' गरजेपेक्षा जास्त प्रोटीन शेकचं सेवन करताय? हे गंभीर परिणाम वाचून नक्कीच सवय बदलाल – InMarathi

गरजेपेक्षा जास्त प्रोटीन शेकचं सेवन करताय? हे गंभीर परिणाम वाचून नक्कीच सवय बदलाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण सगळेच हल्ली फिटनेसबाबत प्रचंड जागरूक असतो. पण आपल्यातले काही जण इतरांपेक्षा अधिक सुदृढ असावं आणि दिसावं यासाठी कसून मेहनत घेतात. मग त्यासाठी जे जे म्हणून आवश्यक आहे ते करायची आपली तयारी असते. त्यासाठी आपण आपल्या रोजच्या आहारातल्या अन्नघटकांव्यतिरिक्त बाहेरूनही अधिकची पोषकमूल्ये मिळवतो. ‘

प्रोटीन शेक’ हा असाच एक पदार्थ आहे. सर्वसाधारणपणे धावपटू हा प्रोटीन शेक घेतात. पण केवळ धावपटूंपुरतंच प्रोटीन शेक घेणं मर्यादित नाहीये तर ज्यांना ज्यांना आपले स्नायू बळकट करायचे असतात, ते छान मोठे दिसावे असं वाटत असतं असे अनेक जण ‘प्रोटीन शेक’ घेतात.

 

protein shake inmarathi
eat this, not that

 

ज्यांना वजन वाढवायचं असतं आणि ज्यांना ते कमी करायचं असतं अशा दोघांनाही ‘प्रोटीन शेक’चा उपयोग होतो. पण कुठल्याही गोष्टीचं आपण गरजेपेक्षा जास्त प्रमाणात सेवन करत असू तर ते धोक्याचंच असतं. अगदी ‘प्रोटीन शेक’ही याला अपवाद नाही. ‘प्रोटीन शेक’च्या अतिरिक्त सेवनामुळे हे ९ गंभीर परिणाम होऊ शकतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. वजन वाढू शकतं –

‘प्रोटीन शेक’ ही रोजच्या रोज घ्यायची गोष्ट नाही. जशा तुम्हाला कॅलरीज बर्न कराव्या लागतात तसेच जर आत घेतलेले प्रोटिन्स बर्न झाले नाहीत तर वजन वाढू शकतं. त्यामुळे गरज नसताना उगीचच जर तुम्ही ‘प्रोटीन शेक’ घेतलात तर तुमचं वजन वाढेल. जर तुम्ही प्रोटीन पावडर घेत असाल तर काही काही प्रोटीन पावडरमध्ये अतिरिक्त प्रमाणात साखर असते आणि केवळ साखरेमुळेच नाही तर त्यातल्या जास्तीच्या प्रोटिन्समुळेसुद्धा तुमचं वजन वाढू शकतं.

 

weight loss inmarathi

 

२. किडनीवर होणारा परिणाम –

असं म्हणतात की, शरीरातलया प्रथिनांचं पचन होत असताना त्यातलं जे काही अनावश्यक असतं ते बाहेर टाकायला किडनीला खूप मेहनत घ्यावी लागते. या प्रक्रियेत किडनीवर खूप भार येतो. ज्यांची किडनी निरोगी आहे त्यांनी योग्य प्रमाणात ‘प्रोटीन शेक’ घ्यायला काही हरकत नाही. पण ज्यांना किडनीची समस्या आहे त्यांनी ‘प्रोटीन शेक सप्लिमेंट’ घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

kidney inmarathi

 

३. बाकी पोषकमूल्यांकडे दुर्लक्ष होऊ शकतं –

सुदृढ असलेल्या माणसांनी २० ते ३० ग्रॅम्स प्रोटीन असलेला एक ‘प्रोटीन शेक’ दिवसाभरात घ्यायला हरकत नाही. पण जर अतिरिक्त प्रोटिन्स घेत राहिलं आणि शरीराला आवश्यक असणारे बाकी सिग्ध घटक, तंतूमय घटक, पिष्टमय पदार्थ,फळं, भाज्या पोटात जात नसतील तर ते योग्य नाही.

 

fruits and green leafy vegetables InMarathi

 

४. नैसर्गिकरित्या प्रथिनं असलेले पदार्थ खायची सवय सुटू शकते –

‘प्रोटीन शेक’ पूरक पदार्थ म्हणून शरीरासाठी चांगला आहे. पण मुळात ज्या पदार्थांमध्ये नैसर्गिकपणे प्रथिनं आहेत ते पदार्थ न खाता त्यांना पर्याय म्हणून ‘प्रोटीन शेक’ घेणं बरोबर नाही. कडधान्यं, मटण, सुका मेवा, बिया, डाळी, अंडी यातून शरीराला मिळणारी प्रथिनं शरीरासाठी आवश्यक आहेत. त्यांना पूरक म्हणून गरज असेल तर ‘प्रोटीन शेक’ घेणं चांगलं.

 

dry fruits inmarathi

 

५. तुम्ही नेमकं कशाचं सेवन करताय याची कल्पना तुम्हाला नसू शकते –

तुम्ही जर प्रोटीन पावडर आणत असाल तर त्यात भेसळ असू शकण्याची शक्यता असते आणि जर तुम्ही रोजच्या रोज त्याचं सेवन केलंत तर तुमच्या स्वास्थ्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. सगळ्याच प्रोटीन पावडर्स ‘द फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन’ने वापरायला योग्य ठरवलेल्या असतात असं नाही.

सप्लिमेंट ‘थर्ड पार्टी सर्टिफाईड’ असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजेच, ‘एनएसएफ’, ‘इंफॉर्म्ड चॉईस’, ‘यूएसपी’ अशा कंपन्यांची लेबल्स त्याच्यावर असणं आवश्यक आहे. नाहीतर, नुसतं लेबल वाचून प्रोटीन पावडर मध्ये भेसळ आहे की ती चांगली, वापरण्यास योग्य आहे याची कल्पना ना ग्राहकाला येणार नाही. जर प्रोटीन पावडर ‘थर्ड पार्टी सर्टिफाईड’ असेल तर प्रोटीन पावडरच्या ट्यूबवर तसं लेबल असेल.

 

protein supplements inmarathi
times of india

६. विषारी घटकांचा धोका –

प्रोटीन पावडर ‘केमिकल फ्री’ आहे की नाही हे तपासून घेणं अत्यावश्यक आहे. एका अभ्यासातून असं समोर आलेलं आहे की बऱ्याच प्रोटीन पावडर्स मध्ये शिसं, आर्सेनिक, कॅडमीयम, मर्क्युरी हे धातू, बिसफॉनेल – ए (बीपीए) हा रासायनिक घटक, पेस्टीसाईड्स आणि ज्यामुळे कॅन्सर किंवा बाकी शारीरिक व्याधी होऊ शकतात असे भेसळयुक्त घटक असतात. काही प्रोटीन पावडर्समध्ये हे विषारी घटक बऱ्याच प्रमाणात असल्याचे आढळून आले.

 

cancer inmarathi

 

७. दुधातली साखर पचण्याचा त्रास असणाऱ्या माणसांना त्रास –

बऱ्याच प्रोटीन पावडर्स मध्ये मिल्क प्रोटिन्स असतात. त्यामुळे लॅक्टोज सेन्सिटिव्हिटी असणाऱ्या माणसांना ते घेऊन बेचैन व्हायला होऊ शकतं आणि पचनक्रियेतही अडथळा येऊ शकतो.

 

Salt-Vs-Sugar InMarathi

८. जाहिरातीत दाखवली आहेत तितकी प्रथिनं प्रोटीन पावडरमध्ये असतीलच असं नाही –

शक्यतो प्रोटीन पावडर्सच्या बाबतीत ही समस्या फारशी आढळत नाही तरी जाहिरातीत दाखवली आहेत तितकी प्रथिनं प्रोटीन पावडर्सच्या ट्यूबमध्ये नसण्याची शक्यताही दाट असते. काही माणसांना त्याने काही फरक पडणार नाही. पण अशीही अनेक माणसं असतात जी आजारी असल्यामुळे पुरेसं अन्न खाऊ शकत नाहीत.

 

malnutrition inmarathi
asianage.com

 

ज्यांना कॅंसर झालेला आहे, जी कुपोषित आहेत, आणि खूप शारीरिक श्रम होणारी किशोरवयीन मुले ते जर या प्रोटीन पावडर्सवर अवलंबून असतील तर त्यांच्या शरीराला आवश्यक असणारी पोषकमूल्ये त्यांना पुरेशा प्रमाणात न मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे जाहिरातीत दाखवली आहेत तितकी प्रथिनं प्रोटीन पावडरमध्ये नसतील तर अशांना ते अपायकारक ठरू शकतं.

९. हाडांवर होणारा परिणाम –

अतिरिक्त प्रमाणात प्रथिनं शरीरात गेली तर किडनी स्टोन होऊ शकतो. कॅल्शिअम धरून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे हाडं फ्रॅक्चर व्हायची शक्यता असते.

 

fracture inmarathi

 

एखाद्या गोष्टीचं फॅड आहे, आजूबाजूचे अनेक जण ती गोष्ट करत आहेत म्हणून सारासार विचार न करता शरीराला जरी आवश्यकता नसली तरी उगीच कशाचंही सेवन करू नये. आपल्याला गरज असेल तर ‘प्रोटीन शेक’ , ‘प्रोटीन पावडर’चं जरूर सेवन करावंच. पण तारतम्य बाळगून योग्य प्रमाणात ते करावं.

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?