' जर्मन मुलगा-रशियाची मुलगी, लग्न मात्र हिंदूपद्धतीने.. यामागचं नक्की कारण काय? – InMarathi

जर्मन मुलगा-रशियाची मुलगी, लग्न मात्र हिंदूपद्धतीने.. यामागचं नक्की कारण काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

लग्न.. हिंदू संस्कृतीतील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट. सध्या तर सगळीकडे लग्नाचे वारे वाहत आहेत. सोशल मीडियावर जिकडे बघाल तिकडे फक्त लग्नाचेच फोटोज दिसत आहेत. अंकिता लोखंडे – विकी जैन, विकी- कतरिना यांच्या बिग फॅट इंडियन वेडिंग्सनी या माहोलमध्ये अजूनच भर टाकलीये.

 

Ankita Vicky IM

 

पूर्वी लग्न म्हणजे एकच दिवसाचा सोहळा होता, पण आता लग्नाच्या २-३ दिवस आधीपासूनच धामधूम सुरु असते. हळद- संगीत- मेहंदी असा साग्रसंगीत कार्यक्रम हल्ली आखला जातो आणि ते ३-४ दिवस दिलखुलास मज्जा केली जाते.

खरंतर लग्न म्हणजे दोन जीवांचं, दोन कुटुंबांचं मिलन असतं, पण प्रत्येक धर्मात त्यांच्या श्रद्धेनुसार लग्न केलं जातं. हिंदू संस्कृतीत लग्न हा एक संस्कार मानला जातो. आपल्याकडे सोळा संस्कार मानले जातात, त्यातील लग्न हा एक महत्त्वाचा संस्कार आहे.

आपल्याकडे ज्या पद्धती पाळल्या जातात, त्या प्रत्येकामागे शास्त्र आहे, लग्नाआधी लावल्या जाणाऱ्या हळदीपासून सप्तपदींपर्यंत सगळ्या प्रथांमागे शास्त्र आहे, काही कारणं आहेत.

 

vicky katrina inmarathi

 

कोरोनामुळे प्रत्येकालाच आपल्याकडे पूर्वी पाळल्या जाणाऱ्या पद्धतींचं महत्त्व पटलंय. योगाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे विदेशातून माणसं येतात. अशाच एका विदेशी जोडप्याने भारतात लग्न केलंय आणि तेही हिंदू संस्कृतीनुसार…

 

marriage inmarathi1

 

गुजरातमध्ये जर्मन मुलगा आणि एका रशियन मुलीने लग्न केलं आणि हिंदू संस्कृतीच्या सगळ्या प्रथा- पद्धती पाळून. जर्मनीचा मुलगा Chris Muller आणि रशियन मुलगी Julia Ukhvakatina यांनी गुजरातच्या सर्वोदय हॉलमध्ये लग्न केलं.

Chris Muller जर्मनीतील एका मोठ्या कुटुंबात लहानाचा मोठा झाला, पण अध्यात्म्याच्या ओढीने त्याने सगळ्या संपत्तीचा त्याग केला. भारतात येऊन त्याने आध्यात्म्याचा अभ्यास सुरु केला. गेली काही वर्षे तो इकडेच राहत आहे. ट्रॅव्हलिंगच्या निमित्ताने तिची Julia Ukhvakatinaशी ओळख झाली आणि त्यांनी लग्न करायचं ठरवलं.

 

marriage inmarathi

 

त्याच्या लग्नाचं सगळं मॅनेजमेंट लालाभाई पटेल यांनी केलं. हळद- सप्तपदी या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आपल्या संस्कृतीचं महत्त्व विदेशी लोकांना पटतंय याहून वेगळा आनंद कोणता?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?