' ख्रिश्चन धर्माची पवित्र व्हेटीकन सिटी म्हणजे एक शिवलिंग आहे का?

ख्रिश्चन धर्माची पवित्र व्हेटीकन सिटी म्हणजे एक शिवलिंग आहे का?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

तुम्ही देखील बऱ्याच जणांना असे मत मांडताना ऐकले असेल की,

व्हेटीकन शहर हे शंकर देवांना समर्पित केलेले एक मंदिर होते.

ही गोष्ट कितपत खरी खोटी मानायची हा विचार प्रत्येकाने स्वत:च केलेला बरा, कारण या संदर्भात ठोस असे मत मांडता येणे अशक्य आहे, पण इतिहासकार पी.एन.ओक यांनी आपल्या शोधात हे सांगितले आहे की,

त्यांच्या शोधानुसार मुस्लिम आणि ख्रिश्चन दोन्ही धर्मांशी हिंदू धर्म निगडीत आहे. व्हेटीकन शहराव्यतिरिक्त काबा आणि ताजमहल सुद्धा मुळात शंकर देवांना समर्पित असलेली मंदिरे आहेत.

pn-oak-marathipizza01
hindujagruti.org

आज हा लेख त्यांच्याच शोधावरच आधारित आहे. या लेखात आपण त्यांनी मांडलेल्या ख्रिश्चन धर्माचे पवित्र शहर ‘व्हेटीकन सिटी’ आणि ‘शिवलिंग’यांमध्ये असलेल्या अदभूत समानतेविषयी जाणून घेणार आहोत.

हे जग धर्माच्या एका मजबूत आधारावर उभे आहे आणि यात काही शंका नाही की धर्मच माणसाला योग्य व संयमित जीवन जगण्यासाठी प्रेरित करतो. ह्या जगात वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात, ज्यांची मान्यता आणि आदर्श एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. आपण या मुख्य चार धर्म हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन यांच्याशी परिचित आहोत, इथे आपण जर इतिहासकार पी.एन.ओक यांचे म्हणणे खरे मानले तर धर्म कोणताही असो पण त्याचा उगम सनातनी धर्म म्हणजेच हिंदू धर्मापासूनच झालेला आहे असे म्हणावे लागेल.

sanatan-dhama-marathipizza01
youtube.com

आपल्या म्हणणे खरे कसे आहे हे सांगताना पी.एन.ओक यांनी काही उदाहरणे ही दिली आहेत. त्यामधील व्हेटीकन सिटीचे उदाहरण मुख्य आहे.

ओक यांचे म्हणणे आहे की, व्हेटीकन शब्दाचा उगम हिंदीमधील ‘वाटिका’ या शब्दाने झाला आहे .एवढच नाही तर त्यांचे हे सुद्धा म्हणणे आहे की, ख्रिश्चन धर्म म्हणजे ‘क्रिश्चनिटीला’ सुद्धा सनातन धर्माच्या ‘कृष्ण निती’ आणि अब्राहमला ‘ब्रम्हा’ मधून घेतले आहे. पी.एन.ओक यांचे म्हणणे आहे की, मुस्लिम आणि ख्रिश्चन दोन्ही धर्म वैदिक मान्यतांच्या विरुपणाने जन्मले आहेत.

व्हेटीकन शहराची रचना आणि शिवलिंगाच्या आकृतीमध्ये एक विलक्षण साम्य आहे.

vatican-city-marathipiza01
indiadivine.org

या फोटोला बघून तुम्ही समजू शकता की हिंदूंचे पवित्र प्रतिक असणारे शिवलिंग आणि व्हेटीकन शहराच्या प्रांगणाच्या रचनेमध्ये आश्चर्यकारक साम्य आहे.

शंकर देवांच्या माथ्यावर तीन रेषा (त्रिपुंडर) आणि एक बिंदू असतो, ह्या रेषा शिवलिंगावर पण समान रुपात काढलेल्या असतात. नीट लक्ष देऊन बघितल्यास लक्षात येते की, ज्या तीन रेषा आणि बिंदू विषयी आपण बोलत आहोत, त्या पिआजा सेन पिएट्रोच्या रुपात व्हेटीकन शहराच्या आकारा मध्ये समाविष्ट आहेत.

vatican-city-marathipiza02
youtube.com

इतिहासकार पी.एन.ओक यांच्या म्हणण्यानुसार व्हेटीकन शब्दाला संस्कृतच्या वाटिका म्हणजेच वैदिक सांस्कृतिक केंद्रामधून घेतले आहे. याचा अर्थ आहे की ख्रिश्चन धर्माच्या उगमाच्या खूप आधी व्हेटीकन म्हणजे वैदिक केंद्रा सारख्या शब्दाचे अस्तित्व होते.

व्हेटीकन शहरामध्ये केलेल्या एका खोदकामाच्या वेळी सुद्धा एक शिवलिंग मिळाले होते, जे ग्रिगोरीअन एट्रुस्कॅन म्युझियम मध्ये ठेवले आहे.

vatican-city-marathipiza03
BooksFact

इतिहासकार पी.एन.ओक असेही मत मांडतात की,

पहिल्यांदा ख्रिश्चन धर्म सुद्धा वेदिक धर्म होता जो कृष्ण निती वर आधारलेला होता. ह्याचे नाव सुद्धा कृष्ण नितीच होते नंतर त्याला इंग्रजीच्या क्रिश्चनीटी मध्ये परिवर्तीत केले गेले.

ह्या व्यतिरिक्त मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचे लोक आमीनला स्विकारतात ते सुद्धा ब्रम्हांडचे सूर ‘ओम’ चेच एक रूप आहे असे मत इतिहासकार पी.एन.ओक हिरहिरीने मांडतात.

om-amen-aum-marathipizza
dreamstime.com

वरील मांडणी म्हणजे निव्वळ  दावा असून तो कितपत खरा मानावा याबद्दल शंका आहे. तरीही एक रंजक गोष्ट वाचकांपुढे यावी या भावनेने हा लेख प्रकाशित केला गेला आहे. यावर अनेकांची मतमतांतरे असू शकतात, जर या विषयी आपल्याला देखील अधिक माहिती असल्यास ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?