' पांडवलेणी: २५०० वर्षांपुर्वीपासून नाशिकमध्ये जपला जाणारा ऐतिहासिक ठेवा – InMarathi

पांडवलेणी: २५०० वर्षांपुर्वीपासून नाशिकमध्ये जपला जाणारा ऐतिहासिक ठेवा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

इतिहास, मग तो एखाद्या देशाचा असो, संस्कृतीचा असो की एखाद्या ठिकाणाचा, त्याची कहाणी सांगणारे अनेक पुरावे आपल्याला त्याकाळात उभारल्या गेलेल्या विजय स्तंभातून, कोरल्या गेलेल्या शीलालेखातून समजत असतो. तसाच तो समजतो डोंगर, पर्वत आणि त्यांच्या अंगाखांद्यांवर कोरल्या गेलेल्या लेण्यांमधून!

 

ajintha verul leni inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

महाराष्ट्र हा मानवी संस्कृतीच्या प्रगतीचा साक्षीदार आहे. संपूर्ण देशात असणार्‍या एकूण १२०० प्राचीन बौद्ध लेण्यांपैकी तब्बल ६८० लेणी महाराष्ट्रात आहेत. त्यात नाशिकमधल्या ‘पांडव लेणी’ किंवा ‘त्रिरेशमी’ मालिकेतील महत्वाच्या बौद्ध लेण्यांचा समावेश होतो.

रामायणकालीन भूमी म्हणून ओळख असलेल्या नाशिकचा हा इसवी सन पूर्व ठेवा, अजून कोणता इतिहास सांगतो? तब्बल अडीच हजार वर्षांपूर्वी, नाशिकच्या या भागाची गोवर्धन म्हणून ओळख होती, काय आहे यामागील इतिहास ? काय आहे नेमकी या लेण्यांची कहाणी ? सातवाहन साम्राज्य आणि या लेणी यांचा नेमका काय संबंध आहे ? असे अनेक प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

या लेखात आम्ही याच प्रश्नांचा शोध घेण्याचा आणि त्यामागे दडलेली कहाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

गौतमीपुत्र सातकर्णी हा त्याकाळचा भारतातील सर्वात सामर्थ्यवान राजा! त्याच्या उदयाच्या वेळी सातवाहन साम्राज्य क्षीण झाले होते, जुन्नर, नाशिक इ. बहुतांश भाग क्षत्रपांनी गिळंकृत केला होता. गौतमीपुत्राने नहपान क्षत्रपाच्या विरोधात जोरदार आघाडी उघडून नाशिकजवळच्या सह्याद्री रांगांमध्ये त्याचा संपूर्ण पराभव केला. हे युद्ध अतिसंहारक झालेले दिसते कारण यात नहपानाचे संपूर्ण क्षहरात कूळ नष्ट झाले.

 

war inmarathi

मुंबई-पुण्यापेक्षाही भारी असलेल्या “या” शहराबद्दलच्या काही अज्ञात गोष्टी!

गर्दी टाळून पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल, तर या ऐतिहासिक लेण्यांना भेट द्याच!

नहपानाकडून जिंकलेल्या भूप्रदेशाचे वर्णनही लेण्यामधील शिलालेखात देण्यात आलेले आहे. तो प्रदेश म्हणजे अपरांत (उ. कोकण), अश्मक(नांदेड), मूलक(औरंगाबाद, बीड), ऋषिक (खानदेश), विदर्भ, सेटगिरी (जुन्नर), कृष्णागिरी (कान्हेरी), सह्याद्री, कुकुर (आग्नेय राजस्थान), आकारवंती (माळवा), अनूप (मध्यप्रदेश), पारियात्र(अबू पर्वत), सौराष्ट्र, विंध्य, श्रीशैल, मलय, महेंद्र (ओरीसा) इ. या शिवाय कर्नाटक, आंध्र मधील जवळजवळ सर्वच प्रदेश त्याच्या ताब्यात होता.

त्याकाळी त्याच्या इतका सामर्थ्यवान राजा भारतात दुसरा नव्हता. सातवाहन, क्षात्रप आणि अभिर … या एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या ३ राजघराण्यांच्या २५०० वर्ष कालावधीत या लेणी कोरण्यात आल्या आहेत.

खरं तर त्रिरेशमी (Trirashmi) नावानं यांची ओळख असल्याचं, आपला इतिहास सांगतो. या गुंफा पांडवलेणी नावानं परिचित असल्या तरी तब्बल ५०० वर्षपूर्व, बुद्धकालीन इतिहास जीवंत करणारा अमूल्य ठेवा मानला जातो.

ही पांडव लेणी पूर्वी ‘त्रैराष्मी लेणी’ म्हणून संबोधली जात असत. महत्वाचे म्हणजे जरी या लेण्यांना पांडवलेणी असे नाव आहे कारण या ठिकाणी काही काळ पांडव वास्तव्यास होते म्हणून त्यांना पांडवलेणी असे म्हणतात अशी दंतकथा ऐकिवात आहे.

 

pandavleni inmarathi

 

या लेण्यांना पुंड्रू असे संबोधले जायचे. ज्याचा पाली भाषेत अर्थ आहे “पिवळ्या रंगाचा रंग”. कारण लेण्यांजवळ “चिवरा किंवा पिवळे वस्त्र” परिधान करणार्‍या बौद्ध भिक्षूंचे निवासस्थान होते. पुढे, पुंड्रू हा शब्द बदलून पांडू गुहा झाला (प्राचीन स्मारक अधिनियम २६ मे १९०९ नुसार). अनेक दशकांनंतर लोकांनी त्याला पांडव गुहा असे संबोधण्यास सुरवात केली.

लेण्यांमध्ये कोरले गेलेले गौतमीपुत्र सातकर्णीची महती सांगणारे शिलालेख आहेत ज्यांचा महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या शिलालेखांमध्ये समावेश होतो.सातवाहन राजे ब्राह्मण असून वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. गौतमीपुत्र सातकर्णी स्वत:ला येथील शिलालेखात ‘ब्राह्मणनस’ म्हणवतो.

लेण्यांमध्ये केलेल्या कोरीव कामावर बौद्ध संस्कृतीचा प्रभाव दिसत असला तरी प्राचीन काळाच्या ग्रीक, इराण संस्कृतीचे अवशेष देखील इथे ग्रीफीन, स्फिंक्स यासारख्या मूर्तींच्या असण्यामधून आपल्याला दिसतात. त्यांचा पांडवलेणीतील समावेश, प्राचीन काळात पाश्चिमात्यांबरोबर चालत असणार्‍या व्यापाराचा पुरावा दाखवतो.

 

pandavas inmarathi

 

व्यापार्‍यांबरोबरच संस्कृतींमधला प्रवास, आदानप्रदानही इथे अधोरेखीत होते. बुद्धकालीन संस्कार, संस्कृती यांचा सुरेख मिलाप असणाऱ्या या लेणी जरी इसविसनपूर्व ५०० वर्षांपूर्वीच्या असल्या तरी काळाच्या ओघात, सातव्या शतकात या गडप झाल्या. तब्बल 11 शतकं या प्राचीन लेणी, या कातळाच्या पहाडात बंदिस्त झाल्या होत्या.

१८२३ साली ब्रिटिश सैन्यातील, गिर्यारोहणची आवड असलेल्या कॅप्टन जेम्स डेलमाईन याला या लेण्यांचा शोध लागला आणि या लेण्या पुन्हा प्रकाशात आल्या.

सम्राट अशोक काळातील मूळ प्राचीन लेणी आधारावर, या लेण्यांची रचना असल्याचं पुरातत्व खात्याचं म्हणणं आहे. बोधिसत्व पदमपाणी, बोधिसत्व वज्रपाणी यांच्या अप्रतिम मूर्ती, धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेतील भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती, भिक्षुंची साधनागृह, तत्कालीन वीरांच्या मूर्ती, महिलांची आभूषणे, आपला गौरवशाली इतिहास जीवंत करतात.

 

buddha inmarathi

 

सातवाहन, क्षत्राप यासह काही काळ सत्ता असलेल्या अभिर या तिन्ही राजघराण्यातील एकच समान धागा म्हणून या त्रिरेशमी लेण्यातील, अनेक लेण्या आजही साक्षीदार आहेत.

बुध्दस्तुप, भिक्षूंची निवासस्थाने, बुध्दबोधिसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या दगडात कोरलेल्या एकसंध मूर्त्या या अग्रभागी असलेल्या लेण्यात आहे. याच पार्वताच्या माथ्यावर,या २५ लेण्यांच्या मालिकेतील ३ लेण्या, नव्याने येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांना सापडल्या आहेत.मात्र तेथील वाट बिकट असल्याने अजून सहजपणे माथ्यावर जाता येत नाही. तरी लवकरच हा ही मार्ग खुला होईल अशी पर्यटकांना आणि इतिहासाच्या अभ्यासकांना आशा आहे.

आशा अनेक कहाण्या काळाच्या ओघात लपल्या गेल्या आहेत. त्या शोधून, इतिहासाचा हा पुरातन ठेवा जपण्यात, त्याचे संवर्धन करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनीच करायला हवा. 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?