' UP Elections; योगींना चारी मुंड्या चीत करण्यासाठी ‘काका-पुतण्याची’ परत एकजूट! – InMarathi

UP Elections; योगींना चारी मुंड्या चीत करण्यासाठी ‘काका-पुतण्याची’ परत एकजूट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाविकास आघाडीने नुकतीच दोन वर्ष पूर्ण केली, सत्तेत आल्यापासून विरोधकांनी टूम लावली होती की हे सरकार तीन महिन्यात पडेल, सहा महिन्यात पडेल मात्र तसे काही झाले नाही. सत्तेत असलेल्या मंत्र्यांचे आपापसातले हेवेदावे समोर आले खरे मात्र सत्तेत राहायचे असल्यास बाकी सगळ्या गोष्टींवर पाणी सोडावे लागते हे त्यांना नंतर लक्षात आले असावे.

महाविकास आघाडीचे चाणक्य म्हणून संजय राऊत जरी ओळखले गेले असले तरी शरद पवार हे राजकारणातील भीष्म पितामह आहेत. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहेच मात्र राजकारणात त्यांनी अनेक मातब्बर लोकांना चितपट केले आहे.

महाविकास आघाडी स्थापन व्हायची आधी त्यांचे पुतणे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सूत जमवले होते मात्र अवघ्या तीन दिवसात त्यांचा संसार मोडला.

 

mahavikas aghadi inmarathi

 

काकांशी असलेलं संबंध तोडून ते विरोधकांना मिळाले हे कदाचित काकांना पटले नसावे किंवा त्यांचीच ही खेळी असे अनेक तर्क तज्ञ लोकांनी लावले, नक्की काय झालं आहे त्यानंच ठाऊक, महाराष्ट्रात काका पुतणे वाद नवा नाही, स्व. बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे, गोपीनाथ मुंडे धनंजय मुंढे या काका पुतण्यांच्या वादाच्या कथा आपल्याला माहीतच आहेत.

 

 

काका पुतण्या वाद पेशवाई काळापासूनच आपल्याकडे अस्तित्वात आहे, मात्र यूपीमधल्या काका पुतण्यांनी आपापले वाद विसरून निवडणुकांसाठी एकत्र आले आहेत, चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते…

 

balasaheb thackeray uddhav thackeray raj thackeray inmarathi

 

यूपीतले काका पुतण्या :

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी त्यांचे काका शिवपाल यादव यांची काल भेट घेतली, निवडणुकांच्या धर्तीवर युती संदर्भात त्यांची  ४५ मिनिटे चर्चा केली. सरकार स्थापन केल्यांनतर ज्याप्रमाणे अजित पवार यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली होती त्याच प्रमाणे अखिलेश यादव याणी देखील काकांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

 

akhil inmarathi

 

काका पुतणे एकत्र आले हे खरे मात्र एक मुद्दा उपस्थित राहतो तो म्हणजे निवडुकांसाठी जागा वाटपाचा, याबद्दल त्यांनी अद्याप कोणती घोषणा केली नसून काही दिवसात ते आपल्यासमोर येईलच, आपल्यातील हेवेदावे बाजूला ठेवून आज सत्तेत असलेल्या भाजपला शह देण्यासाठी हे काका पुतणे एकत्र आले आहेत, मात्र हेच काका पुतणे आधीच्या निवडणुकांमध्ये वेगवगेळे लढले होते..

काका पुतण्यांमधील वाद :

शिवपाल यादव हे मुलायम सिंग यांचे धाकटे बंधू, अखिलेश यादवांचे २०१२ ते १७ मध्ये सरकार असताना शिवपाल यांनी अनेक महत्वाची खाती सांभाळली होती. २०१७ साली मुलायम सिंग यांच्याकडून पक्षाची सर्व सूत्रे अखिलेश यादवांनी आपल्याकडे घेतली, त्याधीपासून त्यांनी आपले पक्षातील स्थान निर्माण करण्यास सुरवात केली होती.

२ जून २०१६ साली शिवपाल यादवांच्या परवानगीनेच कौमी दलाचे सपामध्ये विलानीकरण करायचे ठरवले होते मात्र अखिलेश यादवांनी त्याला विरोध केला आणि त्यांनी थेट पक्षातील ज्येष्ठ कॅबिनेट मंत्रीबलराम यादव यांची हकालपट्टी केली. साहजिकच शिवपाल यादव या कारणामुळे संतापले.

 

akhilesh yadav inmarathi

दोघांच्यातील वाद साहजिकच समोर येत असल्याने पक्षातील इतर नेत्यांची प्रकरण देखील भर येत होती. अखिलेश यादव यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. काका पुतण्यामधील वाद वाढतच गेला आणि शिवपाल यादवांनी अखेर पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आपल्या भावाच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी हा पक्ष मोठा केला होता.

२०१२ साली त्यांनी २२४ जागांवर विजय मिळवला होता मात्र २०१७ साली अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली केवळ ४७ जागांवर त्यांना विजय मिळवता आला. २०१८ साली शिवपाल यादवांनी आपला स्वतःचा वेगळं पक्ष स्थापन केला.

 

akhil 1 inmarathi

 

आज उत्तर प्रदेशात फक्त एकच नाव घेतले जाते ते म्हणजे योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदींनी देखील नुकतीच वाराणसीला भेट देऊन एक प्रक्रारे आपले शक्ती प्रदर्शनच केले. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्षाच्या काळात  एक हाती सत्ता आपल्याकडे ठेवली होती त्याचपद्धतीने योगींनी देखील आपली सत्ता ठेवली आहे, आता यूपीचे हे काका पुतणे योगींना कितपत भारी पडतील हे निवडणुकांनंतर आपल्यासमोर येईलच…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?