' ”कमीपणा वाटावा असं काही झालेलं नाही”; हार्वर्ड बनावट नोकरी प्रकरणावर निधी राझदानचे भाष्य – InMarathi

”कमीपणा वाटावा असं काही झालेलं नाही”; हार्वर्ड बनावट नोकरी प्रकरणावर निधी राझदानचे भाष्य

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्याच वर्षी जून २०२० मध्ये NDTV ची पत्रकार निधी राझदान हिने तिच्या सोशल मीडिया हॅंडलवरून आपण ही नोकरी सोडून न्यूयॉर्क इथल्या हार्वर्डमध्ये जॉइन करत आहोत असं जाहीर केलं.

यानंतर तीने चक्क इथली नोकरी सोडून थेट न्यू यॉर्क गाठलं आणि तिथे गेल्यावर तीला हे समजलं की आपण एका मोठ्या सापळ्यात अडकलो आहोत, आपल्याला जी नोकरीची ऑफर होती तशी कुठलीच नोकरी त्या यूनिवर्सिटीमध्ये नव्हती.

 

nidhi razdan IM

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आंतरराष्ट्रीय मीडियानेसुद्धा हे सगळं प्रकरण चांगलंच उचलून धरलं आणि भारतात तर निधी राझदान हे नाव रातोरात चर्चेत आलं. यावर नुकतंच एक स्पष्टीकरण आलेलं असून, न्यू यॉर्क टाइम्सने त्यांच्या या रिपोर्टमध्ये नमूद केलं की हार्वर्डमध्ये अशी कोणतीही जागा नव्हती आणि हा एक खूप मोठा घोटाळा आहे.

एवढंच नाही तर या रिपोर्टच्या माध्यमातून NYT ने हिंदू नॅशनलिस्टवर निशाणा साधला आहे, खरंतर या स्कॅममध्ये बऱ्याच लोकांना गोवण्याचा प्रयत्न केला गेला, पण निधी राझदान ही एकटीच महिला कशी या आमिषाला बळी पडली असा प्रश्न उभा केला आहे, तसंच काही लोकांनी निधी यांचा बुध्यांक कमी आहे अशी टिप्पणी केली. शिवाय कोणतीही शहानिशा न करता ही गोष्ट थेट सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर मांडण्याबद्दलसुद्धा स्पष्टीकरण दिलं आहे.

फक्त निधीच नव्हे तर आणखीनही काही पत्रकारांना या ऑनलाइन स्कॅममध्ये गोवण्याचा प्रयत्न केला गेला हेदेखील या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

 

the new york times IM

 

या सगळ्या प्रकराबद्दल निधी हिने भाष्य केलं, तीने तिच्या ट्विटमध्ये म्हंटलं की “मी एका गुह्याला बळी पडले हे सांगायला मला अजिबात लाज वाटत नाही!”

न्यू यॉर्क टाइम्सच्या याच रिपोर्टनुसार सर्वप्रथम महिला पत्रकार रोहिणी सिंग हिलासुद्धा ट्विटरच्या माध्यमातून असाच मेसेज आलेला होता, त्यानंतर आणखीन एका महिला पत्रकाराला जेव्हा असा मेसेज आला, पण तिने याची शहानिशा करायची ठरवली तेव्हा तीला हा एक स्कॅम असल्याचं समजलं आणि तेव्हाच तिने समोरच्या व्यक्तीशी संपर्क कायमचा बंद केला.

याबरोबरच भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यालासुद्धा असाच नोकरीसाठी मेसेज आला होता, इतकंच नाही तर या व्यक्तीकडे त्याच्या पासपोर्ट डिटेल्स मागण्यापर्यंत या लोकांची मजल गेली.

सायबर क्राइमचं हे जाळं केवढं खोलवर पोहोचलं आहे याचा आपल्याला अंदाजसुद्धा नाही, हार्वर्डसारख्या नामवंत संस्थेचा असा वापर होतो आणि त्यांना याची कल्पनासुद्धा नसते हे तर त्याहूनच भयावह आहे.

 

harvard university IM

 

निधी राझदानच्या म्हणण्यानुसार जेव्हा तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या हार्वर्ड इथल्या नोकरीविषयी पोस्ट केली तेव्हा त्यांच्याकडून कोणताही रीप्लाय आला नाही, शिवाय हार्वर्डसारख्या संस्थेच्या नावावर एवढा स्कॅम सुरू असूनसुद्धा त्या संस्थेने याविषयी काहीच वाच्यता न करणे हेसुद्धा तितकेच चुकीचे आहे.

या सगळ्या प्रकरणानंतर जेव्हा निधी राझदानच्या लॅपटॉप डिवाइसची फॉरेनसिक्स तपासणी झाली तेव्हा त्यात मिळालेल्या माहीतीनुसार एका आयपी अॅड्रेसचं कनेक्शन थेट पाकिस्तानी इंटेलिजेंसशी असल्याची गोष्ट स्पष्ट झाली.

याबरोबरच न्यूयॉर्क टाइम्सच्या मते या सगळ्यामागे Hindu Nationalist असण्याच्या शक्यतेला त्यांनी आणखीन एक पुरावा जोडला तो म्हणजे हा सगळा स्कॅम ज्या ट्विटर हॅंडलवरून झाला ते अकाऊंट सीमा सिंग नावाचं होतं, आणि त्या अकाऊंटवर सतत काश्मीरमधल्या राजकारणाविषयी आणि हिंदी मुस्लिम तुष्टीकरणाविषयी विविध पोस्ट केल्या गेल्या होत्या.

 

kashmir IM

 

पण बीजेपी प्रवक्ता यात अडकणं, पाकिस्तानशी यासगळ्या स्कॅमचं कनेक्शन सापडणं या सगळ्या गोष्टींकडे सर्रास दुर्लक्ष करून NYT ने यामागे Hindu Nationalist असल्याची शंका वर्तवल्याने त्यांच्या या रिपोर्टवर प्रश्नचिन्ह उभं राहतंय हे मात्र नक्की.

या सगळ्या प्रकरणाला एक धार्मिक रंग देऊन इंटेलिजेंसचा नेमका काय मनसुबा आहे हे त्यांनाच ठाऊक, पण निधी राजदान आणि इतर लोकांच्या अनुभवावरून आपल्यालाही बरंच शिकण्यासारखं आहे, आणि यातून धडा घेऊनच सायबरक्राईमशी आपण दोन हात करू शकतो!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?