' लॉजिक गुंडाळून ठेवलेल्या ‘कभी खुशी कभी गम’च्या “वेडेपणाची” २० वर्षं पूर्ण! – InMarathi

लॉजिक गुंडाळून ठेवलेल्या ‘कभी खुशी कभी गम’च्या “वेडेपणाची” २० वर्षं पूर्ण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कभी खुशी कभी गम हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीपासून अनेक गोष्टींसाठी चर्चेत होता. एकतर याची तगडी स्टारकास्ट. बरेच वर्षांनंतर अमिताभ आणि जया ही जोडी पडद्यावर एकत्र दिसणार होती. बच्चन, रोशन आणि खान ही बी टाऊनची खास मंडळी.

२० वर्षांपूर्वी या नावांचा जास्तच दबदबा होता. शाहरूख खानने नुकतंच शहेनशहा-ए-बॉलिवुडचं तख्त काबीज करून तो नवा बादशहा बनला होता. तमाम खानावळीला हादरा देत रोशनांचा हृतिक मुसंडी देऊन पुढे आला होता.

 

kabhi khushi kabhi gham inmarathi

 

या सगळ्यांच्या बायका एकमेकीकडे किटी पार्ट्यांच्या निमित्ताने येत जात होत्या. एकुण बीटाऊनमधले पेस्टल कलरमधले ते दिवस होते. अशा सगळ्या बी टाऊन उच्चभ्रूंना एकत्र आणून सिनेमात दाखावयचं तर साधी दादर माटुंग्याची गोष्ट सांगून कशी चालेल?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सगळंच भव्य दिव्य करण्याच्या हौसेखातर साक्षात करण जोहरने हातात कात्री घेतली आणि सितार्‍यांचे ड्रेस बनले. उरलेलं लायटिंग मनिष मल्होत्रानं पूर्ण केलं. याच्या पोस्टरवरच्या पोषाखांची सिनेमापेक्षा जास्त चर्चा झाली होती.

प्रत्यक्ष सिनेमात करण जोहरने एरवीही तो कधीच वापरत नसणारं लॉजिक काशीला पाठवलं. बघुया कसं –

१. या चित्रपटात फ्लॅशबॅकमधे १९९१ हे वर्ष आलं आहे. आपल्या वाढदिवसादिवशी अमिताभ आती क्या खंडाला हे गाणं गाताना, त्यावर नाचताना दाखविला आहे. वास्तवात हे गाणं असणारा चित्रपट, गुलाम १९९८ साली प्रदर्शित झाला होता.

 

aati kya khandala inmarathi

 

१९९८ मधे प्रदर्शित होणार्‍या चित्रपटातलं गाणं ९१ सालच्या फ्लॅशबॅक मधे टाकून करणनं तो काळाच्या किती पुढचा विचार करणारा दिग्दर्शक आहे हे सिध्द केलं.

२. १९९१ च्या फ्लॅशबॅकमधे अमिताभ ह्रतिकशी नोकिया ९००० वरून बोलताना दाखविला आहे, वास्तवात जो फोन १९९६मध्ये मार्केटमधे आला होता.

३. ह्रतिक रोशन पिचवर असताना तासभर खेळून झाल्यावरही त्याचे शूज स्वच्छ पांढरेधोप आहेत. मातीचा एक ठिपकाही त्याच्या शूजवर नाही. कारण शूजलाही माहित आहे हा रोशन्सचा शूज आहे, लिमिट में रहने का!

 

hrithik shoes inmarathi

४. रायचंदच्या ऑफिसमध्ये खुर्चीच्यामागे टिव्ही दाखविला आहे. खरंतर सामान्य कोणी असता तर खुर्चीसमोर टिव्ही लावला असता मात्र रायचंद गर्भश्रीमंत असल्यानं त्यांचं सगळंच वेगळंच असत.

५. रायचंद कुटुंब दिल्लीत रहाणारं आहे मात्र जेव्हा जेव्हा हे घराबाहेर पाऊल ठेवतात तेव्हा ते स्कॉटलॅण्डमधे दिसतात. ही जादू केवळ रायचंद गर्भश्रीमंत असल्यानं घडतं कारण त्यांचं सगळं वेगळंच असतं.

६. काजोल आणि शाहरूख दिल्लीतल्या चांदणी चौकात फिरताना दाखवले आहेत. ही रायचंदांची दिल्ली असल्यानं यांच्या चांदणी चौकात चक्क डोंगर आहेत. अर्थातच ते गर्भश्रीमंत असल्याने त्यांचा चांदणी चौकही वेगळा आहे.

 

kajol and shahrukh inmarathi

 

७. पू नावाचं मठ्ठंभारती पात्र यात आहे. या पात्रावर एक स्वतंत्र लेख लिहावा इतकं ते लॉजिक हुकलेलं पात्र आहे. लहानपणातला गोलूमोलू ह्रतिक पौगंडावस्थेतून जाताना एखाद्या मशिनमधून जावा असा बदलून हॅण्डसम हंक बनतो.

तो स्वत:ला ओळखणं जिथे कर्म कठीण तिथे पू नावाची कमली त्याला चटकन ओळखते. कशी? तर चंदू के चाचा ने चंदू की चाची को… हे टंगट्विस्टर त्यानं चटकन म्हंटल्याने. तर हे असंय, रायचंदांचं खरंच सगळंच वेगळं आहे.

 

hrithik k3g inmarathi

 

८. ह्र्तिकचा किशोरावस्था ते तरूणपण हा काळ सगळा हँडसम हंक बनण्यात गेल्यानं बिचारा शू लेसेस बांधणं शिकायला विसरतो. बोर्डिंग स्कूलमधला छोटा रायचंद हॉट शॉट मोठा रायचंद होऊनही तस्साच बावळा राहिला आहे.

९- पू नावाची अल्पवस्त्रांकीत नारी घरातून बाहेर पडण्याच्या तयारीत असताना शरीराचा वरचा भाग उघडाबागडा टाकून असते मात्र घराबाहेर पडताक्षणी अंगावर स्टायलिश जॅकेट असतं. रायचंदांच्या घरातली ही जादू आहे.

 

kareena in k3g inmarathi

 

१०- छोटा रायचंद पू ला कॉलेजमध्ये दिसतो ते एका लम्बोर्गिनीमध्ये. त्याला त्या स्टायलिश कारमधून उतरताना बघून तमाम लंडनकरी कमल्या उह हा करत उसासे सोडतात. मात्र नंतरच्या एका सिनमधे जेव्हा मोठा रायचंद छोट्या रायचंदला लिफ़्ट मागतो तेंव्हा त्याची सिल्वर मर्सिडीज असते.

हा असा गाड्यांचा ताफा घेऊन फिरणारे रायचंद अंबानी, अदानीना टक्कर देणारे आहेत हे नक्की. असो आपल्याला काय त्याचं, रायचंद कुटुंबाचं सगळंच वेगळं असतं बुवा.

 

kjo inmarathi

 

तर अशा या डोक्याने पांगळ्या पात्रांना घेऊन NRI लोकांना इम्प्रेस करण्यासाठी करण जोहर दिग्दर्शित कभी खुशी कभी गम या अध्यायाला आज २० वर्षे पूर्णं झालीत. यातल्या रायचंद कुटुंब आणि त्यांच्या श्रीमंती थाटापुढे अंबानी अदानीपासून थेट एलॉन मस्कपर्यंत सगळीच लोकं अतिसामान्यच नाही का!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?