' प्रेयसी आणि बायकोमुळे कधीकाळी दादासुद्धा तणावाखाली गेला होता? – InMarathi

प्रेयसी आणि बायकोमुळे कधीकाळी दादासुद्धा तणावाखाली गेला होता?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज घरातील किशोरवयीन मुलगा जर घरात अभ्यासात लक्ष देत नसेल तर साहजिकच पालक चिंतेत पडतात, नाना प्रकारचे विचार  पालकांच्या मनात येत असतात. आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी ते दिवसरात्र कष्ट घेत असतात मात्र मुलांच्या मनात नुकतेच तारुण्यात पदार्पण केले असल्याने या गोष्टींची त्यांना समज येत नसते.

तारुण्यातील अनेक गोष्टी त्यांना कराव्याशा वाटतात, कॉलेजला गेल्यावर साहजिकच आपली मैत्रीण/ मित्र असावे असे प्रत्येकाला वाटत असते. आपल्याला आवडत्या व्यक्तीशी सूत जुळून आणि ते जर तुटले तर प्रेमभंगामुळे मुलांच्याआयुष्यावर, अभ्यासावर खोलवर परिणाम होतो. पालकांपर्यंत ही गोष्ट गेल्यावर ते साहजिकच ते नाराज होतात आणि मुलांनाच दोषी ठरवत असतात, खरंतर हा सगळा वयाचा दोष असतो,  काही पालक मात्र कायम हा दोष मुलांनाच देत असतात.

 

indian parents inmarathi

 

मानवी भावभावना हा खरं तर एक सखोल विषय आहे, ज्या माणसाशी आपण भावनिकरीत्या जोडले जातो तिचं व्यक्ती आयुष्यातुन निघून गेली तर मग आपलं मन आपल्याला खात बसत. आपण तणावग्रस्त होऊन जातो. सध्या विराट कोहलीच्या कॅप्टनशिपवरून अनेकजण शंका व्यक्त करत आहेत. भारतातील सर्वोत्कृष्ट कॅप्टनमध्ये त्याची गणना होते. मात्र आज त्याला देखील टीकेला सामोरे जावे लागत आहे.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

विराटच्या समर्थनात आता क्रिकेटचा दादा असलेला सौरभ गांगुलीने उडी घेतली आहे. एका कार्यक्रमात तो बोलताना असं म्हणाला की, “आयुष्यात तणाव बायको आणि प्रेयसीमुळे निर्माण होतो”. दादाचं हे वाक्य खरं तर अखंड पुरुष जमातीला पटण्यासारखे आहे मात्र महिला वर्ग नक्कीच यामुळे नाराज झाला असणार…

 

virat kohli rcb captain inmarathi

 

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं बोलले जाते, दादाच्या करियरमध्ये सुद्धा अनेक चढउतार आले, ऑस्ट्रेलियाच्या एका दौऱ्यानंतर तो ही मानसिक तणावाखाली गेला होता, त्याआधी त्याचा प्रेमाचा त्रिकोण चांगलाच चर्चेत आला होता.

तो काळ होता २०००च्या आसपासचा जेव्हा दादाला इंडिया टीमचा कॅप्टनपदावर विराजमान झाला होता, मात्र त्याचदरम्यान त्याची ओळख नगमा या अभिनेत्रीशी झाली. दादा क्रिकेटच्या मैदानावर बॅटिंग करत होता तर तिकडे नगमा साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये बॅटिंग करत होती.

सूत्रांच्या माहितीनुसार लंडनमध्ये दोघांची ओळख निर्माण झाली. नगमा तेव्हा तामिळ सिनेमामध्ये मोठी अभिनेत्री असल्याने साहजिकच दादा सुद्धा चेन्नईमध्ये तिला भेटत असे. दोघांची प्रेमकहाणी खूपच खुलू लागली होती. दोघांचं नातं घट्ट होत गेलं खरं मात्र याचा परिणाम दादाच्या कामगिरीवर झाला होता.

 

saurav ganguly inmarathi

दादाचं एकीकडे सुरु असलेलं प्रेमप्रकरणं आणि दुसरीकडे खराब कामगिरी यामुळे तेव्हा मीडिया, लोकांनी नगमला जबाबदार ठरवले. प्रकरण दिवसेंदिवस खूपच चिघळत गेले आणि शेवटी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

नगमाने फिल्मीबीटशी बोलताना असं म्हणाली की, जेव्हा अशा गोष्टी जास्त होतात तेव्हा जरी त्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंद आणू इच्छिता तरी त्या व्यक्तीला दुःखच होणार त्यामुळे यातून पुढे जाणे महत्वाचे, इतर गोष्टीमुळे करियर पण धोक्यात आले होते अशावेळी वेगळे होणे हिताचे असते.

 

nagma 1 inmarathi

 

या प्रकरणाची दुसरी बाजू अशीही होती की दादाचे नगमाशी असलेले नातं हे विवाहबाह्य मानले जात होते. कारण दादाचे आधीच डोना या आपल्या मैत्रिणीशीच लग्न झाले होते. असे असूनसुद्धा त्याने नगमाशी प्रेमसंबंध जोडले खरे मात्र ते फारकाळ टिकले नाही. त्याने कधीच हे उघडपणे जाहीर कलेले नाही, मात्र त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे दोघांना परिणामी पत्नीला देखील त्रास झाला होता.

आज दादा जे बोलतो ते कदाचित स्वानुभवावरूनच असेल मात्र अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांचं एक वेगळंच समीकरण असते. मग ते अगदी पतौडींपासून ते आजकालच्या झहीर, विराटपर्यंत असो, दीपिका, अनुष्काला देखील अशा टीकेला सामोरे जावे लागत होते.

 

saurav ganguly inmarathi

 

एकूणच काय रामदास स्वामींनी तेव्हाच म्हंटले आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे? आज प्रत्येकजण तणावाखाली आहे, या तणावासाठी आपणच जबाबदार असतो. नातेसंबंधामध्ये जर तणाव असतील तर योग्यवेळी मार्गदर्शन घ्यावे, बसून चर्चा करावी. आयुष्यात अनेक प्रसंग येणार त्यासाठी आपले मन खंबीर असणे आजच्या काळात गरजेचे आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?