' शेकडो सुपरहिट गाणी रचणाऱ्या जतीन-ललित ची जोडी का तुटली? – InMarathi

शेकडो सुपरहिट गाणी रचणाऱ्या जतीन-ललित ची जोडी का तुटली?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सामान्य माणसांना असं नेहमी वाटत असतं की, सेलिब्रिटी लोकांचं आयुष्य हे आपल्यापेक्षा वेगळं असतं. सेलिब्रिटी लोकांकडे इतके पैसे असतात की, त्यांचे सर्व प्रश्न चुटकीसरशी सोडवले जात असतात. बहुतांश लोकांच्या घरी असलेले मतभेद, मनभेद हे त्यांच्यात नसतील अशी आपली एक समज असते. पण, प्रत्यक्षात असं नसतं.

‘कहानी घर घर की’ ही सगळीकडेच सुरू असते. ‘जतीन-ललित’ या बॉलीवूडला सुमधुर संगीत देणाऱ्या सख्ख्या भावांच्या घरी असंच घडलं आणि त्यांना आपल्या संगीत क्षेत्रातील करिअरवर पाणी सोडून द्यावं लागलं हे त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल.

 

jatin lalit inmarathi

 

जो जिता वही सिकंदर, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, हम तुम, मोहब्बते, फनासारख्या यशस्वी चित्रपटांना संगीत देणारी ही जोडी १५ वर्ष एकत्र काम करून २००६ मध्ये विभक्त झाली. कारण काय? जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जतीन-ललित हे जन्मतः हरियाणाचे आहेत. संगीताचं शिक्षण त्यांनी आपले वडील पंडित प्रताप नारायण यांच्याकडून घेतलं होतं. पंडित जसराज हे त्यांचे काका आहेत. अभिनेत्री सुलक्षणा पंडित आणि विजयता पंडित या त्यांच्या बहिणी आहेत.

१९९१ मध्ये ‘यारा दिलदारा’ या सिनेमासाठी सर्वप्रथम एकत्र येऊन संगीत दिलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नव्हता. पण, त्या सिनेमातील बिन तेरे सनम हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं.

आजही हे गाणं प्रेक्षकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे. त्यानंतर येस बॉस, खिलाडी, राजू बन गया जेंटलमन, कभी हा कभी नासारख्या सिनेमातून जतीन-ललित यांचं आर डी बर्मन यांची छाप असलेलं संगीत प्रेक्षकांना आवडत गेलं.

kabhi haan kabhi naa khiladi inmarathi

 

जतीन पंडित आणि ललित पंडित यांच्यात संगीत क्षेत्रात असतात तसे ‘कलात्मक मतभेद’ आहेत असं सांगण्यात आलं होतं. पण, बॉलिवूडच्या गॉसिपबद्दल पूर्ण माहिती ठेवणाऱ्या एका वेबसाईटने ही माहिती प्रकाशित केली आहे की, जतीन-ललित यांच्या पत्नींना या दोघांचं एकत्र काम करणं मान्य नव्हतं.

इतर घरांमध्ये होणारे श्रेयवादाचे वाद पंडित घराण्यातसुद्धा होऊ लागले आणि वाद इतक्या विकोपाला गेले की, त्यांना एकत्र काम करणं शक्य होत नव्हतं. व्यक्तिगत आयुष्य इतकं डोईजड झालं की, त्यामुळे दोघांनाही व्यवसायिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करता येत नव्हतं.

२००६ मध्ये सुरू झालेले वाद हे आज १५ वर्षांनीसुद्धा मिटलेले नाहीयेत. सध्या अशी परिस्थिती आहे की, जतीन आणि ललित हे कोणत्याही पार्टीत एकत्र येण्याचं कटाक्षाने टाळत असतात. “तो असेल तर मी नसेल” असं हे दोघं सख्खे भाऊ प्रत्येक आयोजकाला सांगत असतात.

बॉलिवूडच्या कित्येक निर्मात्यांना या गोष्टीचा त्रास झाला आहे कारण त्यांना या दोघांनी एकत्र येऊन संगीत देणं अपेक्षित होतं. पण, ते शक्य नव्हतं.

 

jatin lalit 2 inmarathi

 

दोघांपैकी एकाला बोलावलं तर दुसऱ्या भावाला वाईट वाटायचं आणि त्यामुळे निर्मात्यांनी दोघांनाही टाळण्यास सुरुवात केली. घरगुती कारणांमुळे बॉलीवूडचं आर्थिक नुकसान हे कधीच भरून निघू शकत नाही.

बॉलीवूडसाठी आणि प्रेक्षकांसाठी कायमच विशेष असणारं ‘९० चं दशक’ हे ज्या संगीतकार जोडीमुळे इतकं श्रवणीय झालं ती जोडी परत कधी एकत्र काम करेल याची शक्यता कमी आहे.

नोव्हेंबर २०२० च्या इंडियन आयडॉलच्या सेटवर हे दोघे प्रेक्षकांना शेवटचे एकत्र दिसले होते. तिथे उपस्थित असलेल्या परीक्षक विशाल दादलानी, गीतकार समीर आणि प्रेक्षक सर्वांनीच या दोघांना एकत्र येण्याची साद घातली होती. उपस्थित प्रेक्षकांच्या आग्रहास्तव या दोघांनी एक गाणं गायलं होतं.

 

jatin lalit 3 inmarathi

 

लहान भाऊ ललित पंडितने जतीन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा यावेळी व्यक्त केली होती. पण, मागील एक वर्षात तसं काहीच घडलं नाही.

जतीन-ललित हे एकत्र काम करत नसले तरीही एकमेकांविरुद्ध कुठेच बोलत नाहीत. आपण करिअरच्या सर्वोच्च ठिकाणी असतांना हे मतभेद सुरू झाले याचं शल्य मात्र दोघांच्या बोलण्यातून नेहमीच जाणवतं.

कौटूंबिक वाद बाजूला ठेवून येत्या वर्षात जतीन-ललित या संगीतकाराची जोडी एकत्र येऊन श्रवणीय गाणी तयार करतील अशी आशा करूयात.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?