' गिनीज-बुक मध्ये नोंद झालेला हा बॉलीवूड सिनेमा बनवायला लागली तब्बल २३ वर्ष… – InMarathi

गिनीज-बुक मध्ये नोंद झालेला हा बॉलीवूड सिनेमा बनवायला लागली तब्बल २३ वर्ष…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चित्रपट बनवायचा म्हणजे काही सोप्पं काम नाही. आपल्याला दिसताना चित्रपट फक्त ३ तासांचा दिसतो, पण तो बनवण्यामागे प्रचंड मेहनत आणि कालावधी असतो.

आधी चित्रपटाचं कथानक, मग त्याचं लेखन.. त्यानंतर योग्य कलाकारांचा शोध, त्यांच्या तारखा सांभाळून केलेलं शूटिंग, त्यानंतर मग बाकीच्या तांत्रिक गोष्टी.. डबिंग, एडिटिंग आणि बरंच काही.. एवढं सगळं झाल्यानंतर मग चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होतो.

 

popcorn at movies inmarathi

 

आता एवढी मेहनत आणि तयारी करायची म्हणजे वेळ लागणारच ना? कधी कधी काही गोष्टी पटकन जुळून येतात आणि अगदी वर्षभरात चित्रपट होतो, तर कधी कधी गोष्टी जुळण्यासाठी प्रचंड वेळ लागतो आणि वर्षानुवर्षे चित्रपट प्रदर्शितच होत नाही.

तुम्ही अनेक दिग्गज कलाकारांच्या मुलाखतीत ही गोष्ट कायम ऐकली असेल, त्यांनी काम केलेले अनेक चित्रपट प्रदर्शित झालेले नसतात, काहीतरी निमित्त होतं आणि चित्रपट प्रदर्शितच होत नाही. कधी तांत्रिक अडचणी येतात, तर कधी आर्थिक.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बॉलीवूडचा इतिहास खूप जुना आहे, बॉलीवूडला थोडाथोडका नाही, तर तब्बल ११० वर्षांचा इतिहास आहे. ‘मदर इंडिया’पासून अगदी ‘बाहुबली’ पर्यंत अनेक दर्जेदार चित्रपट बॉलीवूडने तयार केले आणि या चित्रपटांनी नवनवीन रेकॉर्ड बनवले, चौकटीची बंधनं तोडली.

 

bollywood inmarathi

 

बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक भाषांमध्ये अनेक चित्रपट तयार होतात, प्रत्येकाचा कालावधी वेगळा असतो, कधी चित्रपट तयार होण्यासाठी १ वर्ष लागतं तर कधी ५-६. पण बॉलीवूडमध्ये एक असा चित्रपट आला होता ज्याने हे सगळे रेकॉर्ड्स मोडले होते. हा चित्रपट तयार होण्यासाठी १-२ नाही तर तब्बल २३ वर्ष लागली होती.

१९८६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव होतं, लव्ह अँड गॉड. या चित्रपटात लैला आणि मजनूची प्रेमकथा दाखवण्यात आली होती. अभिनेत्री निम्मी आणि लैलाची भूमिका, तर संजीव कुमार यांनी मजनूची भूमिका साकारली होती.

 

bollywood inmarathi1

 

के.असिफ यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्वतःचं नाव नोंदवलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की ‘एवढी २३ वर्ष या चित्रपटाला का लागली असतील?’

त्याचं झालं असं, की १९६३ साली या चित्रपटाचं शूटिंग सुरु झालं, त्यावेळी या चित्रपटात अभिनेते गुरुदत्त मजनूची भूमिका करत होते. पण दुर्दैवाने १९६४ साली त्यांचं निधन झालं. त्यामुळे काही काळ या चित्रपटाचं शूटिंग झालंच नाही, नव्या अभिनेत्याचा शोध सुरु झाला.

१९७० मध्ये संजीव कुमार यांनी ‘मजनू’ची भूमिका करायला घेतली, पण त्यानंतर के.असिफ यांची तब्येत खालावली आणि १९७१ मध्ये त्यांचं निधन झालं. यानंतर हा चित्रपट होणारच नाही असं सगळ्यांना वाटत होतं, कारण केवळ १० टक्के शूटिंग झालं होतं, पण के.असिफ यांच्या पत्नी अख्तर असिफ यांनी १५ वर्षांनी के.सी. बारोडिया यांच्या मदतीने पुन्हा एकदा चित्रपटाचं शूटिंग करायला सुरुवात केली.

 

bollywood inmarathi2

 

काही महिन्यातच या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं आणि २७ मे १९८६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला, मात्र या चित्रपटातील अनेक कलाकार तेव्हा हयात नव्हते.

या चित्रपटाचं संगीत नौशाद अली यांनी केलं होतं, तर रफीसाहेब, लतादीदी, आशा भोसले अशा दिग्गज संगीतकारांचे आवाज या चित्रपटाला लाभले होते.

असं म्हणतात, की कधी कधी संकटांची मालिकाच सुरु होते, एक संपलं की दुसरं.. दुसरं संपलं की तिसरं.. काही ना काही विघ्न येतंच राहतात, या चित्रपटाच्या बाबतीतही तसंच काहीसं झालं, मात्र चिकाटीने हा चित्रपट पूर्ण करण्यात आला आणि आज गिनीज बुकमध्ये या चित्रपटाची नोंद आहे.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?