'अतिशय क्रूर दहशतवादी संघटना ISIS बद्दल तुम्ही कधीही न वाचलेल्या गोष्टी!

अतिशय क्रूर दहशतवादी संघटना ISIS बद्दल तुम्ही कधीही न वाचलेल्या गोष्टी!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

सध्या ISIS ही संघटना संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घालत आहे. कित्येक निष्पाप जीवांच्या हत्येचे पातक त्यांच्या माथी आहे, पण त्याची त्यांना बिलकुलही जाणीव नाही, उलट त्यांचा हा नरसंहार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. धर्माच्या नावाखाली मुस्लीम तरुणांना आकर्षित करून खोट्या विचारधारेवर आधारित साम्राज्य निर्माण करण्याचे त्यांचे ध्येयच त्यांना कधी न कधी तरी खड्ड्यात घालणार आहे आणि तो दिवस लवकरात लवकर येवो आणि हा निष्पाप रक्तसंहार थांबो ही आशा. असो आज आपण याच क्रूर दहशतवादी संघटनेबद्दल काही सत्य गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या तुम्हाला आजवर कोणीही सांगितल्या नसतील.

isis-marathipizza01
abcnews.go.com

ISIS म्हणजे इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया, हे या संघटनेचे पूर्ण नाव होय. कधीकाळी इराकमध्ये आयएसआयएस ही संघटना अल-कायदा म्हणूनच ओळखली जात होती. मात्र, २००६ मध्ये अमेरिका आणि स्थानिक अमेरिकन सैनिकांनी अल-कायदाचा पाडाव केला. त्यांना या संघटनेचा खात्मा झाला असे वाटत असले तरी ती पूर्णपणे संपली नव्हती.

२०११ मध्ये हा ग्रूप पुन्हा तयार झाला. त्यांनी इराकच्या तुरुंगात असलेल्या अनेक कैद्यांना सोडवले आणि हळु-हळु स्वतःची ताकद वाढवण्यास सुरवात केली. त्यानंतर फेब्रुवारी २०१४ मध्ये या संघटनेने अल-कायदाच्या छत्रछायेतून बाहेर पडत आयएसआयएस नावाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तेव्हा आयएसआयएसने दावा केला होता की, सीरियामध्ये असलेला अल-कायदाचा प्रमुख गट अल-नुसरा हा त्यांच्या प्रभावाखाली आहे. त्यानंतर वर्चस्वाच्या लढाईत आयएसआयएसने अल-कायदाचा तत्कालिन प्रमुख आयमन अल-जवाहिरीचा आदेश ऐकण्यास नकार देत अल-कायदाच्या विरोधात जाणारी पहिली संघटना म्हणून स्वतःला समोर आणले.

isis-marathipizza02
khaama.com

जगावर दहशत निर्माण करणा-या ओसामा बिन लादेनने अल-कायदा ही दहशतवादी संघटना स्थापन केली होती. आता जगातील इस्लामिक देशांमधील कट्टरपंथी संघटनांवर प्रभाव निर्माण करण्यासाठी आयएसआयएस आणि अल-कायदा यांच्यात स्पर्धा सुरू झाली. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते आयएसआयएसने अल-कायदाला मागे टाकून जगातील इस्लामिक दहशतवादी संघटनांवर प्रभाव निर्माण केला आहे.

आयएसआयएसचा एकमेव उद्देश आहे तो म्हणजे कट्टर सुन्नी इस्लामिक राष्ट्र स्थापन करणे. आयएसआयएसला आखाती देश आणि उत्तर अफ्रिकेच्या काही भागावर आपला प्रभाव निर्माण करण्याची इच्छा आहे. याशिवाय आयएसआयएसच्या इस्लामिक वर्चस्वचा एक भाग भारत देखिल आहे. संघटनेने एका नकाशात इस्लामिक स्टेट ऑफ खोरेसानचा उल्लेख केला होता, यात भारताचा उत्तर पश्चिम भाग असून गुजरातचा देखील समावेश आहे.

isis-marathipizza03
express.co.uk

इराकमध्ये आयएसआयएसचा अचानक प्रभाव वाढण्याचे एकमेव कारण आहे शिया-सुन्नी यांच्यातील वाद. इरामध्ये शिया मुस्लिम बहुसंख्यांक आहेत. मात्र, सद्दाम हुसेनचे सरकार आल्यानंतर सुन्नींचा प्रभाव वाढला. त्याला कारण म्हणजे, सद्दाम स्वतः सुन्नी होता. तो सत्तेत आल्यानंतर त्याने सुन्नीच बहुसंख्यांक असल्याची अफवा पसरवली आणि ती आजपर्यंत कायम आहे. त्यामुळे सुन्नींना सत्तेत अधिक वाटा हवा असतो. मात्र जोपर्यंत शिया सत्तेत आहेत तोपर्यंत सुन्नींना आपला सत्तेतील हिस्सा कमी असल्याचे वाटत राहाणार आणि हाच असंतोष आयएसआयएसने हेरला व त्यांची संघटना मजबूत झाली.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ही जगातील सर्वात श्रीमंत संघटना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आयएसआयएसने २०१४ साली तेल संपन्न मोसूल शहरावर ताबा मिळविला होता. त्यानंतर काही दिवसात स्थानिकांनी त्यांना तेथून मागे फिरण्यास भाग पाडले. मात्र, तोपर्यंत या संघटनेच्या दहशतवाद्यांनी शहरातील बँकांमधून अब्जावधींचे सोने आणि रोकड लुटली होती.

isis-marathipizza04
testtubenetwork.tumblr.com

मोसूलवर ताबा मिळविण्याआधी आयएसआयएसकडे ८७५ मिलियन संपत्ती (जवळपास 5200 कोटी रुपये) होती. मोसूल लुटीनंतर त्यांच्या संपत्तीत १.५ बिलियन डॉलर अर्थात ९००० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आयएसआयएस संपत्तीचा मुख्य स्त्रोत हा लुटमार आणि जबरस्ती वसुली हा आहे. त्याशिवाय ट्रक चालक आणि व्यापा-यांकडून ते बळजबरीने वसुली करतात. या संघटनेचे क्राइम नेटवर्कही मोठे असून त्यांनी सोन्याच्या पेढ्या लुटल्या आहेत.

आज पर्यंतच्या दहशतवादी संघटनांच्या तुलनेत आयएसआयएस ही संघटना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रभाव वाढवण्यात आघाडीवर आहे. ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून नरसंहाराची छायाचित्रे पोस्ट करत असतं. पूर्वी त्यांनी ‘द डॉन ऑफ ग्लॅड टायडिंग्स’ नावाचे अँड्रॉइड अ‍ॅप्लिकेशन लॉन्च केले होते. या अ‍ॅपच्या माध्यमातून सीरिया, इराक आणि मुस्लिम जगतातील बातम्या दिल्या जात असतं. ज्या दिवशी आयएसआयएसने मोसुल शहरावर ताबा मिळविला त्या दिवशी या अ‍ॅपच्या माध्यमातून ४० हजार ट्विट केले गेले.

isis-marathipizza05
vocativ.com

क्रूर, निर्दयी, पापी अशी सर्व विशेषणे कमी पडावीत अशी ही आयएसआयएस संघटना म्हणजे आजच्या आधुनिक युगाला लागलेली कीड आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये, हि कीड लवकरात लवकर ठेचली पाहिजे, अन्यथा येणारा काळ हा संपूर्ण जगासाठी एखाद्या अंधाऱ्या जगापेक्षा कमी नसेल.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

One thought on “अतिशय क्रूर दहशतवादी संघटना ISIS बद्दल तुम्ही कधीही न वाचलेल्या गोष्टी!

  • October 8, 2017 at 9:42 am
    Permalink

    Give only positive information , so that people wl get some proud things

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?