'भारताने पाकिस्तानची केलेली धुलाई पाहिलीत? आता त्यांची इंटरनेटवर झालेली धुलाई पहा!

भारताने पाकिस्तानची केलेली धुलाई पाहिलीत? आता त्यांची इंटरनेटवर झालेली धुलाई पहा!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

भारताने पाकिस्तानची धुलाई केल्यानंतर इंटरनेटवर पडलेल्या जोक्सच्या पावसाने पुन्हा पाकिस्तानला झोडपले! भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणजे फायनल पेक्षा कमी नाही. कट्टर भारतीय टीम समर्थक असेही म्हणतात की भले तुम्ही कोणतीही ट्रॉफी जिंकली नाही तरी चालेल, पण जर त्या स्पर्धेत पाकिस्तान असेल आणि ती टीम समोर आली तर तिला हरवण तुमचं आद्यकर्तव्य आहे.

यंदाच्या ICC Champions Trophy मध्ये ४ जूनला पुन्हा एकदा भारत पाकिस्तान आमने सामने आले आणि क्रिकेटरुपी युद्धाला तोंड फुटले. पहिली फलंदाजी भारताची होती. वारंवार पावसाचा व्यत्यय आणि त्यामुळे २ षटकांचा खेळ कमी झालेला असूनही भारतीय फलंदाजांनी कसलेही दडपण न घेता नेहमी प्रमाणे पाकिस्तानच्या बोलर्सची यथेच्छ धुलाई केली आणि धावांचा भलामोठा डोंगर रचला, हा एवढा मोठा डोंगर आपल्याला काही झेपवणार नाही हे जणू पाकिस्तानच्या फलंदाजांना आधीच समजले होते आणि त्यांची फलंदाजी पाहताना त्यांनी आधीच हार मानल्याचे दिसून आले.

pakistan-vs-india-marathipizza
indiatvnews.com

झाले नेहमीप्रमाणे भारताने पाकीस्तानचा धुव्वा उडवला आणि आपली पाकिस्तान विरुद्धातली विजयाची मालिका सुरु ठेवली. ज्या जोमाने पाकिस्तानची टीम मैदानात उतरली होती आणि त्यांचा सुरुवातीचा खेळ पाहून असे वाटले होते की आज हे लोक भारताला चुरशीची लढत देणार, पण नेहमीप्रमणे त्यांनी हळूहळू सपशेल गुडघे टेकले आणि विजयश्री स्वत:हून भारताच्या गळ्यात टाकली. या मानहानिकारक पराभवानंतर कट्टर भारतीय क्रिकेट टीम समर्थक थोडी न गप्प बसणारेत. त्यांनी इंटरनेट वर जाऊन मोहीमच उघडली आणि हरलेल्या पाकिस्तान संघाला ट्रोल करत त्यांच्या जखमेवर अधिकच मीठ चोळले. संपूर्ण इंटरनेटभर पाकिस्तानच्या पराभवाची खिल्ली उडवणाऱ्या जोक्सचा पाउस पडत होता आणि या जोक्सरुपी पावसाने पुन्हा एकदा पाकिस्तानला झोडपले.

तुम्ही देखील या जोक्सची मजा घ्या, हसून हसून वेडे व्हाल!
pakistan-jokes-marathipizza08

 

pakistan-jokes-marathipizza09

 

pakistan-jokes-marathipizza01

 

विनोदनिर्मितीसाठी लोकांनी सुपरमॅन आणि गोविंदा ची मदत घेतली 😀

 

pakistan-jokes-marathipizza02

 

आणि…the legendary dialogue…

pakistan-jokes-marathipizza03

 

बॉईज प्लेयड वेल आणि बहुचर्चित Covfefe – हे शब्दप्रयोग कसे सुटतील ?!!!

 

pakistan-jokes-marathipizza04

 

आणि हा आला क्रिकेटचा किंग !

 

pakistan-jokes-marathipizza05

 

pakistan-jokes-marathipizza06

 

pakistan-jokes-marathipizza07

 

pakistan-jokes-marathipizza10

 

भारतीय क्रिकेट टीमला मनापासून ICC Champions Trophy मधील पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा…!

आम्हाला अशेच फन मोमेंट्स मिळवून देत रहा रे…!!!

जय हिंद!!!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?