' लय भारी... मराठी तरुणाने बनवलीये जुगाड जीप केवळ ५० हजारात!

लय भारी… मराठी तरुणाने बनवलीये जुगाड जीप केवळ ५० हजारात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्याकडे आजही हुशारीपेक्षाही कुठली पदवी आहे याला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं. आपण ज्या विषयातली शैक्षणिक पदवी घेतलीये त्या विषयात आपण निपुण असूच असं नाही.

किंबहुना, बऱ्याचदा असंच पहायला मिळतं, की आपल्याकडे ज्या विषयाची शैक्षणिक पदवी असते त्यात आपण अनेकातले एक असतो, सर्वसामान्य असतो. म्हणूनच तर भारंभार इंजिनियर्स इंजिनियरिंगची पदवी घेऊन बाहेर पडतात आणि त्यातले बहुतेकजण त्यात पुढे काहीतरी मोठं यश न मिळवता एमबीए किंवा त्यासारखे इतर पर्याय निवडून आपली वाटचाल करत राहतात.

पण काही माणसं मात्र येतानाच सृजनाचा आशीर्वाद देवाकडून घेऊन आलेली असतात. अशी कल्पक माणसं आपली एक स्वतंत्र वाट तयार करतात. त्यांना त्यांची ‘इंडिविजुएलिटी’ जपण्यासाठी बाहेरून काही वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. कशाचाही दिखावा करावा लागत नाही. त्यांच्या कामातूनच त्यांची ‘इंडिविजुएलिटी’, त्यांचं ‘अनेकातला एक’ नसून ‘इतरांपेक्षा वेगळं’ असणं आपोआप जपलं जातं.

एका मराठमोळ्या इसमाने अशीच एक किमया साधलीय. केवळ ५० ते ६० हजारात एक कार बनवण्याची! दत्तात्रय विलास लोहार असं या इसमाचं नाव. ‘देवराष्ट्र’ या गावातल्या एका लोहार कुटुंबातली ही व्यक्ती आहे. या माणसाची कारची निर्मिती थक्क करणारी आहे.

 

car inmarathi

 

‘हिस्टोरिकॉन’ या युट्युब चॅनलवरच्या एका व्हिडियोद्वारे आपल्याला या माणासाविषयी, त्याच्या कारच्या निर्मितीविषयी कळते. आपली कार सुंदर दिसावी, इतर महागड्या कार्समध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याही कारमध्ये आपल्याला कशा आणता येतील, आपलीही कार आपल्या परीने कशी दिमाखदार, सुसज्य करता येईल यासाठी या माणसाने चांगलीच शक्कल लढवली.

कारसाठी पॅशन बाईकचं इंजिन वापरलं, जुन्या गंजलेल्या जीपच्या बोनेटला वेल्डिंग करून, त्याची डागडुजी करून त्याचा कार छान दिसावी यासाठी वापर केला. रिक्षाचे टायर पुढे लावले. पेट्रोलपंप बसवला. बाकी कार्समध्ये असते तशी स्टेअरिंग, क्लच, ब्रेक, मॅन्युअल गिअर आणि एक्सलरेटर या सगळ्याची सोय त्याने याच्याही या आगळ्यावेगळ्या कारमध्ये करून घेतली.

थोडक्यात, त्याच्याकडच्या गाड्यांच्या जुन्या आणि टाकाऊ भागांचा अतिशय हुशारीने आणि कल्पकतेने या कारच्या निर्मितीसाठी वापर केला.

ज्याच्याकडून एखादी गोष्ट घडायची असते त्याला ती गोष्ट घडायला एखादं छोटंसं निमित्तही पुरतं. ही कार तयार व्हावी अशी दत्तात्रय लोहार यांच्या मुलाची इच्छा होती. भल्याभल्या इंजिनियर्सनाही अशक्य वाटेल अशी ही कल्पना या हुशार माणसाने केवळ ५० ते ६० हजार इतक्याच खर्चात प्रत्यक्षात उतरवली तेही इंजिनियरिंगची कुठलीही पदवी नसताना, फारसं शिक्षण झालेलं नसताना.

 

car inmarathi1

 

एखाद्या बाइकला किक मारली, की जशी ती सुरू होते तशाच प्रकारच्या ‘किकस्टार्ट’ची सोय या कारमध्ये आहे. १ लिटर पेट्रोल मध्ये ४० ते ५० किलोमीटर इतका ऍव्हरेज या कारचा आहे. नॅनोपेक्षाही हा ऍव्हरेज जास्त आहे असं खुद्द दत्तात्रय यांनी सांगितलं.

या कारला दरवाजे नाहीत त्यामुळे ओपन जिप्सी कार, किंवा महिंद्रा थार सारखी ही कार भासू शकते. शिवाय ही ‘लेफ्ट हॅन्ड ड्राइव्ह’ असलेली कार आहे.

आपल्यासारखी कुठलीही व्यक्ती हे वाचून किंवा ऐकून आपसूक ‘वा’ म्हणेल. अनेकांनी हे पाहून दत्तात्रय यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला, पण थेट महिंद्रा ग्रुपचे चेअरमन ‘आनंद महिंद्रा’ यांनी दत्तात्रय यांचं कौतुक करणारं ट्विट केलं तेव्हा खऱ्या अर्थाने दत्तात्रय यांच्या कष्टाचं सोनं झालं आणि कल्पकतेची दखल घेतली गेली.

आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्विटमध्ये ते असं लिहितात, “ही कार नियमांमध्ये बसणारी नाही. पण आपल्याकडच्या लोकांच्या कल्पकतेचं आणि कमीत कमी उपलब्ध साहित्यातून जास्तीत जास्त निर्मिती करण्याच्या क्षमतेचं कौतुक करायला मी कधीही आढेवेढे घेणार नाही.” त्यानंतर त्यांनी या माणसाच्या चारचाकी कारचा व्हिडियो शेअर केला आहे.

या व्हिडियोत दत्तात्रय आपल्याला या कारविषयी माहिती देताना, ती कशी चालवायची हे सांगताना दिसतात. ‘आनंद महिंद्रा’ यांनी आधीच्या त्या ट्विटनंतर आणखीन एक ट्विट केलंय.

 

car inmarathi2

 

त्यात ते असं म्हणतात, “ही कार नियमात बसणारी नाही त्यामुळे स्थानिक अधिकारी आज ना उद्या दत्तात्रय यांना ही कार वापरण्यापासून रोखतील, पण मी त्या बदल्यात त्याला स्वतः ‘बोलेरो कार’ देणार आहे. आमच्याकडच्या लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून त्याची ही निर्मिती ‘महिंद्रा रिसर्च व्हॅली’वर दाखवली जाऊ शकते. कारण, कमीत कमी उपलब्ब्ध साहित्यात जास्तीत जास्त उपयुक्त निर्मिती करणे हेच खऱ्या अर्थाने शक्कल लढवणं आहे.” ‘

आनंद महिंद्रा कायमच अशा कल्पकतेचं कौतुक करत आले आहेत. यापूर्वीही एका व्यक्तीच्या ‘टिपर ट्र्क’ च्या निर्मितीचा व्हिडियो त्यांनी शेअर करत जरी तो ट्र्क असुरक्षित असला तरी लोकांच्या चिकाटीने आणि बुद्धिमत्तेने आपण अचंबित होतो असं म्हटलं होतं.

दत्तात्रय लोहार या असामीची ही निर्मिती आपल्याला आपल्यातल्याच अशा सुप्त क्षमता शोधायला आणि केवळ त्या शोधून स्वस्थ न बसता त्यांच्यावर अथकपणे प्रयत्न करून स्वप्न सत्यात उतरवायला प्रेरणा देते यात शंकाच नाही.

मुळात ही व्यक्ती आपल्याला स्वप्न पाहायला शिकवते. रुळलेल्या वाटेवर चालत न राहता नवनिर्मिती करण्याची उमेद देते. मग आपलं कुठलही क्षेत्रं असो आणि आपलं फार शिक्षण असो अगर नसो!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?