' 3g असो की 4g, मोबाईल डेटाची बचत करण्यासाठी या ६ टिप्स ठरतील उपयुक्त! – InMarathi

3g असो की 4g, मोबाईल डेटाची बचत करण्यासाठी या ६ टिप्स ठरतील उपयुक्त!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या मोठमोठ्या मॉलमधल्या शॉपिंगपासून मार्केटमधल्या भाजीमार्केट खरेदीत सध्या सर्वात जास्त वापरली जाणारी गोष्ट म्हणजे मोबाइल, इंटरनेट आणि ऑनलाइन पेमेंट सिस्टम.

फोनपे, गुगल पे, पेटीएम, भीम अशा सगळ्या अॅप्लिकेशनमधून आपण आजकाल सर्रास सगळे व्यवहार करतो, आणि त्यासाठी सध्या सगळेच ४ जी इंटरनेटचा वापर करतो.

 

online payment inmarathi

 

इंटरनेट ही आजच्या युगातील एक मूलभूत गरज आहे. रोजच्या जीवनातील अनेक गोष्टी आता इंटनेटवर अवलंबून असल्याने त्याशिवाय आयुष्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. हीच बाब लक्षात घेऊन मोबाईल डाटा पॅकचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

त्यामुळे जर आपल्याला महिन्याला मिळणारा डाटा वापरण्याचे आपण नियोजन केले नाही तर आपल्याला जास्तीचा भुरदंड बसु शकतो. म्हणूनच डेटा कमीत कमी वापरायचा याच्या टीप्स आम्ही देणार आहोत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ज्या कंपनीची तुम्ही सेवा घेतली आहे ती कंपनी तुम्हाला ठराविक रकमेसाठी दर महिन्याला ठराविक डेटा वापरण्यास देते. त्याला तुम्ही डेटा Allowance म्हणू शकता. या ठरवून दिलेल्या डेटापेक्षा जर अधिक डेटा खर्च झाला तर मग त्या डेटासाठी तुम्हाला जास्तीचं शुल्क आकरण्यात येतं.

3G आणि 4G मध्ये फरक काय असतो?

3G म्हणजेच थर्ड जनरेशन नेटवर्क हे 4G नेटवर्क पेक्षा थोड हळू काम करतं. 4G नेटवर्कचा स्पीड हा जास्ती असतो. त्यामुळे 3G डेटा पॅक हा 4G पेक्षा स्वस्त असतो.

 

4G inmarathi

 

4G मध्ये तुमचा डेटा लवकर संपतो, अशातला भाग नाही परंतु 4G नेटवर्कचा स्पीड जास्त असल्याने तुम्ही अधिक वेळ वापरता .

डेटा युसेज कमी करण्यासाठी टीप्स खालील प्रमाणे –

१. वाय फायचा जास्तीत जास्त वापर –

 

wifi router inmarathi

 

सगळ्याच स्मार्ट फोनमध्ये वाय फाय वापरण्याची सुविधा असते. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला शक्य असेल त्यावेळी वाय फाय वापरा. एकदा तुम्ही वाय फायला कनेक्ट केलं की डेटा तुमच्या महिन्याचा पॅक मधून न जाता वाय फाय मधून खर्च होतो त्यामुळे तुमची मोठ्या प्रमाणात बचत होते.

२. नोटिफिकेशन्स बंद करा –

 

notifications inmarathi

मेसिंजिग ॲप्स मध्ये बरेचदा नोटिफिकेशन्स चालू ठेवलेली असतात त्यामुळे आलेल्या मेसेजची आपल्याला माहिती होते. परंतु आज काल बरेच ॲप्स हे नोटिफिकेशन्स चालू ठेवून वेळोवेळी कसली तरी आठवण करून देतात.

या सगळ्या मुळे तो ॲप बॅकग्राउंडला चालूच राहतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात डेटा खर्च होऊ शकतो.

३. निर्बंध घाला –

 

power off inmarathi

 

जर तुम्हाला खरंच तुमच्या डेटा पॅकची काळजी असेल तर मग थोड्या वेळासाठी त्यावर पूर्णपणे निर्बंध घाला. म्हणजेच थोडा वेळ डेटा ऑफ ठेवा आणि फोनचा वापर फक्त कॉल घेण्यासाठी आणि करण्यासाठी करा.

४. मर्यादित वापर –

 

mobile data usage inmarathi

 

बऱ्याच मोबाईल फोनमध्ये डेटा युसेजची मर्यादा सेट करता येते. यासाठी तुम्हाला सेटिंग मध्ये काही आवश्यक ते बदल करून घ्यावे लागतील. या प्रकारची सुविधा वापरून तुम्ही डेटा पॅकचा वापर नियंत्रित करू शकता.

५. डेटा रोमिंग बंद करा –

 

data roaming inmarathi

 

परदेशात असताना डेटा नेटवर्कचा वापर हा खूपच खर्चिक होऊ शकतो जर तुम्हाला ते नको असेल तर डेटा रोमिंग बंद करून ठेवा. प्रवासादरम्यान तुम्ही हॉटेल , रेस्टॉरंट अशा ठिकाणी थांबणार असाल तर तिथल्या वाय – फाय सुविधेचा लाभ घ्या.

६. कंटेंट वर लक्ष ठेवा –

 

online streaming inmarathi

 

हाय क्वालिटी (HD) व्हिडिओ मुळे जास्तीचा डेटा वापरला जातो. त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रतीचा कंटेंट पाहता यावर लक्ष ठेवा. नेटफ्लिक्स सारख्या ॲप्सचा जास्त वापर तुमचा डेटा पॅक फटक्यात संपवू शकतो तेंव्हा वापर करताना सजग राहा.

या साध्या सोप्या टीप्स वापरून तुम्ही तुमचा डेटा पॅक खिशाला जास्तीचा भुर्दंड न देता महिनाभर वापरू शकता.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?