' सई आणि प्रियाच्या 'वजनदार' नंतर हुमा आणि सोनाक्षी करणार 'बॉडी शेमिंगवर' भाष्य!

सई आणि प्रियाच्या ‘वजनदार’ नंतर हुमा आणि सोनाक्षी करणार ‘बॉडी शेमिंगवर’ भाष्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

झिरो फिगर आणि मराठी अभिनेत्री म्हटलं की काही नावं अगदी सहज आठवतात. मराठी अभिनेत्रींच्या नावांच्या या यादीत दोन नावं अगदीच दिमाखात घेतली जातात. ती दोन नावं म्हणजे सई ताम्हणकर आणि प्रिया बापट.

याच दोघीजणी जेव्हा ‘वजनदार’ बनून मोठ्या पडद्यावर अवतरल्या तेव्हा मात्र त्यांनी धमाल उडवून दिली. ‘बॉडी शेमिंग’सारख्या महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारी एक उत्तम आणि दर्जेदार कलाकृती मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

 

vajandar IM

 

बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनातही या सिनेमाने वरचं स्थान पटकावलं. सई आणि प्रिया यांनी आधी वाढवलेल्या आणि मग कमी केलेल्या वजनाची चर्चा तर झालीच, मात्र या चित्रपटातून लोकांपर्यंत पोचवला गेलेला संदेश सुद्धा त्यांना कळला, पटला आणि रुचला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘बॉडी शेमिंग’सारख्या संवेदनशील विषयांवर भाष्य करणं आणि अशा चुकीच्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे, हे लोकांना मनोमन पटलं. काहींच्या वागण्यात बदलही घडले.

याच संवेदनशील विषयावर बॉलिवूडने पुन्हा व्यक्त व्हायचं ठरवलं आहे. या विषयावर एक नवा चित्रपट येऊ घातला आहे. सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत.

 

sonakshi and huma IM

चित्रपटाविषयी थोडंसं…

‘बॉडी शेमिंग’चा विषय बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा हाताळला जात नाहीये. कधी कधी या महत्त्वाच्या विषयावर योग्य भाष्य करत लोकांचं प्रबोधन करणारे चित्रपट बनवणारं बॉलिवूडच कधी चित्रपटांमधून मोठ्या प्रमाणात बॉडी शेमिंगचा वापर करताना पाहायला मिळतं.

यावेळी मात्र ‘डबल एक्सएल’ चित्रपट येऊ घातलाय. बॉडी शेमिंगचा त्रास सहन करणाऱ्या दोन स्त्रिया आणि त्यांचं आयुष्य असं या चित्रपटाच्या कथानकाचं स्वरूप आहे. जाड असण्याबद्दल टक्केटोणपे सहन करणाऱ्या या चित्रपटात या दोन स्त्रियांच्या मुख्य भूमिका साकारल्या आहेत त्या हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा या दोघींनी!

या चित्रपटाचा विषय काहीसा गंभीर असला, यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला असला, तरी या चित्रपटाची मांडणी मात्र विनोदी ढंगात करण्यात आली आहे.

 

 

एक चांगली आणि हलकीफुलकी विनोदी कलाकृती म्हणून सुद्धा या चित्रपटाचा आनंद लुटता येईल.

कास्टिंग अगदीच योग्य :

बॉलिवूडमधील पदार्पणापासूनच, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हिला तिच्या वजनावरून ट्रोल केलं जातं. हुमाचं नावसुद्धा या ट्रोलिंगच्या यादीत समाविष्ट आहेच. सोशल मीडियावरील ट्रोलिंगकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या या अभिनेत्री आता तशीच काहीशी भूमिका पडद्यावर साकारताना पाहायला मिळतील.

दिल्लीच्या शहरी भागात राहणारी सायरा खन्ना हिची भूमिका सोनाक्षीने साकारली असून, मेरठमधील राजश्री त्रिवेदी हे पात्र हुमाने साकारलं आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर युट्युबवर रिलीज झाला असून, यात हुमा आणि सोनाक्षी एकमेकींना ‘बॉडी शेम’ करताना पाहायला मिळत आहेत.

खऱ्या आयुष्यात बॉडी शेमिंगचा दांडगा अनुभव असल्यामुळे आम्ही दोघी या भूमिका निभावण्यासाठी पात्र आहोत, असं मत या अभिनेत्रींनी मांडलं आहे.

 

sonakshi and huma IM 2

 

या दोघींनी व्हिडिओसह टाकलेलं कॅप्शन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतंय. “साईझ लार्ज, स्वप्नं एक्सट्रा लार्ज. २०२२ च्या उन्हाळ्यात प्रतिक्षा संपणार” असं म्हणत या कॅप्शनमध्ये “बात हैं वजन में” असं सुद्धा लिहिलेलं दिसतंय.

वजनावर भाष्य करणाऱ्या या सिनेमाच्या प्रमोशनचं वजन वाढावं यासाठी कलाकारांनी टिझरपासूनच कंबर कसली आहे. याशिवाय चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन याविषयी सुद्धा प्रेक्षकांना उत्सुकता असणार हे नक्की.

लेखक-दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांची कथा आणि ‘हेल्मेट’ फेम सतराम रामाणी यांचं दिग्दर्शन यामुळे चित्रपट उत्तम असणारच अशी चर्चा आहे.

बॉडी शेमिंगचा अनुभव घेतलेल्या या अभिनेत्रींनी साकारलेल्या या भूमिका आणि त्यांचा ‘डबल एक्सएल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती वजन पाडू शकेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?