' या मुस्लिम देशात ऍडल्ट सिनेमांवर आता सेन्सॉरची कात्री चालणार नाही! – InMarathi

या मुस्लिम देशात ऍडल्ट सिनेमांवर आता सेन्सॉरची कात्री चालणार नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या बदलाचे वारे वाहत आहेत. आखाती देशांतील इस्लामिक देशांमध्ये वर्षानुवर्षे जे कडक कायदे आहेत, अश्या त्यांच्या अनेक कायद्यांमध्ये युएईचे सरकार सध्या बदल करत आहे.

काही दिवसांपूर्वी युएईमध्ये साडेचार दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या अंमलबजावणीची घोषणा करण्यात आली. तसेच, आता युएईमध्ये चित्रपटांवर सेन्सॉरची कात्री चालणार नाही.

 

UAE censorship IM

 

काही सीन्स कट करण्याऐवजी आता +२१ ची नवीन वयोगट श्रेणी सुरु केली जाईल आणि चित्रपटांच्या “आंतरराष्ट्रीय” आवृत्त्यांच्या स्क्रीनिंगला अनुमती देण्यात येईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ज्या चित्रपटांमध्ये संवेदनशील दृश्ये, चुंबन, नग्नता, समलैंगिकता दर्शविणारी दृश्ये असतील असे चित्रपट केवळ २१च्या पुढच्या वयोगटासाठी असतील.

संयुक्त अरब राष्ट्राने चित्रपटांच्या प्रदर्शनाबाबत हा मोठा निर्णय घेतला आहे. आता पारंपारिक इस्लामिक भावना दुखावणारी संवेदनशील दृश्ये कापण्याऐवजी त्यांना २१+ असे रेटिंग दिले जाईल.

 

21 plus films IM

 

नुकतीच युएईच्या मीडिया नियामक प्राधिकरणाने त्यांच्या ट्विटर पोस्टद्वारे घोषणा केली आहे की, “चित्रपट आता त्यांच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीनुसार सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित केले जातील.” यापूर्वी यूएईमध्ये अडल्ट कन्टेन्ट नियमितपणे कट किंवा संपादित केले जात असे.

तज्ञांच्या मते, युएईचा हा निर्णय खूप महत्वाचा आहे कारण सौदी प्रमाणेच ते देखील तेलावर आधारित आपली अर्थव्यवस्था इतर क्षेत्रांमध्ये वळवू इच्छित आहे. जेणेकरून केवळ कच्च्या तेलाच्या निर्यातीवर आधारित असलेली त्यांची अर्थव्यवस्था न ढासळता टिकून राहील.

यूएईच्या नवीन निर्णयामुळे, अडल्ट कन्टेन्ट काढून टाकण्याऐवजी त्यांना २१+ रेटिंग देऊन प्रदर्शित केले जाईल. ह्याआधी देशातील सेन्सॉरशिप कायद्यामुळे अनेक वेबसाईट्स आणि चॅनेल्स ब्लॉक करण्यात आले होते आणि चित्रपटांमधून चुंबन व लैंगिक दृश्ये काढून टाकण्यात येत असत.

 

adults only IM

 

कुठल्याही चॅनेलवर मध्यंतरात लागणाऱ्या जाहिरातीत कुठल्या नॉन-हलाल खाद्यपदार्थाचे नाव असेल तर तेही अस्पष्ट केले जात असे पण आता तसे होणार नाही.

त्याचप्रमाणे दारूवरील निर्बंध शिथिल करताना सरकारने २१ वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील लोकांना दारू पिणे, ठेवणे आणि विक्री करणे यासाठी आकारण्यात येणारा दंड रद्द केला आहे. प्रादेशिक शर्यतीत इतर आखाती देशांना मागे टाकून पुढे राहण्यासाठी युएईने ही पावले उचलली आहेत.

यूएईच्या कट्टर पुराणमतवादी कायद्यांमध्ये झालेला हा बदल तेथील नागरिकांसाठी सुखावह असणार आहे. युएईने काही नागरी कायद्यांत सुधारणा तर केलीच आहे शिवाय अविवाहित जोडप्यांना लिव्ह-इनची परवानगी देणे, तसेच नवीन दीर्घकालीन “गोल्डन व्हिसा” धारकांना देशातील त्यांच्या व्यवसायाची १०० टक्के मालकी मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे हे बदल देखील युएईमध्ये घडत आहेत.

व्यक्ती आणि गुंतवणूकदार दोघांना आकर्षित करण्यासाठी ही निर्णायक पावले सरकारने उचलली आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी सरकारने आपल्या इस्लामिक कायदा संहितेमध्ये सुधारणा करून, पाश्चात्य व्यवसाय आणि बाजारांच्या अनुषंगाने शुक्रवार ते शनिवार-रविवार वीकेंड म्हणून सुट्टी जाहीर केली आहे.

 

dubai IM

पुढील वर्षापासून ही व्यवस्था लागू होईल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, विदेशातल्या लोकांना युएईकडे आकर्षित करण्यासाठी कट्टर इस्लामी देश म्हणून नव्हे तर उदारमतवादी देश म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी ही यूएईची धडपड चाललेली आहे.

युएई हा आखाती देशातील सर्वात उदारमतवादी देशांपैकी एक मानला जातो. परंतु इथल्या चित्रपटगृहांमध्ये आजवर न दाखवले गेलेले प्रौढ चित्रपटही आता २१च्या पुढच्या वयोगटातील लोकांसाठी खुलेआम दाखवले जाणार आहेत. याचा उद्देश यूएईच्या नव्या पुरोगामी प्रतिमेचा प्रचार करणे हाच आहे.

यूएईच्या या घोषणेमुळे तेथील मनोरंजनाच्या उदारीकरणाला अधिक चालना मिळेल. सौदी अरेबियाने ह्या वर्षी जेद्दाह येथे पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला होता.

तीन दशकांहून अधिक काळ असलेली चित्रपटांवरील बंदी हटवल्यानंतर चार वर्षांनी कैरो फिल्म फेस्टिव्हलमध्ये सौदीच्या फियास्को या चित्रपटाने दोन पुरस्कार जिंकले.

इजिप्त सारख्या ठिकाणी जेथे प्रवाहाच्या विरुद्ध जाणारे लोक सहसा हिंसेचे लक्ष्य असतात, त्यांनी द इटरनल्सच्या स्क्रीनिंगला देखील परवानगी दिली. ह्या चित्रपटात पहिला मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा पहिला समलिंगी सुपरहिरो दाखवला आहे.

 

eternals IM

 

चित्रपट हे समाजपरिवर्तनासाठी अत्यंत शक्तिशाली माध्यम समजले जाते. अशा वेळी यूएईने देखील हा मोठा बदल स्वीकारणे नक्कीच स्वागतार्ह आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?