' या सुंदर तरुणी “थप्पड” खायला सहज तयार होतात; कारण… – InMarathi

या सुंदर तरुणी “थप्पड” खायला सहज तयार होतात; कारण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण कुठेही गेलो तरी पाहणाऱ्याला प्रथमदर्शनी आपल्यातली जी गोष्ट दिसते ती म्हणजे आपला चेहरा. आपलं व्यक्तिमत्त्व पाहिलं जातंच पण आपल्या एकूण व्यक्तिमत्त्वाला न्याहाळलं जाण्याआधी पटकन लक्ष वेधून घेतो तो आपला चेहरा.

मग ते आपलं कामाचं ठिकाण असो, मित्रमैत्रिणींना भेटायला जाणं असो किंवा समारंभांना जाणं असो. चेहऱ्याकडे अधिक लक्ष देणं, चेहऱ्याचं सौंदर्य टिकवणं, ते वाढवणं या गोष्टी आपण सगळेच, विशेषतः बायका पिढ्यानपिढ्या अनेक वर्षे करत आलेलो असतो.

 

face tips IM

 

अगदी माफक खर्चातल्या उपायांपासून ते अत्यंत महागड्या उपायांपर्यंत सगळ्या प्रकारचे उपाय आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी उपलब्ध आहेत हे आपल्याला माहितीये. पण चेहऱ्याचं सौंदर्य वाढवायला चेहऱ्यावर चापट्या मारून घ्या असं जर कुणी आपल्याला सांगितलं तर आपण त्या माणसावर हसू. समोरच्याला वेड्यात काढू.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘हे असं कधी असतं का’ असं म्हणू. पण ऐकायला आणि वाचायला कितीही विचित्र वाटलं, बुचकळ्यात टाकणारं वाटलं तरी हे खरं आहे.

चेहऱ्यावर चापट्या मारून चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्याची एक खरीखुरी थेरपी अस्तित्त्वात आहे. या थेरपीला ‘स्लॅप थेरपी’ असं म्हटलं जातं. एका विशिष्ट प्रकारे चेहऱ्यावर चापट्या मारून या थेरपीद्वारे महिलांच्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढवलं जातं.

‘दक्षिण कोरियातली’ ही थेरपी अमेरिकेतही फार लोकप्रिय झाली आणि आता ती हळूहळू जगभरात लोकप्रिय होते आहे. या थेरपीत एक दक्षता मात्र घ्यावी लागते. तुम्हाला चेहऱ्यावर जोराजोरात चापट्या मारायच्या नसतात. कुठल्याही प्रकारे तुम्हाला दुखणार नाही अशा पद्धतीने या थेरपीत चेहऱ्यावर हळुवारपणे चापट्या मारल्या जातात.

 

slap therapy IM

 

एका विशिष्ट प्रकारे खालून वर आणि गोलाकार पद्धतीने या चापट्या चेहऱ्याला मारल्या जातात. चेहऱ्याची काळजी घ्यायला आपण जे स्किनकेअर प्रॉडक्ट्स वापरतो ते चेहऱ्याला आधी लावून मग हळूहळू चेहऱ्याला चापट्या मारायच्या असतात.

दक्षिण कोरियातल्या महिला आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी अशा प्रकारे चेहऱ्याला रोज ५० चापट्या मारतात. दक्षिण कोरियातल्या केवळ महिलाच नाही तर पुरुषही स्वतःच्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी ही थेरपी घेतात.

मोठ्या प्रमाणावर महिला ही थेरपी घेतात कारण त्यामुळे त्यांचे बऱ्यापैकी पैसे वाचतात. या थेरपीमुळे दीर्घकाळ त्वचा तरुण राहते त्यामुळे याला ‘अँटी एजिंग थेरपी’ असंही म्हटलं जातं. या ‘स्लॅप थेरपी’मुळे बरेच फायदे होतात. त्यापैकी हे ५ मुख्य फायदे :

१. चेहऱ्याचं रक्ताभिसरण वाढायला मदत –

‘स्लॅप थेरपी’मुळे चेहऱ्यावरची जी बारीक बारीक छिद्रं असतात ती कमी व्हायला, बुजायला मदत होऊन त्वचा नितळ रहायला मदत होते. एका विशिष्ट पद्धतीने चेहऱ्यावर चापट्या मारून घेतल्याने चेहऱ्याच्या पेशी सक्रिय होऊन चेहऱ्याचं रक्ताभिसरण वाढायला मदत होते.

 

slap therapy IM 2

 

धूळ, प्रदूषणामुळे चेहरा खराब करणारे जे अपायकारक,विषारी घटक कळत- नकळतपणे चेहऱ्यात साचत जातात ते निघून जायला, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या निघून जायला आणि चेहऱ्यावरील त्वचेच्या समस्यांपासून आपल्याला दूर ठेवायला या थेरपीची मदत होते.

२. कुठलेही साईड-इफेक्ट्स होत नाहीत –

ही अशी नामी थेरपी आहे की जी कुठल्याही केमिकल्सशिवाय होते. एरव्हीच्या थेरपीजमुळे आपल्याला जरी फायदा होत असला तरी त्यातल्या केमिकल्समुळे आपल्यावर त्याचे साईड-इफेक्ट्स होण्याची शक्यता असते. ते केमिकल्स आपल्या चेहऱ्याला चालतील – न चालतील याची आपल्याला शाश्वती देता येत नाही. पण ‘स्लॅप थेरपी’त असे कुठलेच केमिकल्स नसल्याने साईड-इफेक्ट्स होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

३.. तुमची त्वचा अधिक मऊ-मुलायम आणि निरोगी होते –

या थेरपीमुळे चेहऱ्याचं रक्ताभिसरण वाढल्यामुळे तुमची त्वचा आधीपेक्षा अधिक निरोगी आणि मुलायम होते.

 

therapy 2 IM

 

हा असा परिणाम हवा असतो म्हणून महिला मोठाले खर्च करून वेगवेगळ्या सर्जरी करतात. पण या थेरपीमुळे तुम्हाला चेहऱ्यावर कुठल्याही सर्जरीज करायची आवश्यक्ता उरत नाही.

४. चेहऱ्याला लावलेले क्रीम्स शोषून घेतले जायला मदत –

आपण चेहऱ्याचं सौंदर्य टिकवायला जे क्रीम्स लावतो, सेरम लावतो, मॉइश्चरायझर वापरतो, जी वेगवेगळी तेलं लावतो ती अशीही आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य खुलवायला उपयोगी पडतातच.

ही सगळी प्रसाधनं, तेलं लावण्याच्या बरोबरीने आपण जर त्यासोबत एका विशिष्ट प्रकारे चेहऱ्याला चापट्या मारल्या तर ती क्रीम्स आणि तेलं चेहऱ्याच्या आत अधिक चांगल्या प्रमाणात शोषून घेतली जायला आणि पर्यायाने चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलायला मदतच होते.

५. चेहऱ्याच्या स्नायूंना आराम मिळायला मदत होते आणि चेहरा बारीक दिसतो –

या ‘स्लॅप थेरपीत’ कुठल्याही प्रकारे चेहऱ्याला दुखणार नाही याची काळजी घेऊन हळुवारपुणे चेहऱ्याला चापट्या मारल्या जातात. त्यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंना आराम मिळायला या थेरपीमुळे मदत होते. याचबरोबरीने या ‘स्लॅप थेरपी’मुळे आपला चेहरा आहे त्यापेक्षा बारीक दिसायला मदत होते.

 

slap therpay 2 IM

 

चेहरा उगीचच फुगीर फुगीर वाटत असेल तर नियमितपणे ही थेरपी घेतल्याने तो फुगीरपणा जाऊन चेहरा छान बारीक दिसतो.

हे सगळे फायदे जाणून घेऊनही ज्यांची चेहऱ्याची त्वचा फार नाजूक आहे त्यांनी शक्यतो हे करणं टाळावं. कधी कधी आपल्या डोक्यातसुद्धा येणार नाहीत अशा आपल्याच फायद्याच्या असणाऱ्या इतक्या विचित्र गोष्टी जगात असतात. माणसालाच जरी या गोष्टी अजब वाटत असल्या तरी कुठल्यातरी माणसानेच त्याची सुरुवात केलेली असते.

अनेकांना अजब वाटणारी एखादी अशी कल्पना कुण्या एकाच्याच डोक्यातून बाहेर आलेली असते आणि बघता बघता तिचा ट्रेंड होऊन ती अनेकांची होते. ‘स्लॅप थेरपी’ या अजब थेरपीबाबत असेच काहीसे म्हणावे लागेल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?