' बापरे: 'बाबा वंगा' यांनी २०२२ सालाबाबत केलेल्या या भविष्यवाण्या वाचून घाम फुटेल

बापरे: ‘बाबा वंगा’ यांनी २०२२ सालाबाबत केलेल्या या भविष्यवाण्या वाचून घाम फुटेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

२०२१ संपायला अगदी काहीच दिवस उरलेत आणि २०२२ हे वर्ष अगदी जवळ आले आहे. कोरोना आणि इतर नैसर्गिक/मानवनिर्मित आपत्तींमुळे गेली दोन वर्षे खूप खराब गेली. त्यामुळे आता येणारे नवीन वर्ष तरी चांगले जावे आणि जगावर आलेली सगळी संकटे दूर व्हावीत अशीच आशा सगळे करत आहेत.

आपल्यापैकी बरेच लोक भविष्य आणि ज्योतिष्य यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे आवर्जून कॅलेंडर , वर्तमानपत्र आणि मासिकांमध्ये आलेले आपले राशिभविष्य वाचतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

प्रत्येकाला हीच अपेक्षा असते की जे झाले ते झाले, पण आता निदान येणारे वर्ष तरी आपल्याला व आपल्या कुटुंबाला चांगले जावे. म्हणूनच आपण सर्वजण नवीन वर्षाचे मोकळेपणाने स्वागत करण्यास उत्सुक असतो. जेणे करून नव्या वर्षाची सुरुवात उत्साहात, आनंदात, चांगल्या पॉझिटिव्ह नोटवर व्हावी व संपूर्ण वर्ष चांगले जावे.

माणसाला भविष्याची नेहमीच उत्सुकता असते. म्हणूनच जर कुणी जगाविषयी भविष्यवाणी करत असेल तर आपले लक्ष त्याकडे वेधले जातेच. नुकतीच बल्गेरियातील बाबा वंगा यांनी २०२२ बद्दल धक्कादायक भविष्यवाणी केली आहे.

 

baba vanga inmarathi1

 

‘बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस’ या टोपणनावाने ओळखल्या जाणार्‍या बाबा वंगा या दृष्टिहीन ज्योतिषींनी त्यांच्या भविष्यवाण्यांद्वारे इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवली आहे. त्यांनी यापूर्वी ९/११ आणि ब्रेक्झिट संकटाचे अचूक भाकीत केले होते.

व्हेंजेलिया गुश्तेरोवा उर्फ बाबा वंगा यांनी वयाच्या १२ व्या वर्षी त्यांची दृष्टी गमावली आणि त्याच वेळी असा दावा केला, की देवाकडून त्यांना भविष्य बघण्याची देणगी मिळाली.

सोव्हिएत युनियनचे विघटन, २००१ साली झालेला ११ सप्टेंबरचा हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू आणि चेरनोबिल आपत्ती याबद्दल त्यांची भाकिते खरी ठरली आहेत.

१९९६ साली वयाच्या ८५ व्या वर्षी मृत्यूपूर्वी त्यांनी २०२२ बद्दल धक्कादायक भविष्यवाणी केली होती. त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी ५०७९ पर्यंतच्या भविष्यवाण्या करून ठेवल्या आहेत. त्यांच्या भाकिताप्रमाणे ५०७९ मध्ये जगाचा अंत होईल.

वाढते तापमान व टोळधाड

बाबा वंगा यांच्या म्हणण्यानुसार, २०२२ साली भारतातील तापमान ५०0 सेल्सिअसपेक्षा जास्त होईल ज्यामुळे पिके आणि शेतीवर टोळधाड होऊ शकेल आणि त्यामुळे दुष्काळ पडेल.

पाण्याची कमतरता

बाबा वंगा यांनी असेही भाकीत केले, की २०२२ मध्ये जगातील मोठ्या शहरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू शकेल. नद्यांच्या प्रदूषणामुळे स्वच्छ पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल.

वाढता स्क्रीन टाइम

 

mobile number dialing inmarathi

 

 

गेली दोन वर्षे वर्क फ्रॉम होम, लॉकडाऊन मुळे आपला तसाही स्क्रीन टाइम खूप वाढला आहे. दिवस दिवस आपले डोळे लॅपटॉप, टीव्ही किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर खिळून असतात. बाबा वंगा ह्यांनी असे भाकीत केले आहे, की २०२२ मध्ये आपला स्क्रीन टाइम नेहमीपेक्षा जास्त वाढेल. यामुळे लोकांचे मानसिक आरोग्य ढासळेल.

नव्या प्राणघातक विषाणूचे संकट

 

baba vanga inmarathi

 

बाबा वंगा यांच्या भाकितानुसार संशोधकांच्या एका गटाला सायबेरियामध्ये एक प्राणघातक विषाणू सापडेल जो आतापर्यंत गोठलेला होता. ग्लोबल वॉर्मिंमुळे हिमनद्या वितळत आहेत. त्यामुळे आजवर गोठलेल्या स्थितीत असलेला हा विषाणू आता सगळीकडे पसरू शकेल आणि त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.

नैसर्गिक आपत्ती

बाबा वंगा ह्यांच्या मते, २०२२ मध्ये जगाला भूकंप आणि सुनामीचा धोका वाढेल. हिंदी महासागरातील भूकंपानंतर एक मोठी त्सुनामी येईल. या त्सुनामीचा धोका ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया, भारत ह्या देशांच्या किनारी भागाला आहे. या त्सुनामीमुळे शेकडो लोकांचे प्राण जातील.

एलियन अटॅक

 

alien stone painting inmarathi

 

वंगा यांनी दावा केला आहे, की परग्रहवासी पृथ्वीवरील जीवनाचा शोध घेण्यासाठी ‘ओमुअमुआ’ नावाचा लघुग्रह पाठवतील आणि नंतर कदाचित ते पृथ्वीवर हल्ला करतील.

हे भविष्य वाचून पोटात गोळा आला नाही तरच नवल! पण देव करो आणि ह्यापैकी काहीही न घडो व येणारे वर्ष आपल्या सर्वांनाच सुख समाधानाचे, आनंदाचे व उत्तम आरोग्याचे जावी हीच देवाकडे प्रार्थना!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?