' यादव कुटुंबियांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी, कोणाकडे किती संपत्ती जाणून घ्या!! – InMarathi

यादव कुटुंबियांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी, कोणाकडे किती संपत्ती जाणून घ्या!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज बॉलीवूडकरांना एकवेळ सिनेमा चालला नाही तरी एकवेळ ठीक आहे मात्र एका गोष्टीने त्यांची झोप नक्की उडाली आहे ती म्हणजे ईडी आणि एनसीबी, मागच्या वर्षी सुशांत सिंग प्रकरणापासून एकूणच बॉलीवूडकर वेगळ्याच कारणांनी चर्चेत आले होते.

एनसीबीने अगदी दीपिका सारा पासून ते आर्यन खान पर्यंत सगळ्यांची सखोल चौकशी केली. आज प्रत्येक बॉलीवूडकर धास्तवाला आहे कारण ईडी किंवा सीबीआय यापैकी कोणीही त्यांच्यावर धाड टाकू शकते. हे झालं बॉलीवूडकरांचा मात्र सत्तेत असलेल्या महविकास आघाडीमधल्या नेत्यांना देखील ईडीने सोडले नाही. मग संजय राऊत असो किंवा प्रताप सरनाईक असो राजकीय मंडळींना ईडीने सोडले नाही.

 

ncb inmarathi

 

हे झालं महाराष्ट्रातील राजकीय मंडळींचे, आता उत्तर प्रदेशच्या राजकीय मंडळींवर तर आयकर विभागाने कारवाई केली आहे, नेमकं कोणत्या नेत्यांवर कारवाई केली आहे चला तर मग जाणून घेऊयात…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

शनिवार दि. १८  डिसेंबर रोजी आयकर विभागाने प्रामुख्याने समाजवादी पार्टीच्या नेत्यांच्या घरावर धाडी टाकल्या. पक्ष प्रमुख अखिलेश यादव यांनी नुकतंच आपल्या काकांसोबत हातमिळवणी केली आहे त्यामुळे भाजपला आता निवडणुकांमध्ये एक नवे आव्हान निर्माण झाले आहे. आयकर विभागाने धाडी टाकल्या तेव्हा त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर संपत्ती आढळून आली आहे.

 

income-tax-InMarathi01
financialexpress.com

 

अखिलेश यादव :

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा असलेले अखिलेश यादव यांच्याकडे तब्बल ३७ करोड रुपयांच्या वर आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी अखिलेश यांच्याकडे ११ करोड रुपयांपर्यंत संपत्ती होती.

 

akhilesh yadav inmarathi

 

शिवपाल सिंग यादव :

अखिलेश यादव यांचे काका शिवपाल सिंग हे प्रगतिशील समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आहेत. पुतण्याप्रमाणे काकांच्या घरावरदेखील धाडी टाकण्यात आल्या त्यांच्याकडे एकूण जंगम मालमत्ता ३ करोड ४२ लाख २६ हजार ६८५ इतकी आहे. ष्टवर मालमत्ता ५ कोटींच्या वर आहे म्हणजे एकूण मालमत्ता ९ करोडच्या वर आहे.

 

akhil inmarathi

डिंपल यादव :

यादव घराण्याची सून म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिम्पल यादव या अखिलेश यादव यांच्या पत्नी आहेत. २०१९ साली लोकसभेसाठी त्या उभ्या राहिल्या होत्या मात्र भाजपच्या उमेदवाराने त्यांना हरवले होते. त्यांच्याकडे एकूण ३७ करोडच्यावर संपत्ती आढळून आली आहे.

 

Dimple-Yadav-inmarathi
rajsthankijaan.com

रामगोपाल यादव :

रामगोपाल यादव हे मुलायम यादव यांचे चुलत भाऊ असून ते स्वतः राज्यसभेवर खासदार आहेत. १९९२ पासून ते सातत्याने राज्यसभेवर खासदार राहिले आहेत. त्यांच्याकडे १० करोडहून अधिक संपत्ती आढळून आली आहे.

 

ram g inmarathi

 

नुकतंच भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी असं वक्तव्य केलं की महाविकास आघाडीतील आणखीन नेत्यांचे घोटाळे समोर आणणार आहेत. याआधी त्यांनी अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक तोंडावर असताना अशा पद्धतीच्या कारवाईमुळे विरोधक पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरणार, निवडणुकांच्या आधी आता आणखीन कोणते प्रकार बघायला मिळणार आहेत हे आता काही दिवसात कळलेच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?