' बिपीन रावतांचे निधन, कट्टरपंथीयांचा जल्लोष : अली अकबर सोडणार मुस्लिम धर्म? – InMarathi

बिपीन रावतांचे निधन, कट्टरपंथीयांचा जल्लोष : अली अकबर सोडणार मुस्लिम धर्म?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जन्म आणि मृत्यू या खरं तर अटळ गोष्टी आहेत, जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी हे जग सोडून जाणार असते  तरीदेखील मृत्यूचे भय न बाळगता किंबहुना रोज मृत्यूशी सामना करणारे हे असे महान लोक आपल्या देशात आहेत, कदाचित म्हणूनच आपण घरात सुरक्षित आहोत.

नुकतंच CDS जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विमान अपघातात निधन झाले. या घटनेचा शोक सारा देश व्यक्त करत असतानाच काही कट्टरपंथियांनी बिपीन रावत यांच्या जाण्यावरून आनंद साजरा केला.

 

bipin rawat inmarathi

 

देशाच्या लष्करी पदावरील सर्वोच व्यक्तीच्या अपघाती मृत्यूवरून आनंद साजरा करणे हे निश्चितच लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे, मात्र याच घटनेचा निषेध म्हणून एका दिग्दर्शकाने थेट धर्मांतराचा निर्णय घेतला आहे, कोण आहे तो दिग्दर्शक चला तर मग जाणून घेऊयात….

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बिपीन रावत यांच्या मृत्यूची बातमी कळताच अनेक मुस्लिम कट्टरपंथीयांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून जल्लोष साजरा करण्यास सुरवात केली. वेगवेगळ्या इमोजीस त्यांनी टाकल्या होत्या. मल्याळम दिग्दर्शक अकबर अली यांनी या संपूर्ण घटनेच्या विरोधात  व्हिडिओ आपल्या फेसबुक अकाउंटवर टाकला, ज्यात त्यांनी या कट्टरपंथीयांचा निषेध केला.

 

muslim rohingya inmarathi
the conversation

 

अकबर अलींच्या व्हिडिओवर अनेक द्वेषपूर्ण कमेंट्स आल्या आणि अवघ्या काही मिनिटातच अकबर अली यांचे फेसबुक अकाउंट ब्लॉक करण्यात आले. त्यांनी पुन्हा एक नवे अकाउंट बनवून त्यावर आपण इस्लाम धर्म सोडत आहोत असे जाहीर केले.

पुढे त्यांनी स्पष्ट केली की आजपासून मी रामसिंग या नावाने ओळखला जाईन. केरळच्या संस्कृतशी इमान राखणाऱ्या रामसिंग या व्यक्तीला मारण्यात आले होते. १९४७ रामसिंग यांनी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केला होता. याचा बदला म्हणून मुस्लिम जिहादी लोकांनी रामसिंग आणि त्यांच्या कुटुंबाची क्रूरपणे हत्या करण्यात आली. आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या दोन आठवडे पूर्वीची ही घटना आहे.

 

hindu.jpg inmarathi

 

आपल्या फेसबुक अकाउंटवरून ते कायमच इस्लाम धर्मातील भीषण वास्तवाचे दर्शन पोस्टमधून टाकत असतात. तसेच ते असेही म्हणाले की, आजपासून मी मुस्लिम नसून एक भारतीय आहे, बिपीन रावत यांच्या मृत्यूवरून जे लोक आनंद साजरा करत आहेत त्यांच्यावर  सरकारने कठोर कारवाई करावी.

नेमके कोण आहेत अली अकबर?

राष्ट्रीय पुरस्कार विजेतेपदाचे मानकरी असलेले अली अकबर मूळचे केरळमधील वायनाड परिसरातले, आतापर्यंत त्यांनी २० सिनेमांचे दिग्दर्शन केले असून त्याच बरोबरीने पटकथा, गाणीसुद्धा लिहिली आहेत.

 

akbar inmarathi

सिनेमातल्या करियरप्रमाणे त्यांनी आपले नशीब राजकारणात सुद्धा आजमावले आहे. २०१४ साली आम आदमी पार्टीकडून तर २०१९ साली भाजपकडून त्यांनी निवडणूक लढवली होती.

आज देशातील एकूणच वातावरण ढवळले गेले असून लोकांच्या धार्मिकभावना दिवसेंदिवस आणखीनच तीव्र होताना दिसून येत आहे, नुकतंच वसीम रिझवी जे शिया बोर्डाचे अध्यक्ष होते त्यांनी देखील इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?