' शीना बोरा आजही जिवंत आहे; नेमका काय आहे इंद्राणीचा खुलासा? – InMarathi

शीना बोरा आजही जिवंत आहे; नेमका काय आहे इंद्राणीचा खुलासा?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

देशातील खळबळजनक हत्याकांडापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शीना बोरा केसला एक विचित्र वळण लागले आहे. शीना बोरा खूनाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीने शीना बोरा काश्मिरमध्ये जिवंतअसल्याचा दावा केला आहे. एवढेच नव्हे तर सिबीआयने शीनाला शोधून काढावे अशी मागणीही केल्याने आता शासकीय तपास यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत.

 

sheena bora inmarathi

 

ज्या शीना बोराच्या हत्येमुळे ही केस सुरु झाली, ज्या शीनाच्या हत्येवरून वाद निर्माण झाले, जिच्या खूनाच्या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी २०१५ सालापासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे, ती शीना प्रत्यक्ष काश्मिरमध्ये असल्याचे सांगत इंद्राणीने नवा धक्का दिला आहे.

इंद्राणीने याबाबत सीबीआयला पाठवलेल्या पत्रामुळे आता या घटनेत आणखी किती आणि कोणते खळबळजनक खुलासे होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

पत्रात काय सांगितले?

इंद्राणी मुखर्जीने भायखळा कारागृहातून सीबाआय तपासण यंत्रणेला पत्र लिहीले असून या पत्रात तिने विचित्र दावा केला आहे. ज्या घटनेअंतर्गत आपण तुरुंगात शिक्षा भोगत आहोत ती शीना बोरा सध्या काश्मिरमध्ये जिवंत असल्याचा दावा तिने केला आहे. इतकेच नव्हे तर सीबीआयने काश्मिरमध्ये जाऊन शीनाचा शोध घ्यावा अशी मागणीही तिने केली आहे.

 

sheena bora diary

 

आता यामागील गूढ हे आहे की तुरुंगातील इंद्राणीला ही बाब समजली कशी? तर या पत्रात तिने याबाबतही माहिती दिली आहे. ”तुरुंगात मला एक बाई भेटली असून तिनेच शीना काश्मिरमध्ये जीवंत असल्याची बाब सांगितल्याचे इंद्राणीचे म्हणणे आहे. ही बाई कोण? याबाबत तिने फारशी माहिती दिलेली नाही. या बाईने दिलेल्या माहितीनुसार शीनाचा शोध घेण्याची विनंतीही तिने केली आहे.

काय आहे प्रकरण?

इंद्राणी मुखर्जीचा चालक श्यामवर राय याला पिस्तुलसोबत पोलिसांनी अटक केल्यानंतर शीना बोरा हत्याकांड उघडकीस आला होते. चौकशीदरम्यान त्याने इंद्राणी मुखर्जीने २०१२ मध्ये गळा दाबून शीना बोराची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. पुढील तपासात शीन इंद्राणीची मुलगी होती आणि मुंबईत घर मिळवण्यासाठी ब्लॅकमेल करत होती असं निष्पन्न झालं.

मुंबई पोलीस आणि सीबीआयच्या माहितीनुसार, इंद्राणी मुखर्जीने शीना आणि मिखेल या आपल्या दोन मुलांना गुवाहाटीत आपल्या आई-वडिलांकडे सोडले होते. मासिकात इंद्राणीचा फोटो पाहिल्यानंतर शीनाला तिने पीटर मुखर्जीसोबत लग्न केल्याची माहिती मिळाली. यानंतर शीनाने मुंबई गाठत इंद्राणीची भेट घेत याबाबत जाब विचारला.

 

sheena bora featured inmarathi

 

इंद्राणीने यावेळी पतीसह सर्वांना शीना आपली बहिण असल्याचे खोटे सांगितले. पण २०१२ मध्ये शीना अचानक गायब झाली. शीना बोरा गायब झाल्यानंतर राहुल मुखर्जी म्हणजेच पीटर मुखर्जीच्या पहिल्या पत्नीचा मुलगा याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. राहुल आणि शीना एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण राहुलला शीना अभ्यासाकरिता विदेशात गेल्याचे सांगण्यात आले होते.

२०१५ मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आले. इंद्राणीने वादात शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठल्याची बाब उघड झाली होती, पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयने कटात सहभागी असल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. २०२० मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला.

आता पुढे काय?

ज्या शीनाला स्वतः इंद्राणीने मारले, तसेच तिच्या मृतदेहाची रायगड येथे व्हिल्हेवाट लावली, ती शीना जिवंत असल्याच्या खुलाशाने आता केसला नवे वळण लागले आहे. जर शीना जीवंत होती तर तिच्या खुनाच्या आरोपात इंद्राणीने ६ वर्ष शिक्षा का भोगली? ही बाब आधीच का सांगितली नाही? इंद्राणीपर्यंत शीनाची बातमी पोहचवणारी ही अज्ञात बाई कोण? ती तुरुंगात शीनापर्यंत कशी पोहोचली? हे सगळेच प्रश्न आता निर्माण झाले आहेत.

या केसमध्ये सहभागी असलेल्यांचा हा डाव आहे का? अशीही शक्यता निर्माण झाली आहे.

 

sheena bora indrani inmarathi

 

सुटकेसाठी हा इंद्राणीचा नवा स्टन्ट आहे की तपासयंत्रणांना कामाला लावण्याचा नवा प्लॅन? यानंतर तपासयंत्रणांचा कस लागणार का? याची उत्तरं येणारा काळच देईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?