' मुलाच्या स्कँडलमुळे झाली अशी नाचक्की, की पंतप्रधानपदाचं स्वप्न धुळीला मिळालं...

मुलाच्या स्कँडलमुळे झाली अशी नाचक्की, की पंतप्रधानपदाचं स्वप्न धुळीला मिळालं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पंतप्रधान होण्याचं स्वप्न हे राजकारणात काम करणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या उराशी बाळगून असते. मागच्या काही वर्षांचा विचार केला, तर असं म्हणता येईल, की लोकसभेची निवडणूक ही भारतात फक्त नावाला राजकीय पक्षांमध्ये असते. खरी निवडणूक ही त्या दोन्ही पक्षाच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारांमध्ये असते.

आजवरचा इतिहास बघितल्यावर हे लक्षात येतं, की भारताचा पंतप्रधान होण्यासाठी करारी व्यक्तिमत्व, कर्तृत्व, भाषण कौशल्य यासोबतच तुमच्या नशिबाची सुद्धा साथ असावी लागते. लोकसभेच्या निवडणुकीच्या एक वर्ष आधी राजकीय पक्षाची आणि पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची पक्षात, लोकांमध्ये कशी प्रतिमा आहे? यावर पंतप्रधान पद हे मिळत असतं.

 

narendra modi inmarathi

 

‘बाबू जगजीवन राम’ हे जनता पक्षाचे असे राजकीय नेते होते, ज्यांना पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत अग्रस्थानी असूनही त्या पदाने हुलकावणी दिली होती. त्यांच्या मुलाच्या – सुरेश रामच्या प्रेमप्रकरणामुळे ही वेळ जगजीवन राम यांच्यावर आली होती.

सुरेश राम यांचं नाव एका सेक्स स्कँडलमधून लोकांसमोर आलं आणि राजकीय वातावरण या प्रकरणाने पूर्णपणे हादरून गेलं होतं. सुरेश राम यांची राजकीय कारकीर्द यामुळे संपुष्टात आली. बाबू जगजीवन राम यांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. काय होतं हे पूर्ण प्रकरण? जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१९७८ च्या लोकसभेच्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवलेल्या काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. ‘जनता पार्टी’ हा तेव्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता.

मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात लढणाऱ्या जनता पार्टीमध्ये बाबू जगजीवन राम यांचं विशेष स्थान होतं. पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार म्हणून बाबू जगजीवन राम यांच्याकडे त्यांच्या पक्षाचं आणि देशाचं लक्ष लागलेलं होतं.

 

babu jagjivan ram inmarathi

 

नेमकं काय घडलं?

‘सुर्य पत्रिका’ या मासिकाने त्यावेळी सुरेश राम यांचे उत्तरप्रदेश मधील बागपथची रहिवासी असलेल्या एका मुलीसोबत लैंगिक संबंध असल्याची माहिती प्रकाशित केली हाती.

मर्यादित प्रसार माध्यम असलेल्या त्या काळात ही बातमी ‘तहेलका’ करण्यासाठी पुरेशी होती. इंदिरा गांधी यांची सून मनेका गांधी या ‘सूर्य पत्रिका’ या मासिकाच्या संपादिका होत्या.

बाबू जगजीवन राम हे त्यावेळी मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये सुरक्षा मंत्री म्हणून कार्यरत होते. सुरेश राम यांच्या सोबत सर्व वर्तमानपत्रात झळकलेली मुलगी ही त्यावेळी दिल्ली विद्यापीठाच्या सत्यवती कॉलेजमध्ये शिकत होती. सुरेश राम यांनी काही वर्षांनी याच मुलीसोबत लग्न केलं. पण, तोपर्यंत या प्रकरणामुळे बाबू जगजीवन राम यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली होती.

सुरेश राम यांच्या ‘सेक्स स्कँडल’मध्ये के सी त्यागी, ओमपाल सिंग आणि ए पी सिंग सारख्या नेत्यांचं सुद्धा नाव चौकशी नंतर समोर आलं होतं. बाबू जगजीवन राम यांचं राजकीय वर्चस्व संपवण्यात खुशवंत सिंग यांचा मोठा हात होता असं म्हटलं जातं. सुरेश राम यांचं हे प्रकरण बाहेर काढण्यात सुद्धा खुशवंत सिंग यांनीच पुढाकार घेतल्याचं स्पष्ट झालं होतं.

काँग्रेसच्या नेतेपदी असतांना, खुशवंत सिंग हे काँग्रेसचे मुखपृष्ठ असलेल्या ‘नॅशनल हेराल्ड’चे संपादक सुद्धा होते. त्यासोबतच, खुशवंत सिंग हे मनेका गांधी यांच्या ‘सूर्य पत्रिका’ या मासिकाचे सुद्धा सह-संपादक म्हणून काम बघत होते. आजच्या इतकी ‘ब्रेकिंग न्यूज’ची स्पर्धा नसल्याने ही ‘सेक्स स्कँडल’ची बातमी बराच काळ चर्चेत होती.

 

maneka gandhi inmarathi

 

आणीबाणीचा काळ संपल्यानंतर काँग्रेसचा मोठा पराभव करून जनता पक्ष हा लोकांसमोर एक उत्तम पर्याय म्हणून नावारूपास येतांना प्रकाशात आलेलं हे प्रकरण पक्षासाठी सुद्धा डोकेदुखी झालं होतं.

दलित समाजातील पहिला पंतप्रधान होणार या आशेने आनंदी झालेल्या जनतेला सुद्धा बाबू जगजीवन राम यांचं पंतप्रधानपद हुकल्याबद्दल वाईट वाटलं होतं.

जगजीवन राम यांची अजून एक ओळख म्हणजे, काही वर्षांपूर्वी लोकसभा अध्यक्ष असणाऱ्या ‘मीरा कुमार’ यांचे ते वडील होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर जगजीवन राम यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यायचं ठरवलं. काँग्रेस पक्ष त्यांच्या राजकीय रणनीतीमध्ये यशस्वी झाला होता.

सुरेश कुमार यांचं काय झालं?

सुरेश राम यांनी या प्रकरणाची पोलीसात तक्रार नोंदवली होती. आपल्या तक्रारीत त्यांनी सांगितलं होतं की,

“सुषमा चौधरी ही माझी मैत्रीण आहे.  २१ ऑगस्ट १९७८ रोजी आम्ही माझ्या मर्सिडीज कारमधून जात असतांना १० लोकांनी आमची गाडी थांबवली आणि हे फोटो बळजबरी काढण्यात आले आहेत.”

सुरेश राम यांच्या या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. कारण, तो स्वतः एक दारुडा माणूस होता. सुषमा चौधरी आणि सुशील राम यांच्यात पाठवण्यात आलेली प्रेमपत्र सापडल्यामुळे पोलीस आणि प्रसार माध्यम या प्रकरणात तथ्य आहे या निष्कर्षावर आले होते.

सुषमा चौधरी ही एक मध्यमवर्गीय मुलगी होती, जिने सुरेश राम यांच्या संपत्तीवर डोळा ठेवून हे काम केलं होतं, अशी माहिती नंतर समोर आली. सुरेश राम सोबत लग्न केल्यानंतर हे दोघं सरकारी बंगल्यात राहत होते. जगजीवन राम यांनी मात्र या प्रकरणानंतर आपल्या मुलाला घराबाहेर काढलं होतं आणि संपत्तीतून बेदखल सुद्धा केलं होतं.

बाबू जगजीवन राम यांना मिळणारं पंतप्रधान पद हे चौधरी चरण सिंग यांच्याकडे गेलं होतं. इंदिरा गांधी यांच्या इतकीच लोकप्रियता असलेला जगजीवन राम हा नेता, धान्यातून खडा बाजूला करावा तसा काँग्रेसने राजकारणातून बाजूला काढून टाकला होता.

 

chaudhari charan singh inmarathi

 

जगजीवन राम यांच्या राजकारणातील संन्यासामुळे जनता पक्ष पूर्णपणे कोलमडून गेला होता. सुरेश राम आणि सुषमा चौधरी यांचे १० फोटो एका निनावी पत्रातून खुशवंत सिंग यांना पाठवले जातात आणि त्यामुळे देशाचा पंतप्रधान बदलतो; असं काहीतरी खळबळजनक घडण्याची ती पहिलीच वेळ होती म्हणून या घटनेला फार महत्त्व आहे.

जगजीवन राम यांची कन्या मीरा कुमार यांनी नंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सुरेश राम यांचं वयाच्या ४६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सुषमा चौधरी त्यानंतर कुठे गेल्या? याबद्दल नंतर कुठेच माहिती प्रसिद्ध झाली नाही.

meera kumar inmarathi

 

राजकीय खेळी आणि डावपेच हे राजकारणाचा भाग आहे. पण, एका राजकीय नेत्याच्या नातेवाईकाच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल अशी माहिती समोर आणण्याची ही पहिलीच वेळ होती.

चांगल्या गोष्टींकडे लक्ष देऊन अप्रिय गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हे १९७८ च्या लोकांच्या स्वभावात नव्हतं असं म्हणता येईल. आज असे कित्येक फोटो इंटरनेटवर प्रसिद्ध होत असतात. पण, त्यामुळे लोकांचं मत बदलत नाही.

राजकीय पक्ष सुद्धा मंत्री पदावर असलेल्या व्यक्तींच्या व्यक्तिगत आयुष्यातील प्रकरण समोर आली तरीही त्याकडे कानाडोळा करतात हे सध्या बघायला मिळत आहे. राजकीय पक्ष आणि मीडिया यांनी नैतिकतेला धरून काम केलं तर भारताची लोकशाही सारखी सुंदर गोष्ट नाही. हो ना?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?