' इंश्युरन्सचे हे विचित्र प्रकार ऐकलेत तर हसावं की रडावं कळणार नाही

इंश्युरन्सचे हे विचित्र प्रकार ऐकलेत तर हसावं की रडावं कळणार नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सर्वसामान्य माणसे घराचा विमा, गाडीचा विमा, आरोग्यविमा , जीवनविमा वगैरे उतरवून घेतात. हे सगळे विमा उतरवण्याचे कारण म्हणजे अनपेक्षितपणे यापैकी कशा संदर्भात खर्च उद्भवला तर वेळेवर पंचाईत होऊ नये आणि कुणापुढे हात पसरायची गरज पडू नये, पण यापलीकडे सुद्धा लोक आणखी बऱ्याच गोष्टींसाठी विमा उतरवतात.

त्यातले काही तर इतके विचित्र प्रकार आहेत जे ऐकून तुम्हाला सांगितले तर अजिबात खरं वाटणार नाही, पण या प्रकारच्या पॉलिसीज खऱ्या असतात आणि काही लोक या प्रकारचे विमा खरंच घेतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. परग्रवासीयांनी अपहरण केल्याचा विमा

 

alien stone painting inmarathi

 

एलियन्स किंवा परग्रहवासी खरंच आहेत की नाही हे आपल्याला अजूनही माहिती नाही. कधीमधी एखाददुसरी यूएफओ दिसल्याचा दावा लोक करत असतात, पण पृथ्वी सोडल्यास इतर ग्रहांवर वस्ती असल्याचे पुरावे तर अजूनही शास्त्रज्ञांना मिळाले नाहीयेत.

तरीही मेन इन ब्लॅक किंवा इंडिपेडन्स डे सारखे चित्रपट बघून लोक मात्र घाबरतात, की परग्रहवासी कधीही येऊन आपल्यावर हल्ला करतील किंवा आपले अपहरण करतील आणि याच कारणामुळे युरोपमध्ये अनेक लोकांनी UFO किंवा एलियन अपहरणापासून संरक्षण देणारी विमा पॉलिसी घेतली आहे.

लंडन मधील एक विमा कंपनी अशी पॉलिसी विकते आणि आजवर युरोपमधील ३०,००० लोकांनी ही पॉलिसी घेतली आहे. अर्थात या पॉलिसीचा फायदा करून घ्यायचा असल्यास तुमच्या आजूबाजूला एलियन्स असल्याचा पुरावा मात्र तुम्हाला द्यावा लागेल आणि हे सिद्ध करून दाखवावे लागेल की ते एलियन्स तुमचे अपहरण करण्याच्या प्रयत्नांत आहेत.

२. विवाह विमा

 

marraige inmarathi

 

तुम्हाला एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूसारख्या वैयक्तिक कारणांमुळे लग्नाचा कार्यक्रम रद्द करण्याची आवश्यकता असल्यास हा विमा प्रामुख्याने तुम्हाला होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण देतो.

या पॉलिसीचा आणखी एक भाग म्हणजे तुमचा समारंभ पारंपारिक स्थळाच्या बाहेर आयोजित केल्यास, खराब हवामान, दुखापत किंवा अपघातांपासून संरक्षण हे फायदे देखील ह्या विमा पॉलिसीमध्ये मिळतात.

काही पॉलिसींमध्ये जोडप्याचा हनीमून रद्द झाल्यास त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण देखील समाविष्ट आहे.

३. वेळेवर लग्नाचा विचार बदलल्याचा विमा

 

indian marraige inmarathu

 

हॉल ठरलाय, केटरर ठरलाय, लग्नाची सगळी तयारी झाली आहे , पत्रिका-आमंत्रणे सुद्धा सगळ्यांना पोचली आहेत पण काही कारणाने जर वेळेवर तुमचा लग्नाचा विचार बदलला तर हा विमा तुमच्या कामी येईल. या विम्याचे नाव “चेंज ऑफ हार्ट ऑर कोल्ड फीट कव्हरेज असे आहे.

या विम्यामध्ये लग्नाचा सगळं खर्च उदाहरणार्थ पाहुण्यांची व्यवस्था, केटरर, जागेचे /हॉलचे भाडे, लग्नाच्या कपड्यांचा खर्च , फुलांच्या डेकोरेशनचा खर्च इत्यादी सगळा खर्च कव्हर होतो.

अर्थात तुम्ही हॉलमध्ये पोचल्यानंतर वेळेवर लग्नातून पळून गेलात तर हा विमा लागू होत नाही आणि लग्न रद्द झाल्यास नवरा-नवरीला या विम्याचे पैसे मिळत नाहीत तर त्यांच्या आईवडिलांना विम्याचे पैसे मिळतात.

४. शरीराच्या अवयवांचा विमा

अभिनेते, गायक, क्रीडापटू आणि मनोरंजन क्षेत्रातील लोकांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून भरपूर रक्कम मिळते. त्यामुळे ते ज्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत तो अवयव त्या त्या व्यक्तीसाठी खूप मौल्यवान असतो कारण त्याशिवाय त्यांचे कामच होऊ शकणार नाही.

उदाहरणार्थ, गायकासाठी त्याचा गळा आणि आवाज मूल्यवान असतो तर क्रीडापटूंना त्यांचा शारीरिक फिटनेस महत्वाचा असतो. प्रसिद्ध गायक ब्रूस स्प्रिंगस्टीनने एकदा त्याच्या आवाजाचा सहा दशलक्ष डॉलर्सचा विमा उतरवला होता.

सुपरमॉडेल Heidi Klum ने तिच्या पायांचा २.२ दशलक्ष डॉलर्स पेक्षा जास्त किमतीचा विमा उतरवला होता. जीन सिमन्सने कथितपणे त्याच्या विचित्रपणे लांब, ट्रेडमार्क जिभेचा ७०च्या दशकात १ दशलक्ष डॉलर्सचा विमा उतरवला होता.

 

model inmarathi

 

५. चिकन इंश्युरन्स

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कुत्रा, मांजर असे प्राणी पाळायला आवडतात. हे प्राणी आपल्या घरातील एक सदस्यच होतात. आपण त्यांची लहान बाळाप्रमाणे काळजी घेतो. तसेच जे लोक पशुपालनाचा व्यवसाय करतात त्यांच्याकडे गायी ,म्हशी, बदकं , कोंबड्या, बकऱ्या, डुकरं , उंदीर असे प्राणी पाळलेले असतात.

 

chicken featured inmarathi

 

बहुतांश पेट इंश्युरन्स पॉलिसीजमध्ये ह्या प्राण्यांच्या आजारपणाचे खर्च कव्हर होतात. पण काही कंपन्या अश्याही आहेत ज्या कोंबड्या, बदकं यांचाही विमा उतरवतात.

६. ढेकूण विमा

रेन्टर्स आणि होम ओनर्ससाठी असणाऱ्या विमा पॉलिसी मध्ये सगळ्या गोष्टी कव्हर होत नाहीत. काही बारीकसारीक गोष्टी राहूनच जातात. त्यातील एक म्हणजे घरात होणारे ढेकूण आणि त्यामुळे होणार त्रास!

घरातून ढेकूण बाहेर काढायला पेस्ट कंट्रोलचा बराच खर्च करावा लागतो. आणि तो खर्च करूनही हे ढेकूण परत घरात होणार नाहीत याची कुणीच खात्री देऊ शकत नाही. बरं ज्या गादी ,उश्या, पांघरुणांमध्ये ढेकणं आहेत ती बऱ्याचदा टाकूनच द्यावी लागतात. म्हणजे हे सगळे परत नवीन विकत घेण्याचा खर्च होतो.

पण आता फिकर नॉट! काही इंश्युरन्स कंपन्या घराचा विमा उतरवताना त्यात बेड बग इंश्युरन्ससुद्धा देतात. म्हणजे घरात ढेकूण झाले तरी त्यावर होणाऱ्या खर्च या पॉलिसीमध्ये कव्हर होतो.

७. टेस्ट बड्स इंश्युरन्स

 

 

होय! असाही विमा असतो. फूड क्रिटिक म्हणून काम करणाऱ्या एगोन रोने यांनी त्यांच्या जिभेवरील टेस्टबड्सचा ३९३००० डॉलर्सचा विमा उतरवून घेतला आहे.

८. मिशीचा विमा

आपल्याकडे “मूंछे हो तो नथुलाल जैसी” हा संवाद प्रसिद्ध आहे. मिशी म्हणजे ‘मर्द की शान’, ‘मर्दानगीची ओळख’ समजली जाते. अत्यंत आवडीने विविध स्टाईलची मिशी ठेवणाऱ्यांची जगात कमी नाही. त्यामुळे स्वतःच्या लाडक्या मिशीचा विमा सुद्धा उतरवणारे लोक आहेत.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू मर्व्ह ह्यूज ह्याने स्वतःच्या मिशीचा ३७०००० डॉलर्सचा विमा उतरवून घेतला आहे.

तर असे हे विचित्र प्रकारचे विमा जगात काही ठिकाणी उतरवले आहेत. लोक ज्या बाबतीत असुरक्षित असतात ती गोष्ट ते अधिकाधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनच हे अश्या विचित्र प्रकारचे विमा उतरवण्याचे प्रकार होतात.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?