' जॉन अब्राहमचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालंय की यामागेही काही पब्लिसिटी स्टंट?

जॉन अब्राहमचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालंय की यामागेही काही पब्लिसिटी स्टंट?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सत्यमेव जयते २ मुळे चर्चेत असलेल्या जॉन इब्राहिमच्या चाहत्यांना अचानक धक्का बसला आहे. जॉननं त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट स्वच्छ करून टाकलं आहे.

त्याचा बायो, रिल्स इतकंच काय पण त्याचं प्रोफ़ाईल पिक्चरही चाहत्यांना दिसत नसल्यानं यामागे नेमकं काय कारण असावं? की त्याचं अकाऊंट हॅक झालंय का? या चर्चांना जोर आला आहे

 

satyamev jayate 2 inmarthi 2

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आज अनेक बॉलिवुड सेलिब्रेटी इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर चांगलेच ॲक्टीव्ह असतात. या हॅण्डलवर त्यांचे हजारो, लाखो चाहते त्यांना फॉलो करत असतात.

आपल्या चाहत्यांच्या थेट संपर्कात रहाण्यासाठी अनेक सितारे या सोशल माध्यमांचा वापर करताना दिसून येतात. टिकटॉक बंद पडल्यानंतर अलिकडे इन्स्टाच्या रिल्सनी धुमाकूळ घातलेला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या रिल्सचा चांगला वापर करून घेतला जात आहे.

आपल्या कामासाठी आणि फ़िटनेससाठी चर्चेत असणार्‍या जॉन इब्राहिमच्या इन्स्टा अकाऊंटची मात्र अलिकडे वेगळ्याच कारणासाठी चर्चा चालू आहे. सत्यमेव जयते २ प्रदर्शित झाल्यानंतर चर्चेत आलेल्या जॉनचा १७ डिसेंबरला वाढदिवस असतो.

 

john insta inmarathi

त्याच्या वाढदिवसाआधी दोन दिवस अचानकच त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरून सर्व पोस्ट काढून टाकण्यात आल्या आहेत. बायो आणि प्रोफाइल पिकसहित सर्व रिल्स हटविण्यात आलेले आहेत. हे बघून जॉनच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

आपला आवडता स्टार असा अचानक गायब का झाला हा प्रश्न त्यांना पडला आहे. जॉनचं अकाऊंट हॅक झाल्याची शंकाही बोलून दाखविली जात आहे.

९.७ मिलियन फॉलोअर्स असणारं जॉनचं अकाऊंट सध्या एकाही पोस्टविना रिकामं पडलेलं आहे. वाढदिवसापूर्वी दोन दिवस हा प्रकार घडण्यामागे नेमकं काय कारण असावं? या चर्चांनी जोर धरला आहे.

अशा प्रकारे इन्स्टावरून अचानक गायब होणारा जॉन हा पहिला किंवा एकमेव सेलिब्रेटी नाही. मागील वर्षी साधारण याच दरम्यान दीपिका पदुकोणचं इन्स्टा अकाऊंटही असंच रातोरात रिकामं झालेलं होतं. याच दरम्यान तिनं तिच्या ट्विट आणि इन्स्टा पोस्ट हटवायला सुरवात केली होती.

 

deepika padukone inmarathi 2

 

तिचे फॅन्स तिच्याकडून येणार्‍या नवीन वर्षांच्या शुभेच्छांच्या प्रतिक्षेत असतानाच तीने मात्र इन्स्टा रिकामं करायला सुरवात केल्यानं चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला होता. त्याही वेळेस दीपिकाचं अकाऊंट हॅक झाल्याच्या चर्चांना जोर आला होता.

काहीजणांच्या मते ती तिच्या अगामी चित्रपटाची घोषणा करणार असल्याने ही स्वच्छता मोहिम चालू आहे तर काहींच्या मते जुन्या पोस्ट हटवून एक नविन सुरवात करण्याची ही तयारी आहे. कालांतरानं दीपिकाने रेडिओ डायरीसाठी ही स्वच्छता मोहिम केल्याचं समोर आलं.

दीपिका शिवाय स्व. सुशांत सिंगनंही त्याच्या सोन चिडियाच्या महाभयंकर अपयशानंतर इन्स्टावरून पोस्ट हटविल्या होत्या. त्याचं दु:ख, नैराश्य त्यानं अशा प्रकारे व्यक्त केलं होतं.

जॉन इब्राहिमच्या इन्स्टा अकाऊंटचं असं रिकामं होणं म्हणूनच चाहत्यात चर्चेचा विषय बनलं आहे. नुकतंच त्याने त्याच्या आगामी सिनेमा अटॅकचा टीजर शेयर करून अकाऊंट पुन्हा सुरू केलं आहे.

 

john Abraham InMarathi

 

पण तरी यामागची नेमकी स्ट्रॅटजी काय? किंवा हे सेलिब्रिटीज असं का करत असतील यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?