' आपल्याच पुत्रांना गंगेने नदीमध्ये का विसर्जित केले होते? जाणून घ्या यामागची कथा! – InMarathi

आपल्याच पुत्रांना गंगेने नदीमध्ये का विसर्जित केले होते? जाणून घ्या यामागची कथा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिंदू धर्मात गंगा नदी अतिशय पूज्यनीय मानली जाते. जुन्या ग्रंथांमध्ये गंगेविषयी खूप गोष्टी वाचायला मिळतात. महाभारतातील सर्वात प्रमुख पात्र भीष्माचार्य हे देखील गंगेचेच पुत्र होत. आज आम्ही तुम्हाला गंगेशी निगडीत काही रंजक गोष्टी सांगणार आहोत, ज्या खूपच कमी लोकांना माहित असतील.

 

ganga InMarathi

 

ब्रम्हाने दिला होता महाभिषाला शाप

प्राचीन काळात इश्वाकु वंशामध्ये राजा महाभिष होऊन गेले. त्यांनी मोठे-मोठे यज्ञ करून स्वर्गलोक प्राप्त केले होते. एक दिवस सर्व देव आणि राजर्षी ब्रह्मदेवाच्या सेवेसाठी आले होते. त्यांच्यामध्ये राजा महाभिषाचा देखील समावेश होता. गंगा देखील त्यावेळी उपस्थित होती.

अचानक हवेमुळे गंगेचे वस्त्र तिच्या अंगावरून घसरले. तेथील सर्व उपस्थित असलेल्या लोकांनी आपली नजर खाली केली, परंतु राजा महाभिष गंगेला पाहतच राहिले.

जेव्हा ब्रम्हाने हे बघितले तेव्हा त्यांनी महाभिषला मृत्युलोकी (पृथ्वी) जन्म घेण्याचा शाप दिला आणि सांगितले की गंगेमुळेच तू नाराज होशील आणि तु जेव्हा त्याबद्दल राग व्यक्त करशील तेव्हाच तू शाप मुक्त होशील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

==

हे ही वाचा : हरणाऱ्याला जिंकून देणारा, कृष्णाच्या परीक्षेत अकल्पित गोष्टी घडवणारा अज्ञात योद्धा!

==

राजा शांतनुची पत्नी बनली गंगा

ब्रम्हाच्या शापामुळे राजा महाभिषाने पुरु वंशात राजा प्रतीपचा पुत्र शांतनु याच्या रुपात जन्म घेतला. एकदा राजा शांतनू शिकारीला गेले असताना गंगा नदीच्या काठावर पोहचले. तेथे त्यांनी अतिशय सुंदर स्त्रीला (ती देवी गंगाच होती) पाहिले.

 

shantanu and ganga InMarathi

 

राजा शांतानु तिच्यावर मोहित झाले. त्यांनी तिला लग्नाची मागणी घालताच, त्या स्त्रीने सांगितले की,

मी तुमची राणी बनेन, पण मी तोपर्यंत तुमच्या बरोबर राहीन जोपर्यंत तुम्ही मला कुठलीही गोष्ट करण्यापासून अडवणार नाही आणि कोणतीही गोष्ट विचारणार नाही ज्या दिवशी तुम्ही असे कराल त्या दिवशी मी तुम्हाला सोडून जाईन.

राजा शांतनुने त्या स्त्रीची अट मान्य केली आणि तिच्याशी विवाह केला.

 

ganga 1 InMarathi

 

अखेर गंगेने राजा शांतनुला नाराज केले.

विवाहानंतर राजा शांतनु त्या स्त्री बरोबर सुखाने राहू लागले. काही काळाने शांतनुच्या राजवाड्यात सात पुत्रांनी जन्म घेतला, पण सगळ्या मुलांना त्या स्त्रीने गंगेत विसर्जित केले.

शांतानु तिचे हे हीन कृत्य पाहून देखील तिला अडवू शकले नाहीत,  कारण त्यांनी तिला वचन दिले होते आणि या कृत्याचे ह्याचे कारण तिला विचारल्यास ती त्यांना सोडून जाईल अशी त्यांना भीती होती.

आठवे मुल झाल्यानंतरही ती स्त्री त्याला गंगेत विसर्जित करत होती तेव्हा मात्र राजा शांतनुने तिला रोखले आणि पुन्हा असे कृत्य करण्यामागचे कारण विचारले. तेव्हा त्या स्त्रीने सांगितले की ती देवी गंगा देवी आहे आणि तिने ज्या मुलांना गंगा नदीत विसर्जित केले होते ते सर्व वसु होते, ज्यांना वशिष्ठ ऋषींनी शाप दिला होता.

त्यांना शाप मुक्त करण्यासाठी तिने त्यांना विसर्जित केले होते. राजा शांतनुने आपले वचन मोडून तिला रोखल्याने, गंगा त्या आठव्या पुत्राला घेऊन तिथून निघून गेली.

==

हे ही वाचा : महाभारतातील सर्वात दाहक मृत्यूमागची…जन्मजन्मांतराच्या सूडाची एक कहाणी

==

 

 

Ganga-and-Shantanu Inmarathi

 

वसुनीं का घेतला गंगेच्या गर्भातून जन्म

महाभारताच्या पुर्वाधानुसार एकदा पृथु आणि वसु आपल्या पत्नींना घेऊन मेरू पर्वतावर फिरत होते. तिथे वशिष्ठ ऋषींचा आश्रम सुद्धा होता. तिथे नंदिनी नावाची गाय होती.

दयो नावाच्या वसुने बाकींच्या वसुंना बरोबर घेऊन आपल्या पत्नीसाठी त्या गायीचे हरण केले. जेव्हा महर्षी वशिष्ठ यांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी सर्व वसुंना मनुष्य योनीत जन्म घेण्याचा शाप दिला.

 

Vashisht-Rishi-InMarathi

 

वसुनीं क्षमा मागितल्यावर ऋषींनी सांगितले की,

तुम्हा सगळ्या वसुंना लगेचच मनुष्य योनिमधून मुक्ती मिळेल पण या दयो नावाच्या वसुला खूप दिवस पृथ्वीलोकावर राहावे लागेल.

ह्या शापाची वार्ता जेव्हा वसुंनी गंगेला ऐकवली तेव्हा गंगेने सांगितले की,

मी तुम्हा सर्वाना माझ्या गर्भात धारण करून लगेचच मनुष्य योनीतून मुक्त करेन. गंगेने आपल्या वचनाप्रमाणे सात वसुंना मुक्त केले, पण वशिष्ठ ऋषींच्या शापामुळे भीष्माच्या रुपात दयो वसुला पृथ्वीवर राहून दु:ख भोगावे लागले.

 

भीष्माला दिले श्रेष्ठ शिक्षण

गंगा जेव्हा आपल्या आठव्या पुत्राला घेऊन गेली, तेव्हा राजा शांतनु खूप उदास राहू लागला. एके दिवशी गंगा नदीच्या काठावर फिरत असताना राजा शांतनूने बघितले की गंगेमध्ये खूपच कमी पाणी होते आणि ते वाहत देखील नव्हते.

हे रहस्य जाणून घेण्यासठी जेव्हा शांतनु जवळ गेले, तेव्हा त्यांनी बघितले की एक दिव्य आणि सुंदर तरुण शस्त्रांचा अभ्यास करत होता आणि त्याने आपल्या बाणांनी गंगेच्या धारेला थांबवले होते. हे दृश्य पाहून शांतनुला खूप आश्चर्य वाटले. तेव्हाच तिथे शांतनुची पत्नी गंगा प्रकट झाली आणि तिने त्याला सांगितले की.

 

Ganga-and-Shantanu 1 Inmarathi

==

हे ही वाचा : महाभारतातील यक्ष- युधिष्ठिराच्या “या” संवादात मानवी जीवनाचं सार सामावलंय, एकदा तरी वाचाच

==

 

हा तुमचा आठवा पुत्र देवव्रत आहे. याने वशिष्ठ ऋषींकडून वेदाचे अध्ययन करून घेतले आहे आणि परशुरामांकडून सर्व शस्त्र चालवण्याची कला अवगत करून घेतली आहे. हा श्रेष्ठ धनुर्धर आहे आणि इंद्रासारखे याचे तेज आहे.

हाच देवव्रत म्हणजे पुढे भीष्माचार्य म्हणून नावारुपास आला.

 

bhishma InMarathi

 

आपल्या अनेक प्राचीन कथांपैकी एक अशी ही गंगेची रोचक कथा!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?