या आंब्याच्या झाडाची उंची २० फूट होती.

 

tree house inmarathi1

 

सुरवातीला दोन मजली घर बांधण्याची कल्पना कागदावर उतरविली गेली. गेल्या दहा बारा वर्षात या झाडाची उंची वीस फ़ुटांवरून चाळीस फ़ूट इतकी झाली आणि सिंह यांनी दोन मजल्यांवर आणखिन दोन मजले चढवत चारमजली घर बनविलं आहे.

या घराचा डोलारा एका स्टीलच्या सांगाड्यानं तोलला आहे. जमिनीपासून नऊ फ़ुटांवर हे घर बांधण्यात आलं आहे. घराच्या भिंती आणि जमीन सेल्युलोज शिट आणि फ़ायबर यापासून बनविण्यात आलेल्या आहेत.

झाडाच्या चारही बाजूने चार स्तंभ उभे करण्यात आले आहेत जे पावसाळ्यात वीज पडण्यापासून संरक्षण करतात. झाडाच्या फ़ांद्या घरामधून फिरलेल्या आहेत. एकही फ़ांदी न कापता घर बांधलेलं असल्यानं प्रत्येक खोलीत झाडाच्या फ़ांद्या आहेत मात्र या फ़ांद्याचा वापर फ़र्निचर म्हणून मोठ्या खुबीनं करण्यात आलेला आहे.

 

tree house inmarathi2

 

झाडाची नैसर्गिक वाढ रोखलेली नसल्यानं या फ़ांद्या सतत वाढत असतात आणि आकार बदलत असतात. त्यामुळे घरातल्या अंतर्गत रचनेतही सातत्यानं बदल करावे लागतात. चौथ्या मजल्यावरचं छत झाडाच्या फ़ांद्या आणि मोकळं आकाश बघता येईल अशा प्रकारे आणि उघडझाप करता येण्याजोगं बनविण्यात आलेलं आहे.

अशा या अनोख्या घराची दखल लिम्का बुक ऑफ़ रेकॉर्डनं घेतलेली असून पर्यटकांचं आकर्षण बनलं आहे. या झाडावर निवासाला असणारे पक्षी आणि प्राणीही या घरात मुक्त संचार करत असतात. त्यांच्या वावरावर कसलेही निर्बंध आणलेली नसल्यानं हे ट्री हाऊस खर्‍या अर्थानं निसर्गाच्या कुशीतलं मानवी घरटं आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?