' माधवनच्या या वाईट सवयीमुळे विश्वास नांगरे पाटीलांना त्याच्या रूममध्ये जावंसं वाटत नसे

माधवनच्या या वाईट सवयीमुळे विश्वास नांगरे पाटीलांना त्याच्या रूममध्ये जावंसं वाटत नसे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

थ्री इडियट्स सिनेमा तुम्हाला आठवतोय का? त्यातलं फरहान नावच पात्र आर माधवनने साकारलं होतं. १२ वीला चांगले मार्क्स पाडून तो दिल्लीमधील प्रख्यात इंजियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतो आणि हॉस्टेलमध्ये दाखल होतो. हॉस्टेलमध्ये छोटी मोठी काम करणारा पोऱ्या त्याला हॉस्टेलचे नियम समजावून सांगतो.

थ्री इडियट्समध्ये दाखवलेला शामळू आर माधवन खऱ्या खुऱ्या आयुष्यात मात्र फारच गबाळा होता, आज अनेक तरुणांचे रोल मॉडेल असलेले विश्वास नांगरे पाटील हे आपल्या लाडक्या मॅडीचे एकेकाळी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये रूममेट होते. यावर तुमचा विश्वास बसत नसेल ना? खुद्द विश्वास नांगरे पाटलांनी आपल्या ‘मन मै हैं विश्वास’ या आत्मचरित्रात मॅडीचे काही किस्से सांगितले आहेत, चला तर मग जाणून घेउयात…

 

3 idiots inmarathi

 

थ्री इडियट्समध्ये जसा आर माधवन आमिरच्या स्वभावावर, मैत्रीवर फिदा होतो त्याचप्रमाणे नांगरे पाटील सुद्धा माधवनवर फिदा होते. आर माधवन मूळचा खरा तमिळ मात्र बालपण बिहारमध्ये गेले त्यानंतर कॉलेज शिक्षण आपल्या कोल्हापूरच्या प्रसिद्ध राजाराम कॉलेजमध्ये झाले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कॉलेज विश्व म्हणजे अनेकांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा, स्कॉलर्स लोक कायम लायब्ररीत किंवा शिक्षकांसोबत विविध विषयांवर चर्चा करताना आढळून येतात तर दुसरीकडे काहीजण कॉलेजपेक्षा कॉलेजच्या बाहेर जास्त आढळून येतात, त्यांचं तेच विश्व असते.

 

vishwas patil
medium

नांगरे पाटलांनी आपल्या कॉलेजच्या जीवनातील आठवणींना उजाळा देत आपल्या आत्मचरित्रात (मन मै हैं विश्वास) असं लिहले आहे की, राजाराम कॉलेज म्हणजे श्रीमंतांचे कॉलेज चारचाकी गाड्यांची कायम वर्दळ, लेक्चरपेक्षा श्यामच्या चहाच्या गाडीवर गर्दी अधिक असायची.

अकरावी बारावीच्या काळात हॉस्टेलमध्ये विपरीत परिणाम झाल्याने आता मात्र या हॉस्टेलमध्ये सावधान राहायचं. त्यातच पुढे बॉलीवूडचा स्टार झालेला आर माधवन हा माझा रूम पार्टनर अलॉट झाला होता.

पुढे माधवन विषयी त्यांनी भरभरून लिहले आहे माधवनच्या आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या गोष्टी त्यांनी आवर्जून लिहल्या आहेत. दोस्त असावा तर असा जो मित्राचे चांगले गुण आणि वाईट गुण या दोन्हीबद्दल बोलतो. पुस्तकात ते पुढे म्हणाले की ‘माधवन खूप छान इंग्रजीमध्ये बोलायचा त्यामुळे त्याच्या मागे कायम इंग्रजाळलेल्या मुलींचा ग्रुप असायचा. तो त्यांच्या गराड्यात असायचा’.

 

madi 1 inmarathi

 

माधवन मुलींसोबत कायमच सभ्येतेने वागायचा, तो त्यांच्याशी बोलायचा, हसायचा कॅन्टिनमध्ये बसायचा, त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वावर अनेकजणींची एकतर्फी भुरळ पडत असे. नुसते कॉलेजमध्ये न जाता तो कॉलेजमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करायचा. प्रचंड आत्मविश्वास देखणा असणाऱ्या मॅडीशी माझी गट्टी जमली.

माधवनबद्दल जसे कौतुकाचे दोन शब्द लिहले आहे तसेच त्याच्या वाईट सवयींबद्दलदेखील त्यांनी लिहले आहे ते असं म्हणतात की जितका तो आत्मविश्वासू, मनाने निर्मळ होता तितकाच गबाळा सुद्धा होता. तो अस्ताव्यस्त राहायचा, त्याच्या सॉक्सचा इतका उग्र वास यायचा की रूममध्ये जायची इच्छा होत नसायची.

 

madi inmarathi

एनसीसीच्या दिवसांबद्दल त्यांनी लिहले आहे की, ‘आम्ही दोघे एनसीसीमध्ये होतो. एनसीसीच्या यूथ एक्स्चेंज प्रोग्राममधून तो जपानला जाऊन आला होता. हॉस्टेलच्या मुलांना इंग्रजी शिकवायचा.

एकीकडे राजाराम कॉलेजमध्ये श्रीमंतांची मुले चारचाकी घेऊन येत असत तिथे हे दोघे एक सायकलवर डबलसीट बसून मेसवर जेवायला जात असत. मॅडीच्या अस्खलित इंग्रजीवरून त्यांच्याच ग्रुपमधला एक मित्र कायम मॅडीची तर उडवत असे. तरीदेखील मॅडीने उलट उत्तर दिले नाही, आयुष्याबद्दलच्या त्याच्या आशा आकांशा खूप वेगळ्या होत्या.

मॅडी केवळ मुलींच्याच नव्हे तर शिक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला होता. जितकी त्याची मानसिक शक्ती प्रचंड होती तितकीच शारीरिक शक्ती देखील होती. पंजा लावण्याच्या स्पर्धेत त्याच्यासमोर कोणीच टिकायचे नाही.

 

madhvan and family IM

 

पुढे या दोघांनी आपापली करियर निवडली, देखणा उत्तम वक्तृवकौशल्य यामुळे मॅडीला मनोरंजन क्षेत्रातून अनेक ऑफर्स आल्या, विश्वास नांगरे पाटील यांनी प्रचंड मेहनतीने आपल्या बळावर अधिकारी पदापर्यंत पोहचले.

आज दोघे आपापल्या करियरमध्ये उत्तम काम करत आहे तरीदेखील दोघांची मैत्री तितकीच घट्ट आहे. ३ इडियट्समध्ये जसा आमिर कॉलेजमध्ये सगळ्यांचा फेव्हरेट बनतो, त्याचपद्धतीने मॅडी सुद्धा एकेकाळी कॉलेजविश्वात खरा इडियट होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?