बापरे! या गावातील सगळेजण आहेत बुटके, वाचा एक न उलगडलेलं रहस्य!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
काही महिन्यांपुर्वी आपण शिट्टी मारून एकमेकांशी संवाद साधणाऱ्या गावाबद्दल आणि तिथल्या गावकऱ्यांबद्दल जाणून घेतलं, पण अशी बरीच गावं बरीच ठिकाणं आहेत जिथे जगाच्या वेगळाच कारभार चालू असतो!
तिथे काहीतरी विविधता असते, काहीतरी त्यांचं असं नावीन्य असतं, त्यामुळे जगात तुम्हाला अशी बरीच आश्चर्यचकित करून टाकणारी ठिकाणं तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याबद्दल तुम्हाला कुतूहल सुद्धा निर्माण होईल!
याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याने एक सिनेमा काढला होता त्याचं नाव होतं ‘झीरो’ ! सिनेमा तर सपशेल पडला पण त्या सिनेमातून बुटक्या लोकांच्या काय समस्या असतात आणि त्यांनी आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे यावर भाष्य केलेलं आहे!
तुम्हाला जर सांगितलं की या जगात एक असं ठिकाण आहे जिथे फक्त बुटक्या (म्हणजेच इंग्रजी मध्ये vertically challenged असं म्हणतात) लोकांची वस्ती आहे तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही!
बुटकं असणं याकडे आपली लोकं खूप तुच्छतेने किंवा मस्करीच्या नजरेतून बघतात, त्यामुळे ही सुद्धा एक नैसर्गिक कमतरता आहे याकडे लक्ष न देता लोकं सरळ बुटकेपणावर विनोद करतात, त्या लोकांना घालून पाडून बोलतात, त्यांची खिल्ली उडवतात!
सामान्यत: दर २०००० लोकांमधील एक मनुष्य बुटका असतो किंवा तो तसा जन्माला येतो, म्हणजेच ह्यांची जन्माची टक्केवारी खूप कमी असते, जवळपास एकूण लोकसंखेच्या ०.००५ इतकी असते.
परंतु चीन मधील शिचुआन प्रांतातील यांग्सी गावाची गोष्ट काही वेगळीच आहे. या गावातील जवळपास ५० टक्के लोकसंख्या बुटकी आहे. या गावात राहणाऱ्या ८० पैकी ३६ लोकांची उंची फक्त २ फूट १ इंचापासून ३ फूट १० इंचाइतकीच आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक बुटके असल्यामुळे हे गाव बुटक्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु इतक्या प्रमाणात लोक बुटके असण्यामागचे रहस्य नेमके काय आहे, त्याचा थांगपत्ता गेल्या ६० वर्षांपासून या प्रश्नावर अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना देखील लागलेला नाही.
१९५१ मध्ये पहिली केस समोर आली
गावातील वृद्ध माणसांचे म्हणणे आहे की, त्यांचे सुखमयी आणि आरामदायी जीवन काही दशकांपूर्वीच संपुष्टात आले होते, जेव्हा या प्रांतात एका भयानक रोगाने धुमाकूळ माजवला होता.
त्यानंतर येथील लोकांमध्ये ही बुटकेपणाची समस्या दिसू लागली. त्यामध्ये जास्तकरून ५ ते ७ वर्षांची मुले आहेत. ह्या वयानंतर या मुलांची उंची वाढणे थांबते. या व्यतिरिक्त हे लोक अजून काही वेगळ्या समस्यांनी त्रस्त आहेत.
या भागात बुटक्या लोकांना पहिल्यांदा पाहिल्याची बातमी १९११ साली पुढे आली. १९४७ मध्ये एका इंग्रज शास्त्रज्ञाने ही ह्या भागामध्ये शेकडो बुटक्यांना पहिल्याचे बोलले जाते, परंतु जेव्हा या गावामध्ये आलेल्या भयानक रोगामुळे अंग छोटे होण्याची तक्रार येथील स्थानिकांनी प्रशासनाकडे केली!
तेव्हा खऱ्या अर्थाने हे गाव आणि येथील समस्या जगापुढे आली.१९८५ मध्ये जेव्हा जनगणना झाली तेव्हा गावात अशी ११९ प्रकरणे समोर आली. काळानुसार हा आजार थांबला नाही, तर पिढ्यानपिढ्या हा आजार वाढतच गेला.
या आजाराला घाबरून लोक गाव सोडून जाऊ लागले, कारण त्यांना वाटत होते की हा रोग आपल्या मुलांना होऊ नये.
आज ६० वर्षानंतर काहीसा सुधार झाला आहे, मात्र अजूनही आताच्या नवीन पिढीमध्ये बुटकेपणाची लक्षणे दिसून येतात.
या बुटकेपणामागच्या रहस्याचा अजूनही उलगडा झालेला नाही
अचानक काहीतरी झाले आणि एका सामान्य उंचीच्या लोकांचे गाव बुटक्या लोकांच्या गावात परिवर्तित झाले. हे रहस्य शास्त्रज्ञ गेल्या ६० वर्षांपासून शोधत आहेत. शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ लोकांनी या गावातील पाणी, माती, अन्न याची कित्येकवेळा तपासणी केली,परंतु ते या समस्येमागचे कारण शोधू शकलेले नाहीत.
१९९७ साली या आजाराचे कारण सांगताना या जमिनीत पारा असल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले गेले होते, परंतु हे काही खरे कारण नसल्याचे सिद्ध झाले.
काही लोकांच्या मते, जपानने काही दशकांपूर्वी सोडलेल्या विषारी गॅसमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. परंतु इतिहासानुसार जपानी कधीही चीनच्या या भागात आलेच नव्हते.
अशी वेगवेगळी कारणे वेळोवेळी देण्यात आली आहेत, पण कधीही खरे काय ते मात्र समजले नाही. गावातील काही लोक मानतात की, हा कोणत्यातरी वाईट शक्तीचा प्रभाव आहे, तर काही मानतात की, पूर्वजांचे व्यवस्थित अंत्यसंस्कार न केल्याने हे सर्व होत आहे.
दुसऱ्या देशांतील लोकांना जाण्यास मनाई
चीन देश आपल्या देशामध्ये हे बुटक्यांचे गाव आहे असे मानण्यास तयार आहे, परंतु या गावात कोणत्याही दुसऱ्या देशातील पर्यटकांना जाण्यास मनाई आहे. फक्त येथे जाणाऱ्या पत्रकारांकडूनच येथील योग्य ती माहिती मिळते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.