' ...आणि असा पाठवला गेला जगातला पहिला SMS, वाचा रंजक कथा

…आणि असा पाठवला गेला जगातला पहिला SMS, वाचा रंजक कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पूर्वीच्या काळी निरोप्या, दौडकर, घोडेस्वार, सांडनीस्वार असे अनेक निरोप पोचवण्याचे पर्याय उपलब्ध होते. अगदी कबुतरे, हंस यांच्याद्वारे पत्रे पोहोचवली जात असत. कालिदासाने तर आपल्या मेघदूतामध्ये पावसाच्या ढगाला यक्षाचा दूत बनवले होते.

या झाल्या पुराणातल्या गोष्टी, पण तुम्हाला हे माहिती आहे का, की मोबाइल फोनचा शोध लागल्यानंतर पहिला sms ( शॉर्ट मेसेज सर्व्हिस ) कोणी केला होता? नाही ना! चला तर मग जाणून घेऊ ही एसएमएसची गोष्ट.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इतकी प्रगती झाली आहे, की आता तुम्ही प्रत्येक क्षणी कॉल्स आणि व्हिडिओद्वारे तुमच्या प्रियजनांशी जोडलेले राहता, पण जेव्हा स्मार्टफोन आला नव्हता तेव्हा लोक फक्त कॉल आणि मेसेजिंगद्वारे एकमेकांशी जोडलेले होते. तेव्हा व्हाट्सएप किंवा चॅट हे पर्याय ही नव्हते.

 

whatsapp message inmarathi

 

२१ डिसेंबरच्या दिवशी ३० वर्षांपूर्वी जगातील पहिला एसएमएस पाठवण्यात आला होता. हा संदेश व्होडाफोनच्या एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या कर्मचाऱ्याला पाठवला होता. जगातील पहिला एसएमएस नील पॅपवर्थने त्याचा दुसरा भागीदार रिचर्ड जार्विस यांना संगणकावरून पाठवला. तेव्हा रिचर्ड जार्विस हे कंपनीचे संचालक होते.

हा एसएमएस त्यांना ऑर्बिटल 901 हँडसेटवर पाठवण्यात आला होता. नील पापवर्थ हा विकसक आणि चाचणी अभियंता म्हणून काम करत होता. नील पापवर्थ यांनी 2017 मध्ये बोलताना सांगितले, की ‘जेव्हा 1992 मध्ये एसएमएस पाठवण्यात आला होता. तेव्हा तो इतका लोकप्रिय होईल याची कल्पनाही नव्हती’. मग त्याने आपल्या मुलांनाही ही पहिल्या एसएमएस ची गोष्ट सांगितली, जी त्यांच्यासाठी मोठी आश्चर्याची गोष्ट होती.

पहिल्या टेक्स्ट मेसेजमध्ये ‘मेरी ख्रिसमस’ असे लिहिले होते. म्हणजेच पहिला संदेश मेरी ख्रिसमसचा होता. या पहिल्या टेक्स्ट मेसेजमध्ये एकूण 14 कॅरेक्टर होते आणि आता कंपनी त्याचे NFT मध्ये रूपांतर करत आहे.

 

sms inmarathi

 

वोडाफोनने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट केले आहे, की हा मेसेज कंपनीचे पहिले NFT (नॉन-फंगीबल टोकन) असणार आहे. कंपनी या NFT च्या लिलावातून मिळालेली रक्कम निर्वासितांच्या मदतीसाठी UNHCR ला देईल. विशेष म्हणजे 1992 मध्ये पहिला मेसेज आला होता.

यानंतर, 1995 पर्यंत, दरमहा सरासरी केवळ 0.4 टक्के लोक संदेश पाठवत होते. मोबाईल कंपनी वोडाफोनने या एसएमएसचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या एसएमएसच्या डिजिटल प्रतीचा पॅरिसमधील पॅरिस ऑक्शन हाऊस अगुटेस येथे लिलाव केला जाईल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?