' "भन्साळी मला सेटवर मारायचे, शिवीगाळ करायचे कारण.." रणबीरचा गौप्यस्फोट!

“भन्साळी मला सेटवर मारायचे, शिवीगाळ करायचे कारण..” रणबीरचा गौप्यस्फोट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विकी कतरीनाचा विवाह सोहळा संपन्न झाला, पण तिची लग्नापेक्षा अधिक चर्चा होती ती तिच्या आधीच्या रिलेशनशिपची म्हणजेच सलमान आणि रणबीरची. गेल्या काही आठवड्यात या संदर्भात आपण बरेच मीम्स, जोक्स सोशल मीडियावर पाहिले असतील, वाचले असतील फॉरवर्डही केले असतील.

आता रणबीर पुन्हा एकदा चर्चेत आलाय पण एका वेगळ्याच वादग्रस्त कारणासाठी. रणबीर कपूर हा सगळ्यांचाच लाडका अॅक्टर आहे, फिल्म इंडस्ट्री असो किंवा प्रेक्षक सगळेच त्याच्याकडे पुढचा सुपरस्टार म्हणूनच बघतात, शिवाय कपूर खानदानाचा वरदहस्त त्याच्यावर असतानाही त्याने त्याच्यातलं टॅलेंट जगापुढे मांडलं आहे आणि म्हणूनच आज तो यशस्वी आहे.

 

 

कपूर खानदानात जन्म घेऊनसुद्धा त्याने प्रथम असिस्टंट डायरेक्टरपासून या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याकडे त्याने असिस्टंट म्हणून काम करायला सुरुवात केली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आणि याच भन्साळी बॅनरखाली रणबीर कपूरला त्याचा पहिला ब्रेक मिळाला, तो म्हणजे सावरिया. खुद्द शाहरुखच्या ओम शांती ओम समोर हा सिनेमा प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सपशेल आपटला पण रणबीरच्या उज्ज्वल भविष्याबद्दल तेव्हापासूनच चर्चा व्हायला सुरुवात झाली.

 

ranbir and sonam inmarathi

 

ज्यांनी आपल्याला या इंडस्ट्रीमध्ये ब्रेक दिला त्या संजय लीला भन्साळी यांच्या कार्यपद्धतीवर टिप्पणी केल्याने रणबीर पुन्हा चर्चेत आहे. संजय लीला भन्साळी आम्हाला मारायचे शिवीगाळ करायचे, असं रणबीरने नुकतंच स्पष्ट केलं आहे, नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया!

द ग्रेट शोमन राज कपूर यांच्या आयुष्यावर आधारित एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला रणबीरने हजेरी लावली होती तेव्हा एका पॅनल डिस्कशनमध्ये त्याने हे स्पष्ट केलं की “जेव्हा तो ब्लॅक सिनेमासाठी भन्साळी यांना असिस्ट करत होता तेव्हा ते त्यांना मारायचे, शिवीगाळसुद्धा करायचे!”

शिवाय एका स्टारकीडप्रमाणे नाही तर एका सामान्य असिस्टंटप्रमाणे भन्साळी रणबीरला वागवत असे. “मी तासंतास गुढग्यावर बसून असायचो, ते मला मारायचे शिवीगाळ करायचे जेणेकरून आम्ही आमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करून दाखवू, केवळ माझ्या हितासाठी ते आम्हाला अशी वागणूक द्यायचे. सध्याचे तरुण दिग्दर्शक हे फक्त व्यावसायिक गोष्टींच्या मागे धावत आहेत!”

 

ranbir with bhansali im

रणबीरच्या या स्टेटमेंटचा अर्थ असा होता की जगात survive करण्यासाठी भन्साळी हे अशी वागणूक त्यांच्या असिस्टंटना देत असत. पण रणबीरच्या या वक्तव्याशी कुणीच सहमत नाही असं दिसतंय.

कारण कितीही शिस्तप्रिय किंवा कठोर दिग्दर्शक जरी असला तरी एखाद्या व्यक्तीला मारहाण करणं किंवा शिवीगाळ करणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न येतोच त्यामुळे आपण केलेलं स्टेटमेंट सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न रणबीरला चांगलाच महागात पडला असल्याचं दिसून येत आहे.

रणबीरच्या या व्यक्तव्यामुळे फिल्म इंडस्ट्रीतल्या unprofessional work culture बद्दल सगळीकडेच चर्चा होत आहे. आज रणबीरने मारहाण किंवा शिवीगाळ या अगदी किरकोळ गोष्टी असल्याचं स्पष्ट केलंय, उद्या कुणी एखादा अभिनेता कास्टिंग काउचसारखी गोष्ट फार सामान्य आहे असं स्पष्टीकरण देइल, तेव्हा त्याकडे आपण गांभीर्याने बघणारच ना?

 

bhansali ranbir im

 

मुळात कुणी स्टारकीड असो वा नसो, तुमचा पेशा कोणताही असो, तुम्ही वयाने आणि अनुभवाने कितीही मोठे असो दुसऱ्याला विनाकारण शिवीगाळ करणं किंवा मारहाण करणं हे चुकीचंच आहे.

फिल्म इंडस्ट्रीतल्या या मोठमोठ्या कलाकारांनी त्यांना मिळणारी चुकीची वागणूक किंवा डिप्रेशन अशा गोष्टींना ग्लोरिफाय करणं थांबवायला पाहिजे, रणबीर हा अभिनेता म्हणून उत्तम आहेच पण भन्साळी यांच्या वागणुकीला समर्थन देणं एक माणूस म्हणून चुकीचं आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?