' लसींप्रमाणेच, शस्त्रास्त्रे निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश..

लसींप्रमाणेच, शस्त्रास्त्रे निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मेक इन इंडियाचा नारा आणि त्यासाठी सुरु असलेले प्रयत्न, आता भारतीय नागरिकांसाठी नवे राहिलेले नाहीत. भारतात व्यवसाय वाढावा यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असलेलं पाहायला मिळतंय. याच संकल्पनेचा एक भाग म्हणून भारत सरकारने काही महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. याचा उत्तम परिणाम सुद्धा पाहायला मिळाला आहे.

सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनातील आवश्यक वस्तूंच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. देशाचे पंतप्रधान ‘आत्मनिर्भर भारत’ या उक्तीचा वेळोवेळी उल्लेख करत असल्याचं सुद्धा आपण सगळ्यांनी अनेकदा पाहिलं होतं. हीच आत्मनिर्भरता शस्त्रास्त्रांच्या बाबतीतदेखील असायला हवी अशी भारत सरकारची मानसिकता दिसते.

 

make in india inmarathi
rediff.com

 

या क्षेत्रातही भारताने अत्यंत सक्षम असावं यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळेच मध्यंतरीच्या काळात, भारत सरकारने शस्त्रास्त्र बनवणाऱ्या काही महत्त्वाच्या परदेशी कंपन्यांवर मर्यादित काळासाठी बंदी घातलेली आहे. याचा सकारात्मक परिणाम भारतातील शस्त्रास्त्र व्यवसायात दिसला आहे, असं म्हणायला हरकत नाही.

 

शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱ्या भारतातील तीन कंपन्यांनी शस्त्र विक्रीच्या व्यवसायात अव्वल शंभर कंपन्यांमध्ये स्थान मिळवलं आहे. Stockholm International Peace Research Institute (SIPRI) च्या अहवालानुसार, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीज आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या तीन भारतीय कंपन्यांनी शस्त्रास्त्र विक्री करण्याच्या २०२० सालच्या यादीत अव्व्ल १०० मध्ये स्थान मिळवलं आहे. या तीन कंपन्या वरील यादीत अनुक्रमे ४२, ६० आणि ६६ स्थानावर आहेत.

 

HAL inmarathi

 

इथेही अमेरिकाच जोरात
शस्त्रास्त्र विक्री करणाऱ्या या अव्वल १०० कंपन्यांमध्ये महासत्ता असणाऱ्या अमेरिकेने खास छाप सोडली आहे. या यादीत अमेरिकेतील तब्बल ४१ कंपन्यांचा समावेश आहे. एकट्या अमेरिकेने २८५ बिलियन डॉलर्स रुपये किंमतीची विक्री केली आहे.

अव्वल १०० च्या यादीत अमेरिकेचा वाटा ५४% इतका मोठा आहे. त्याखालोखाल दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी चीन आणि युनायटेड किंगडमचा नंबर लागतो. या यादीत चीनचा वाटा १३% इतका आहे.

 

america inmarathi

 

चीनने सुद्धा शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचा निश्चय केलेला असावा असं त्यांची आकडेवारी पाहिली की दिसून येतं. २०१९ च्या तुलनेत २०२० साली चीनच्या विक्रीत लक्षणीय वाढ दिसून येते. ही वाढ दीड टक्के इतकी जास्त आहे.

चीनमधील ५ कंपन्या या यादीत समाविष्ट आहेत. पाचही कंपन्या चक्क अव्वल २० क्रमांकांमध्ये असून, ३ कंपन्यांनी टॉप १० च्या यादीत स्थान मिळवलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे येत्या काळात चीन शस्त्रास्त्रांच्या बाबतीत अधिकाधिक प्रभावी ठरत जाणार आहे, असं म्हणायला हरकत नाही.

 

china 1 inmarathi

भारताचा प्रवास…

मेक इन इंडियाचा प्रभाव शस्त्र निर्मिती आणि विक्री क्षेत्रात सुद्धा पडल्यामुळे भारतालादेखील मोठा फायदा झाला आहे, असं म्हणायला हवं. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, कोरोनामुळे उद्भवलेल्या वैश्विक महामारीचा अर्थव्यवस्थेवर झालेला नकारात्मक परिणाम कमी होण्यास मदत झाली आहे. या आर्थिक फटक्यातून बाहेर पडण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेला या स्वावलंबित्वाचा काही प्रमाणात हातभार नक्कीच लागला आहे.

 

HAL inmarathi 1

भारताची आकडेवारी पाहिली, तर या अव्वल १०० कंपन्यांच्या यादीत भारताचा वाटा १.२ टक्के इतका आहे. ६.५ अब्ज डॉलर्सच्या एकूण विक्री किंमतीसह भारताने गाठलेली ही आकडेवारी समाधानकारक ठरते. याशिवाय २०१९ च्या तुलनेत २०२० साली भारतीय शस्त्रास्त्रांच्या विक्रीत १.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
शस्त्रास्त्र या क्षेत्रात सुद्धा भारत आत्मनिर्भर होण्याकडे पाऊल टाकत आहे. भारत सरकारने उचललेलं हे पाऊल आणि मेक इन इंडियाचा या क्षेत्रात सुद्धा असलेला प्रभाव भारताच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार यात शंका नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?