' UP च्या निवडणुकांचे अंदाज : मुख्यमंत्रीपदासाठी जनतेने कोणाला दिला कौल?

UP च्या निवडणुकांचे अंदाज : मुख्यमंत्रीपदासाठी जनतेने कोणाला दिला कौल?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नुकतंच काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने आपल्या कारकिर्दीची २ वर्ष पूर्ण केली आहेत. जेव्हा हे सरकार स्थापन झाले होते तेव्हापासूनच विरोधी पक्षाने नाराजीचा सूर लावला होता. सरकार ६ महिन्यात पडेल, वर्षभरात पडेल अशी भाकिते त्यांनी सांगितली मात्र सरकारने दोन वर्ष सत्तेत काढली.

महाविकास आघाडीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कालच एक विधान केले की महाविकास आघाडी हे पुढचेच सरकार असेल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असणार. मात्र महाविकास आघाडीबद्दल जनतेला काय वाटत त्यांचे प्रश्न सुटले आहेत का याबाबत सरकारने कोणते प्रयत्न करत आहे का? हा प्रश्न सगळ्यांनाच पडले आहे.

 

mahavikas aghadi inmarathi

 

महाविकास आघाडीबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचा काय मनात नेमकं आहे हे येत्या निवडणुकीत कळेलच मात्र उत्तर प्रदेशमधील जनता आहे त्या सरकारमध्ये खुश असल्याचे नुकतंच एका सर्व्हेमध्ये दिसून आले आहे. सर्व्हेमध्ये नेमकं काय आहे चला तर मग जाणून घेऊयात…

 

 

सर्व्हेमध्ये पसंती कोणाला?

आज देशभरात काही राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यासाठी सगळे पक्ष देखील सक्रिय झाले आहेत. निवडणुकांच्या आधी असणाऱ्या कार्यक्रमांना देखील सुरवात झाली आहे. प्रत्येक पक्ष जनतेला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासने देत आहेत, अशातच एबीपीसी व्होटर यांनी केलेला सर्व्हे रविवारीच त्यांनी जाहीर केला.

 

survey inmarathi

 

सर्व्हेच्यानुसार भाजपच्या जनतेने आताचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच पसंत केले आहे म्हणजे जनतेने भाजपलाच सत्तेसाठी निवडले आहे. ४३ % लोकांना पुढील मुख्यमंत्री आदित्यनाथ असावेत असं वाटत आहे तर अखिलेश यादव मुख्यमंत्री असावेत असे ३०% जनतेला वाटते.

तब्बल ४ वेळा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या मायावतींना १६% जनतेने पसंत केले आहे, तर काँग्रेसच्या प्रभारी असलेल्या प्रियांका गांधींना अवघ्या ५ % लोकांनी पसंत केले आहे.

 

mayavati-inmarathi
indiatimes.com

 

मागच्या वेळेचा सर्व्हे काय होता?

आज जसे योगी आदित्यनाथ यांना जनतेने पसंती दर्शवली आहे त्याच पद्धतीने मागे घेण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये जनतेने गोगी आदित्यनाथ यांनाच पसंत केले होते. इतर मंडळींच्या बाबतीतली टक्केवारी थोड्याफार फरकानेच पुढे मागे आहे, मात्र दोन्ही सर्व्हेमध्ये बाजी मारली आहे ती योगी आदित्यनाथ यांनीच…

 

yogi adityanath inmarathi

हिंदुत्वादी संकल्पना, कायदे यामुळे ते कायमच चर्चेत असतात तसेच आज मोदींनंतर देशाचे प्रतिनिधीत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे जाळे पसरत आहे, नव्या उद्योग धंद्यांची पायाभरणी केली जात आहे. मात्र दुसरीकडे जातीपातीचे राजकारण, हिंसाचार, पत्रकारांची गळचेपी यासारख्या घटना देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे.

एबीपीसी व्होटरने केलेला हा सर्व्हे केवळ उत्तर प्रदेशमधील जनतेचा मूड नेमका काय आहे यासाठी करण्यात आला होता. यात एकूण ११ हजार ८५ लोकांचा सहभाग होता, याचा कालावधी २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यांत होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?