' काशी विश्वनाथ मंदिरातील कॉरिडॉरचे श्रेय घेण्यावरून भाजप आणि सपामध्ये रस्सीखेच

काशी विश्वनाथ मंदिरातील कॉरिडॉरचे श्रेय घेण्यावरून भाजप आणि सपामध्ये रस्सीखेच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या कोरोना मागे पडला आहे आणि ओमिक्रोन नावाचा व्हेरियंट आपले डोके वर काढत आहे. आफ्रिकेतून पसरलेल्या संसर्गाने पुन्हा एकदा जगाला वेठीस धरले आहे, अनेक देशांनी आपापल्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्या आहेत. भारताने खबरदारी घेऊन सुद्धा आपल्याकडे आता ओमिक्रोनचे रुग्ण सापडताना दिसून येत आहेत.

धारावीसारख्या गजबजलेल्या आणि दाट वस्ती असलेल्या भागात देखील ओमिक्रोनचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनाने तर या भागात अक्षरशः थैमान घातले होते. मात्र काही दिवसांनी या भागातून कोरोना नाहीसा झाला, मुंबई पालिकेचे म्हणणे होते आमच्या प्रयत्नामुळे झाला तर तिकडे RSS च्या स्वयंसेवकांनी या भागात काम करून अनेकांची मदत केली असा दावा केला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आज महविकास आघाडीचे सरकार आल्यापासून, केंद्राचा आणि राज्याचा वाद रोज जनतेच्या समोर येताना दिसून येतो. शुल्लक गोष्टींचे श्रेय घेण्याकरता दोघांमध्ये चुरस लागलेली असते. महाराष्ट्राचे हे असे तर तिकडे यूपीमध्ये आज नरेंद्र मोदी काशी विश्वनाथ मंदिरातील कॉरिडॉरचे उदघाटन करत आहेत. तिकडे अखिलेश यादव या कॉरिडॉरचे श्रेय घेत आहेत, नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं चला तर मग जाणून घेऊयात…

 

mahavikas aghadi inmarathi

 

नेमकं काय म्हणणं आहे अखिलेश यादवांच?

रविवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आमचे सरकार अस्तित्वात असताना या प्रकल्पला परवानगी देण्यात आली होती याचे पुरावे देखील आमच्याकडे डॉक्युमेंटरी स्वरूपात आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याने आत जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा कॉरिडॉर चालू करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. तसेच पूर्वांचल एक्सप्रेसवे आणि शरयू कॅनॉल सारखे प्रकल्प आम्हीच सुरु केले आहेत असा दावा त्यांनी केला.

 

akhilesh yadav inmarathi

 

समाजवादी पक्षाचे सुप्रीमोदेखील पत्रकरांशी बोलताना म्हणाले की, आज महागाईमुळे शेतकऱ्यांना खते मिळत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार? हा प्रश्न जनतेने विचारू नये यासाठी काशी विश्वनाथचा कॉरिडॉर पुढे आणत आहेत. कॉरिडॉर मंजूर करणारे कोणतेही मंत्रिमंडळ असेल तर ते समाजवादी पक्षाचे सरकार होते. याचे पुरावे दाखवू आणि पुराव्यानिशी बोलू.

नेमका काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प आहे तरी काय?

वाराणसीच काशी विश्वनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, आज भारतातूनच नव्हे तर परदेशातून लोक वाराणसीमध्ये येतात. वाराणसीचा इतिहास खूप मोठा आहे. गंगानदीशी असलेलं नातं, वर्षानुवर्षे सुरु असलेल्या संस्कृतच्या पाठशाळा, खाद्यसंस्कृती यामुळे वाराणसी शहर कायमच पर्यटकांना आकर्षित करते.

 

varanasi india inmarathi
ancient origins

प्राचीन शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी  काही महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत त्यातीलच हा एक प्रकल्प. वाराणसीमध्ये अनेक घाट अस्तित्वात आहेत, त्यातीलच एक प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या अशा दश्वामेष घाटाजवळ काशी विश्वनाथाच मंदिर आहे, मंदिराभोवती करण्यात आलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधांचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटन होणार आहे. 

 

kaashi inmarathi

 

उत्तर प्रदेशच्या निवडणूका अगदी तोंडावर आल्या असताना अशा प्रकल्पांच्या उदघाटनाने नक्कीच याचा फायदा भाजपला होऊ शकतो, वाराणसी आणि नरेंद्र मोदी यांचे देखील एक वेगळे नाते आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?