' ‘तबलिघी जमात म्हणजे छुपे दहशतवादी’ : सौदी अरेबियाने घातली बंदी – InMarathi

‘तबलिघी जमात म्हणजे छुपे दहशतवादी’ : सौदी अरेबियाने घातली बंदी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगातील सर्व मुस्लिम राष्ट्र हे कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला आपलंसं करतात हा एक चुकीचा समज काही लोकांमध्ये आहे. मुस्लिम राष्ट्र हे जितके धर्माधिष्ठित आहेत तितकेच ते शिस्तप्रिय सुद्धा आहेत. नियम सर्वांसाठी सारखा आणि त्याची विनाचर्चा अंमलबजावणी यामुळे सौदी, कुवैत, युएई, कतार, ओमान सारख्या देशांचं आतंकवादावर पूर्णपणे नियंत्रण असल्याचं दिसून येतं.

पाकिस्तान, अफगाणिस्तान सारख्या देशांना हे गल्फ मधील देश स्पष्ट विरोधही करत नाहीत आणि फार जवळही येऊ देत नाहीत हे विशेष आहे.

 

saudi oil inmarathi
straitstimes.com

 

धार्मिकता आणि त्यामागे दडलेला आतंकवाद योग्यपणे हेरणाऱ्या सौदी अरेबियाने नुकतंच ‘तबलीघी’ जमातीवर बंदी घालून आपण केवळ धर्माचे पुरस्कर्ते नसून शांततेचे पुरस्कर्ते आहोत हे परत एकदा दाखवून दिलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘तबलीघी जमात’ काय आहे ?

धर्मप्रसाराचा मास्क घालून जगाला त्रास देणारे हे तेच लोक आहेत जे एप्रिल २०२० मध्ये दिल्लीच्या ‘मरकज’ मस्जिदमध्ये कोरोनाच्या बंधनांना झुगारून एकत्र आले होते. सुन्नी इस्लामिक मिशनरी चळवळीतून निर्माण झालेली ‘तबलीघी’ जमात ही मौलाना मोहम्मद इलियास खंधला या व्यक्तीने १९२७ मध्ये हरियाणा मधील ‘मेवात’ येथे सुरू केली होती.

 

tablighi jamat inmarathi
india today

 

१९४१ मध्ये त्यांनी आपली पहिली बैठक आयोजित केली होती ज्याला उत्तर भारतातील २५,००० लोकांनी हजेरी लावली होती. भारताबाहेर या लोकांनी अमेरिका, ब्रिटन, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर सारख्या देशात जाऊन आपली संघटना मोठी केली.

‘तबलीघी’ जमात एकत्र येऊन काय करतात ?

सोशल डिस्टन्सिंगचं अजिबात भान नसणारे हे लोक आजही १० लोकांच्या घोळक्याने सकाळी ८ ते ११ या वेळात भेटतात. धर्म प्रसारासाठी पैसे गोळा करतात आणि ते त्यांच्या प्रमुखांकडे जमा करतात. दुपारी ३ ते ५ हे लोक नवीन लोकांना इस्लाम मध्ये कसं समाविष्ट करता येईल यावर चर्चा करतात. संध्याकाळी हे लोक कुराण पठण करतात आणि प्रोफेट मोहम्मद यांचा जीवन अभ्यास करतात.

 

tablighi jamaat inmarathi
the print

 

तबलीघी जमातीने भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान मध्ये आपले ‘ निझामुद्दीन कॅम्प’ तयार केले आहेत. दरवर्षी हे लोक या देशांमध्ये एकत्र येतात. बांगलादेश मध्ये २०२० मध्ये झालेल्या कॅम्प मध्ये २० लाख लोक एकत्र आल्याची बातमी प्रकाशित झाली होती. मौलाना साद कंधलवी हा मौलाना मोहम्मद इलियासचा पणतू आता या संघटनेला पुढे नेतोय.

सौदी अरेबियाने बंदी का आणली ?

‘समाजाला घातक’ असा तबलीघी जमातीचा उल्लेख करून सौदी अरेबियाने या १५० देशांमध्ये पसरलेल्या जमातीच्या कार्यक्रमांना आपल्या देशात पसरू न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ६ डिसेंबर २०२१ रोजी सौदीच्या मिनिस्ट्री ऑफ इस्लामिक अफेयर्स यांनी एक ट्विट करून ‘तबलीघी जमात ही आतंकवाद पसरवणारा समाज’ आहे असं जाहीरपणे सांगितलं आहे.

 

Saudi Arabia king InMarathi

 

सौदी अरेबियाने हे केवळ ट्विट नाही तर शुक्रवारच्या नमाज मध्ये सुद्धा तबलीघी जमातीबद्दल लोकजागृती निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत. “लोकांना धर्मांध करून त्यांची दिशाभूल करणे, कोणतेही नियम न पाळणे आणि आतंकवादाचा प्रसार करणे, हा या जमातीचा मूळ उद्देश आहे लोकांना कळलं पाहिजे.”

tab mu inmarathi

तबलीघी जमतीवर यापूर्वी २०१३ मध्ये कझाकिस्तानने त्यांना ‘अतिरेकी’ घोषित करून त्यांच्यावर बंदी आणली होती. इराण, रशिया, तजिकिस्तान, तुर्कमिनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांनी सुद्धा तबलीघी जमातीवर सुरक्षेच्या कारणासाठी बंदी आणली आहे.

इस्लाम धर्म प्रसारक ‘दारुल उलूम’ याने १२ डिसेंबर २०२१ रोजी ट्विट करून सौदी अरेबिया सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती केली आहे. ‘ तबलीघी’ जमात ही आतंकवाद पसरवणार नाही असा दावा केला आहे. पण, सौदी अरेबिया सरकारने त्यावर कोणतंही उत्तर न देणं पसंत केलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?