' जुळ्या भावांचे रोजचे जेवण, एक व्हेज तर दुसरे नॉनव्हेज; असा झाला परिणाम – InMarathi

जुळ्या भावांचे रोजचे जेवण, एक व्हेज तर दुसरे नॉनव्हेज; असा झाला परिणाम

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रत्येकाचा आहार वैयक्तिक आवडीनिवडीवर आधारित असतो. तो काय असावा?, कितीवेळा खावा हेही वैयक्तिक असतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सामान्यत: आहाराचे मुख्य दोन प्रकार आहेत, शाकाहारी आणि मांसाहारी. गमतीची गोष्ट म्हणजे दोन्ही प्रकारचा आहार सेवन करणार्‍यांमध्ये ‘शाकाहार श्रेष्ठ की मांसाहार’ यावरून सतत धुमशान रंगत असते, पण तरीही कोणत्या प्रकारचा आहार श्रेष्ठ हे काही कोणी सांगू शकलेलं नाही.

हाच मुद्दा घेऊन किंग्स कॉलेज लंडनच्या विद्यार्थ्यांनी एक प्रयोग अमलात आणला. या प्रयोगाचा हिस्सा झाले होते दोन जुळे भाऊ, ज्यांनी आपल्या आहाराच्या सवयी बदलत तब्बल १२आठवडे चाललेल्या या प्रयोगात सहभाग नोंदवला होता.

नक्की काय होता हा प्रयोग? आणि त्या जुळ्या भावांना प्रयोगातून काय फरक जाणवला ? हे जाणून घेणे नक्कीच रंजक असेल. चला तर मग जाणून घेऊ या प्रयोगाचा निष्कर्ष.

 

twin inmarathi

 

लंडनच्या किंग्स कॉलेजच्या विद्यार्थ्यानी एक प्रयोग आयोजित केला होता. ज्याचा विषय कोणत्या प्रकारचा आहार जास्त फायदेशीर आहे, या विषयी अभ्यास करण्यात आला. या प्रयोगात ह्यूगो आणि रॉस टर्नर या जुळ्या भावांनी सहभाग घेतला, ज्यामध्ये एकाने वनस्पती-आधारित म्हणजे शाकाहार घेतला तर दुसर्‍याने मांसाहार निवडला.

हा अभ्यास सलग १२ आठवडे चालला. ह्यूगोने १२आठवडे मांस आणि दुग्धजन्य पदार्थ खाणे बंद केले आणि रॉसने मांस, मासे आणि दुग्धजन्य पदार्थ असलेला आहार घेतला. या प्रयोगादरम्यान दोघांनीही सारख्या कॅलरी असलेला आहार सेवन केला आणि एकाच व्यायामशाळेत समान पद्धतीचा व्यायाम केला.

 

twin inmarathi1

 

बीबीसी बरोबर बोलताना हयुगो म्हणाला, ‘मांसाहार बंद करून पूर्णपणे शाकाहार करणे माझ्यासाठी खूपच अवघड होते, सुरवातीला मला सतत मांसाहार करण्याची इच्छा होत असे. मी शाकाहारी आहार घेत होतो आणि त्याचा खरोखरच तुमच्या शरीरावर परिणाम होतो.’

आपल्या शाकाहारी होण्याविषयी तो पुढे असेही म्हणाला, की त्याने पूर्वीपेक्षा खूप जास्त फळे आणि सुकामेवा खाल्ला आहे. याचा अर्थ त्याच्या रक्तातील साखरेची गरज दिवसभरातील आहाराने पूर्ण होत होती आणि त्याच्याकडे जास्त ऊर्जा होती.

दुसरीकडे, मांस खाणाऱ्या रॉसने सांगितले, की त्याला काही दिवस ‘खूप उत्साही’ आणि इतर दिवशी ‘अशक्त’ वाटत होते. दुसऱ्या शब्दांत, त्याची ऊर्जा पातळी सुसंगत नव्हती, पण हयुगोची ऊर्जा पातळी सर्व दिवस सारखीच होती.

 

balanced diet inmarathi

 

या प्रयोगात जाणवलेला दुसरा लक्षणीय बदल म्हणजे शरीरातील जिवाणूंच्या विविधतेत झालेला बादल. हा बदल हयुगोला जाणवला, पण रॉसला जाणवला नाही.

१२ आठवड्यांच्या शेवटी निष्कर्ष हा निघाला, की हयुगोचे वजन आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी झाली. ह्यूगो १८५ पौंडवरून १८१ वर गेला. त्याच्या भावाचे वजन वाढले आणि त्याचे वजन १८९ पौंड झाले.

दोघांनी सांगितले की, “आहार बदलानंतर आम्हाला फारसा काही फरक पडला नाही”. मित्रांनो यावरून एकच गोष्ट आपण म्हणू शकतो, की आहार कोणताही असो तो रुचकर असावा आणि वेळेवर मिळावा इतकेच.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?