' या एका उत्तराने मारली बाजी आणि भारताची हरनाज, ‘मिस युनिव्हर्स’ ठरली… – InMarathi

या एका उत्तराने मारली बाजी आणि भारताची हरनाज, ‘मिस युनिव्हर्स’ ठरली…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एखादं ब्युटी पेजन्ट जिंकायचं असेल तर केवळ देखणे रुप असून उपयोग नाही तर त्यासह कुशाग्र बुद्धीमत्ताही गरजेची असते. कारण रुपाच्या बळावर तुम्ही टॉप ३ स्पर्धकांमध्ये निवडले गेलात तरी विजेत्याचा मुकुट पटकावयाचा असेल तर सौंदर्याला बुद्धीची जोड हवीच.

कोणत्याही सौंदर्य स्पर्धेत स्पर्धकांना प्रश्न विचारून त्यांचे ज्ञान तपासले जाते. हे ज्ञान केवळ पुस्तकी असून उपयोग नाही तर सामान्य ज्ञानासह तुमचा आत्मविश्वास, समाजाप्रति असलेले भान यांचीही चाचणी होते.

भारताची प्रतिनिधी हरनाज हिनेही हेच सिद्ध करत तब्बल २१ वर्षांनी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला.

 

har inmarathi

 

सौंदर्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने टॉप ३ स्पर्धकांमध्ये जागा मिळवली, आणि त्यानंतर या तिन्ही स्पर्धकांना परिक्षकांनी प्रश्न विचारला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

काय होता प्रश्न?

परिक्षकांनी तीन स्पर्धकांना प्रश्न विचारला, की आजच्या जगात यंग मुली, महिलांना रोजच्या आयुष्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. या सर्वांना तुम्ही कोणता सल्ला द्याल?

या उत्तराने किताब जिंकला 

हा प्रश्न तिन्ही स्पर्धकांसाठी एकच असल्याने प्रत्येकाला आपले वेगळेपण जपायचे होते. हरनाज म्हणाली, ”आज प्रत्येक स्त्रीला वेगवेगळी आव्हानं पेलावी लागतात. त्यामुळे आव्हानं, संकटं संपणार नाहीत हे नक्की, मात्र त्याकडे आत्मविश्वासाने पाहणे आणि स्वतःवर विश्वास ठेवने गरजेचे आहे. इतरांशी तुलना न करता आपण वेगळे आहोत हा विश्वास तुमचे सौंदर्य अधिक खुलवतो.तुम्ही तुमच्या जीवनात सर्वात महत्वाची भुमिका बजवाता. तुम्हीच लिडर आहात हे लक्षात ठेवा आणि स्वतःची भुमिका ठामपणे मांडायला शिका.”

 

 

harnaz sandhu featured inmarathi

 

हरनाजच्या या उत्तराने परिक्षकांचे मन जिंकले आणि तीन स्पर्धकांपैकी हरनाजची निवड करत तब्बल २१ वर्षांनी हा बहुमान भारताला मिळाला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?