' रोल मिळत नव्हते त्या काळात मिथुनदाने चक्क तिचा असिस्टंट म्हणून काम केलं होतं… – InMarathi

रोल मिळत नव्हते त्या काळात मिथुनदाने चक्क तिचा असिस्टंट म्हणून काम केलं होतं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलीवूड हे असं समीकरण आहे ज्याच्या वेडापायी आज भारतातूनच नव्हे तर परदेशातून कलाकार येत असतात. मायानगरी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत हे कलाकार दाखल होतात खरे मात्र लगेचच यामध्ये काम मिळेल याची खात्री नसते, संघर्ष कोणाला चुकला नाही? आज अमिताभ बच्चन यांच्यापासून ते शाहरुख पर्यंत अनेकांनी या बॉलीवूडमध्ये संघर्ष केला आहे, आज आपण अशाच एका अभिनेत्याच्या संघर्षाबद्दल जाणून घेणार आहोत..

बॉलिवूडचा ‘डिस्को डान्सर’ म्हणजे अर्थातच मिथुन चक्रवर्तीने 80 ते 90 च्या दशकात खूप नाव आणि स्टारडम कमावलं होतं. हटके स्टाईल साठी प्रसिद्ध असलेल्या मिथुन चकवर्ती हा त्या काळातला सगळ्यात महागडा आणि प्रसिद्ध अभिनेता होता.

 

mandakini and mithun inmarathi

 

आजही प्रेक्षकांच्या मनात ‘ डिस्को डान्सर ‘ म्हणून त्याच वेगळं स्थान आहे. परंतु एक काळ असाही होता जेव्हा त्याला एक वेळेचं जेवण मिळणं कठीण झालं होत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

स्टार मधून नावारूपाला येण्याआधी मिथुनला खूप स्ट्रगल करावा लागला होता. तो मुंबईत आला तेंव्हा त्याच्याकडे राहण्यासाठी जागा नव्हती. बिल्डिंगच्या वॉचमन पासून लपून तो पाण्याच्या टाकीमागे झोपत असे. ही तेंव्हाच ची गोष्ट आहे जेंव्हा मिथुन ने बॉलिवूड मध्ये जम बसवला नव्हता.

डान्सची आवड असल्याने स्टेज शो करून तो त्याची रोजीरोटी कमवत होता आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. अशातच त्याने अभिनयाचं शिक्षण घेण्यासाठी एक्टिंग स्कूल मध्ये प्रवेश घेतला. यातून त्याच्या अभिनयाच्या प्रवासाची सुरवात झाली.

 

acting-skills-marathipizza

मिथुनला ‘ मृगया ‘ साठी काम करण्याची संधी मिळाली. पहिल्याच फिल्मने मिथुन रातोरात एक मोठा स्टार झाला शिवाय या फिल्मला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. परंतु एवढं मोठं यश मिळूनही मिथुनला त्याचा फायदा झाला नाही.त्याच नशीब बदललं नाही.
मिथूनला सिनेमात काम मिळणं बंद झालं. इतकचं नाही तर त्याकडे पुढची दोन तीन वर्ष कोणत्याच सिनेमात त्याला काम मिळालं नाही.

सगळी कडून मार्ग बंद होत असताना मिथुन च्या डोक्यात हेलन चा विचार आला. हेलन ही त्याकाळची प्रसिद्ध नटी होती. हेलनच्या कॅब्रे डान्स वर प्रेक्षकही ताल धरायचे. त्यावेळी प्रत्येक फिल्म मध्ये तिचा डान्स असायचा. म्हणूनच मिथुन हेलनचा असिस्टंट म्हणून काम करू लागला आणि कोणीही ओळखू नये म्हणून त्याने आपलं नाव बदलून ‘ रेज’ ठेवलं.

 

helen feature inmarathi

 

हेलन बरोबर काम करत असतानाच मिथुनला अमिताभ बच्चनच्या एका सिनेमात छोटा रोल मिळाला. हा छोटा रोलच आपल्याला यशाकडे घेऊन जाणारा मोठा रस्ता आहे हे जाणून त्याने कोणतेही आढेवेढे न घेता सिनेमा स्वीकारला. त्यानंतर त्याने अनेक सिनेमात ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलं.

अल्पावधीतच मिथुन चक्रवर्ती हे नाव लोकप्रिय झालं. लोक मिथुनला गरिबांचा अमिताभ बच्चन म्हणून ओळखत असत. छोटे रोल ते सुपरस्टार हा मिथुन चक्रवर्तीचा बॉलिवूडचा प्रवास नक्कीच लक्षणीय आहे.

 

shridevi mithun inmarathi

 

आजही प्रेक्षकांच्या मनात ‘ डिस्को डान्सर ‘ म्हणून त्याच वेगळं स्थान आहे. केवळ अभिनयापुरता तो थांबला तर तो राजकरणात उतरला, व्यवसाय देखील सुरु केले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?