' एकेकाळी पोटापाण्यासाठी भजन गाणारी नेहा आज सर्वाधिक मानधन घेणारी गायिका आहे! – InMarathi

एकेकाळी पोटापाण्यासाठी भजन गाणारी नेहा आज सर्वाधिक मानधन घेणारी गायिका आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नेहा कक्कर – बॉलीवूड मधील या यशस्वी गायिकेचं नाव माहीत नाही अशी क्वचितच एखादी व्यक्ती असेल. इंडियन आयडॉल हिंदीचं परीक्षण करतांना आदित्य नारायण सोबत तिचं अफेअर असेल किंवा इन्स्टाग्रामवर तिचे सतत येणारे अपडेट्स असतील, नेहा कक्कर हे नाव नेहमीच चर्चेत असतं.

‘सेलिब्रिटी’ म्हणून जास्त ओळखल्या जाणाऱ्या नेहा कक्करने गायलेलं एखादं गाणं कोणाला पटकन आठवणार नाही. पण, ऋषिकेशमध्ये जन्मलेली आणि जागरण प्रकारचे गाणं गाणारी नेहा कक्कर ही आज सर्वात जास्त मानधन कमावणारी ही गायिका आज निर्मात्यांची आणि प्रेक्षकांची आवडती गायिका आहे हे निर्विवाद सत्य आहे.

 

neha kakkar IM

 

नेहा कक्करचा गायिका म्हणून आजवरचा प्रवास कसा होता? सिनेमाचा कोणताही वारसा नसतांना एका छोट्या शहरातील या मुलीने आघाडीच्या गायिकांना स्पर्धेत मागे कसं टाकलं? हे जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

नेहा कक्करच्या घरची परिस्थिती ही जेमतेम होती. तिचे वडील हे दिल्लीत कॉलेजच्या बाहेर समोसा विकून उदरनिर्वाह करायचे.

गायनाच्या आवडीपेक्षा तिला कुटुंबाचं पोट भरण्यासाठी गाणं म्हणणं आवश्यक होतं. चौथ्या वर्षापासून ते सोळाव्या वर्षांपर्यंत नेहा कक्कर ही दिल्ली मधील काही भजनी मंडळात गाणे म्हणायची.

 

neha jagnar IM

 

वयाच्या १६ व्या वर्षी मुंबईत गायक होण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या नेहा कक्कर ला ‘इंडियन आयडॉल २’ च्या ऑडिशनमधून पहिल्या राउंडमध्येच बाहेर पडावं लागलं होतं. पण, नेहाने नाराज न होता आपल्या गायकीवर लक्षकेंद्रित केलं आणि आपला रियाज सुरू ठेवला, बॉलीवूडमध्ये ऑडिशन देणं सुरू ठेवलं.

तब्बल ५ वर्षांनी नेहा कक्करचं नशीब फळफळलं जेव्हा तिला संगीतकार प्रीतमने कॉकटेल सिनेमातील ‘सेकंड हॅन्ड जवानी’ हे गाणं गायची संधी दिली. हे गाणं हिट झालं आणि नेहा कक्करचं नाव आणि आवाज रातोरात लोकांच्या परिचयाचा झाला.

second hand jawani IM

 

पुढील ५ वर्षात नेहा कक्करला सर्व निर्माता, संगीतकारांनी आपल्या बॅनरखाली गाणं गाण्यासाठी समोरून आमंत्रित केलं. नेहा कक्करच्या सुरुवातीच्या काळात इतर हिट झालेल्या गाण्यांमध्ये ‘आज दिन है सनी सनी’ आणि ‘लंडन ठुमकदा’ या गाण्यांचा समावेश होतो.

आपल्या कुटुंबाच्या आर्थिक संघर्षात तिने भाऊ संगीतकार भाऊ टोनी कक्कर आणि बहीण सोनी कक्कर यांचीसुद्धा मदत घेतली आणि आज कक्कर कुटुंबीयाला नेहा कक्कर मुळे बॉलीवूड मध्ये आपलं अढळ स्थान निर्माण करणं शक्य झालं आहे.

टोनी आणि सोनी कक्कर हे नेहाच्या आधीपासून बॉलीवूडमध्ये करिअर करत असले तरीही त्यांची ओळख ही आज ‘नेहा कक्करचे भावंड’ म्हणूनच होते ही नेहा कक्करच्या यशाची पावती म्हणावी लागेल.

 

neha kakkar brothers IM

 

आपल्या दिसण्यावर सतत वेगवेगळे प्रयोग करणारी नेहा कक्कर ही सोशल मीडियावर सुद्धा खूप लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर ५ कोटींपेक्षा अधिक फॉलोवर असलेल्या नेहाची ‘सेलिब्रिटी’ म्हणून असलेली लोकप्रियता आपल्याला या आकड्यांमधून स्पष्ट दिसून येते.

नेहा कक्कर ही काही प्रेक्षकांना केवळ उडत्या चालीतले उथळ गाणे म्हणणारी गायिका वाटत असली तरीही तिने आपल्या वयाच्या चौथ्या वर्षांपासून गाणं म्हणण्यास केलेली सुरुवात ही बाब तिला परीपक्व गायिकांमध्ये नेऊन ठेवते असं म्हणता येईल.

६ जून १९८८ रोजी ऋषिकेश मध्ये जन्मलेली नेहा कक्कर ही आज तिथल्या एका मोठ्या बंगल्याची, कारची मालकीण आहे याचा तिला सार्थ अभिमान आहे.

 

neha kakkar bunglow IM

 

एका खोलीत जगलेलं बालपण आणि आज कष्टाने कमावलेला बंगला हे दोन्ही फोटो नेहा कक्कर ने आपल्या चाहत्यांसोबत शेअर करून कित्येकांना संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित केलं आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?