' बच्चन कुटुंबीय EDच्या जाळ्यात? नेमकं प्रकरण काय आहे? – InMarathi

बच्चन कुटुंबीय EDच्या जाळ्यात? नेमकं प्रकरण काय आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूडचे स्टार्स हल्ली शुटिंगच्या सेटपेक्षा ईडी किंवा एनसीबी अशा तपास यंत्रणांच्या कार्यालयात अधिक दिसतात याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. बच्चन कुटुंबियांची लाडकी सुन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला ईडी कार्यालयात पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.

ईडीने चौकशीसाठी ऐश्वर्याला समन्स पाठवली होती, त्याचेच उत्तर म्हणून चौकशीकरिता ऐश्वर्या सोमवारी इडी कार्यालयात हजर झाल्याने आता कोणत्या नव्या प्रकरणात बच्चन कुटुंबाचं नाव येणार? अशी चर्चा सुरु झाली.

 

ncb inmarathi

 

ऐश्वर्याची चौकशी? नक्की कशाबद्दल?

सोमवारी ऐश्वर्याला ईडी कार्यालयात पाहिल्यापासून प्रत्येकाला एकच प्रश्न पडला होता की ऐश्वर्याची चौकशी नक्की कशाबद्दल केली जातीय? असं काय घडलंय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पनामा प्रकरण!

aishwarya rai inmarathi1

 

काही महिन्यांपुर्वी पनामा प्रकरणात बच्चन कुटुंबियांचेही नाव समोर आले होते. त्याचाच भाग म्हणून आता ऐश्वर्याच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ट लागले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काय आहे पनामा प्रकरण?

२०१६ मध्ये, यूकेमध्ये पनामा-आधारित लॉ फर्मचे १.५ कोटी कर कागदपत्र लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती. भारतातील सुमारे ५०० जणांची नावे समोर आली असून त्यात बच्चन कुटुंबाच्या नावाचाही समावेश होता.

एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांना ४ कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले होते. यापैकी तीन बहामामध्ये, तर एक व्हर्जिन आयलंडमध्ये होते. या कंपन्यांचे भांडवल ५ हजार ते ५० हजार डॉलर्स मध्ये होते. या सर्व कंपन्या फक्त कागदावर असणाऱ्या खोट्या कंपन्या होत्या ज्यांचा वापर कर चुकवण्यासाठी आणि काळा पैसा दडवण्यासाठी  गेल्याचा आरोप आहे.

 

panama-papers-marathipiza02
i.infopls.com

या कंपन्या जहाजांचा व्यवसाय करत होत्या, ज्याची किंमत कोट्यावधी होती. पण पेपर वर फक्त काही हजार डॉलर्सची भांडवल असल्याचे दाखवले गेले.

ऐश्वर्याला या पैकी एका कंपनीची डायरेक्टर बनवण्यात आले होते. नंतर त्यांना कंपनीचे भागधारक म्हणून घोषित करण्यात आले. अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ती संचालक होती. त्याचे मुख्यालय व्हर्जिन बेटांवर होते.

ऐश्वर्याशिवाय वडील के. राय, आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य राय हे देखील त्यांचे कंपनीत भागीदार होते. ही कंपनी २००५ मध्ये स्थापन झाली असून त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच २००८ मध्ये ही कंपनी बंद पडली.

याच प्रकरणी काही महिन्यांपुर्वी अभिषेक बच्चनचीही चौकशी करण्यात आली होती. यावेळी अभिषेकने काही कागदपत्र ईडीच्या ताब्यात दिल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या.

आता या प्रकरणात आणखीन किती जणांचा सहभाग आहे हे येत्या काही दिवसात कळेलच, बॉलीवूडकरांच्या मागची ईडीची पीडा काही जात नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?