' मतदानपूर्व सर्वेक्षणाचा अंदाज : गोवा आणि पंजाबमध्ये नक्की कोण बाजी मारणार?

मतदानपूर्व सर्वेक्षणाचा अंदाज : गोवा आणि पंजाबमध्ये नक्की कोण बाजी मारणार?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

देशातील काही राज्यांच्या निवडणूका आता अगदीच तोंडावर आल्या आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष देखील अगदी जोमाने कामाला लागला आहे. पंजाबमधील अनेक काँग्रेसचे महत्त्वाचे नेते पक्ष सोडून भाजप आणि अन्य पक्षात जात आहेत. तीच परिस्थिती गोव्यासारख्या छोट्या राज्यात आहे. कधीकाळी काँग्रेसचे मुख्यमंत्री असलेले फलेरिओ आता ममता दीदींसोबत गेले आहेत.

उत्तर प्रदेशात भाजपला चारीमुंड्या चित्त करण्यासाठी विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहे. काँग्रेसकडून प्रियांका गांधी यांनी निवडणुकांची सूत्र हाती घेतली आहेत. मात्र एबीव्हीपीच्या एका अहवालानुसार यूपीच्या जनतेने पुन्हा एकदा योगींनाच निवडले आहे.

 

yogi adityanath inmarathi

 

हे झालं उत्तर प्रदेशचे मात्र गोव्यात आणि पंजाबमध्ये न्युजएक्सने घेतलेल्या सर्व्हेमध्ये निवडणुकांच्या आधीचे पोल्स जाहीर केले आहेत, ते नेमके काय आहेत चला तर मग जाणून घेऊयात…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गोवा विधानसभा :

गोव्याच्या विधानसभेसाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना प्रभारी म्हणून नेमले आहे. नुकतंच नरेंद्र मोदींनी गोवा मुक्तादिनानिमित्त पणजी येथे जाऊन शहिदांना श्राद्धांजली वाहिली तसेच अन्य काही महत्वाच्या लोकांच्या भेटी घेतल्या, भाजपचे सरकार पुन्हा यावे यासाठी सगळेच प्रयत्नशील आहेत.

 

goa 1 inmarathi

 

न्यूजएक्सचा सर्व्हेमधून असे निष्कर्ष आलेत आहेत की, यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणावर भाजपचं जिंकून येणार, तसेच आपला सुद्धा चांगल्या टक्कयांनी मते मिळण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील राज्यांपैकी आपची ही सर्वात मोठी कामगिरी ठरू शकेल. मतदानाच्या प्रमाणात आप काँग्रेसला देखील मागे टाकले असे अंदाज दर्शवले जात आहेत.

 

 

Arvind_Kejriwal_InMarathi

भाजपला सर्वाधिक म्हणजे २० ते २२ जाग मिळतील असा साधारण अंदाज दर्शवला जात आहे तर आप आणि काँग्रेस दोघांना मिळून ४ ते ६ जागा मिळतील अशी अपेक्षा आहे.

पंजाब विधानसभा :

निवडणुकांच्या आधीच पंजाबमधील राजकरणात अनेक बदल घडून येताना दिसले आहे. निवडणूक अगदी काही महिन्यांवर ठेपल्या असताना काँग्रेस हायकमांडने चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले. त्यामुळे एकूणच पंजाबमधील राजकरणात काही काय घडून येईल सांगता येत नाही.

 

punjab inmarathi

 

न्युज एक्सच्या सर्व्हेनुसार येत्या निवडणुकीत चन्नी यांच्या नेतृत्वाखाली असलेले सरकार पडू शकते. आप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल, ३८ % आसपास जागा मिळतील. तर काँग्रेसला ३५% जागा मिळतील. भाजपची ३ % मते कमी होतील कारण शेतकरी आंदोलनामुळे आधीच तिकडची जनता नाराज असल्याने त्याचा फटका भाजपला बसू शकतो. असा अंदाज सर्वेक्षणाचा आहे.

 

punjab 1 inmarathi

 

निवडणुकांच्या आधीचे पोल्स, तज्ञांचे निष्कर्ष यावर अनेक न्यूज चॅनेल कार्यक्रम करत असतात. मात्र राजकीय पक्ष निवडणुकांच्या आधी कोणती रणनीती खेळातील याचा अंदाज सामान्य जनतेला कधीच नसतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?