' सिनेमातल्या नव्हे तर, लांडग्यांच्या सानिध्यात वाढलेल्या खऱ्या 'मोगली'ची गोष्ट!

सिनेमातल्या नव्हे तर, लांडग्यांच्या सानिध्यात वाढलेल्या खऱ्या ‘मोगली’ची गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मोगली हे शब्द ऐकले की प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतात. लहानपणी प्रत्येकाने मोगलीवर आधारित कार्टून किंवा चित्रपट बघितलेले असतीलच, त्यामध्ये असलेला मोगली या कॅरेक्टरने प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. परंतु अनेकांना वाटते की ही फक्त एक काल्पनिक कथा आहे.

तथापि असे नसून मोगली हे पात्र सत्य घटनेवर आधारित असून, यावर रुडयार्ड केपलिंग यांनी सर्वप्रथम १८९४ मध्ये ‘द जंगल बुक’ या पुस्तकामध्ये लिहिले आहे. चला तर जाणून घेऊया ‘मोगली’ या पात्राची गोष्ट!

 

jungle book inmarathi

 

१८६६ साली मध्ये उत्तर प्रदेश मधील बुलंद शहरात असलेल्या एका जंगलामध्ये काही शिकारी शिकार करण्यासाठी गेले होते, तिथे त्यांना काही विचित्र दृश्य बघायला मिळाले. त्यांनी बघितले की ५ ते ६ वर्षाचे एक मूल लांडग्यांच्या कळपाच्या मध्यभागी बसले आहे. पण ते लांडगे त्या मुलाला काहीही इजा करत नव्हते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तो मुलगा देखील त्या लांडग्यासोबत अशाप्रकारे वागत होता जणू काही तो माणसांसोबत खेळत आहे. त्यावेळी शिकारींच्या या गटाने मुलाला लांडग्यांपासून वेगळे करण्याचा निर्णय घेतला आणि लांडग्यांच्या कळपावर हल्ला केला आणि त्या मुलाला लांडग्यांच्या त्या कळपापासून वेगळे केले.

यानंतर त्या मुलाला आग्रा येथील एका अनाथाश्रमात ठेवण्यात आले, जेणेकरून त्या मुलाची योग्य ती काळजी घेतली जाईल. परंतु झाले असे की त्या अनाथाश्रममध्ये अशा प्रकारच्या मुलांना कसे सांभाळायचे, याचे प्रशिक्षण कोणाकडेही नव्हते.

 

dina sanichar IM

 

यानंतर या अनाथालयात या मुलाला दीना सानिचर हे नाव देण्यात आले. तसा तर दीना अनाथालयामध्ये बाकीच्या मुलांसोबत राहत होता, परंतु तो त्यांच्याप्रमाणे बोलू शकत नव्हता, चालू शकत नव्हता.

तो त्याच्या भावना प्राण्यांसारखे आवाज काढून समजवण्याचा प्रयत्न करायचा. तसेच तो प्राण्यांप्रमाणे दोन्ही हात-पाय वापरून चालायचा आणि जमिनीवर पडलेले पाणी पण चाटूनच प्यायचा.

जर त्याला कोणी एखाद्या ग्लासमध्ये पाणी दिले तर त्याला समजत नसे की हे पाणी कसे प्यायचे आहे. तसेच त्याने कितीतरी वर्ष शिजवलेले अन्न खाल्लेच नाही, तो फक्त कच्चे मांस आणि मासे खायचा. प्राण्यांप्रमाणे तो थेट ताटामध्ये तोंड खुपसून जेवायचा.

काही वर्षांच्या प्रशिक्षणानंतर, दीना शिजवलेले अन्न खायला शिकला, परंतु अन्न खाण्यापूर्वी त्याची इतर जनावराप्रमाणे वास घेण्याची सवय गेलीच नाही. याशिवाय इतर अनेक प्रयत्न करूनही दीना कधीच बोलायला शिकला नाही.

dina sanichar 2 IM

 

तो नेहमी प्राण्यांसारखा आवाज काढायचा आणि या आवाजांतून आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोंचवण्याचा प्रयत्न करायचा. वयाच्या १२ व्या वर्षी दीनाने कपडे घालणे आणि दोन पायांवर चालणे शिकले होते, परंतु तरीही तो झोपताना लांडग्यांप्रमाणेच झोपायचा.

अनेक प्रयत्न करूनदेखील दीना बोटावर मोजण्या इतक्याच मानवी सवयी शिकला. तो त्याच्या जंगलामधील सवयी तर नाही बदलू शकला परंतु त्याने मानवाच्या अनेक चुकीच्या सवयी लावून घेतल्या जसे की धूम्रपान करणे.

हयात असेपर्यंत त्याने कोणत्याही मानवाला आपला मित्र बनवलं नाही. त्याने कधीही कोणत्याही मानवाविषयी आपुलकी दाखवली नाही. मात्र, अनाथाश्रमात राहणाऱ्या एका कुत्र्यासोबत त्याची खूप चांगली मैत्री झाली होती आणि तो दिवसभर त्या कुत्र्यासोबत खेळायचा आणि राहायचा.

 

dina sanichar 3 IM

 

अनेक प्रयत्न करूनही दीनाला मानवी सवयी लागल्या नाही आणि अत्याधिक धुम्रपानाच्या सवयीमुळे वयाच्या ३५ व्या वर्षी दीनाचा मृत्यु झाला. ही गोष्ट ऐकून आपल्यालाही वाईट वाटतं.

माणसाच्या वाईट सवयी फक्त मानवच नव्हे तर इतर जीवांनासुद्धा घातक आहेत त्यामुळे आपण आपल्या सवयींवर थोड्याप्रमाणात का होईना निर्बंध घालायला हवेत.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?