' मुलांना शिस्त लागावी म्हणून सारखे धपाटे लगावणे अतिशय घातक ठरू शकते!

मुलांना शिस्त लागावी म्हणून सारखे धपाटे लगावणे अतिशय घातक ठरू शकते!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

मुलांना शिस्त लावण्यासाठी किंवा रागात लहान मुलांना सारख्या चापट्या मारण्याची सवय आपल्यापैकी अनेकांना असते. पण बऱ्याच वेळा आपली वडीलधारी मंडळी सांगत असतात की असं उठसुठ मुलाला मारू नये, त्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम (वर्तनात बदल) होईल. बहुतेक जणांचा या गोष्टीवर विश्वास बसतो, तर अनेक जण असेही आहेत जे म्हणतात की हे सर्व थोतांड आहे, असे काहीही होत नाही. जर तुम्हाला ही असंच वाटत असेल की मुलांना मारल्याने काहीही होत नाही, त्यांच्या बुद्धीवर, वागणुकीवर काहीही परिणाम होत नाही तर तुम्ही हे वाचलंच पाहिजे.

beating-child-marathipizza01
zeenews.india.com

मुलांना सतत उठसूट मारल्याने भविष्यात हे मूल तुम्हाला ‘अरे’ला ‘कारे’ असे उत्तर देऊ शकते. त्याचबरोबर त्याची बुद्धिमत्ताही कमी होऊ शकते, असे एका नवीन संशोधनात म्हटले आहे. त्यामुळे जर अशी सवय तुम्हाला असेल तर ती आजच बंद करा.

सारखा मार खाणाऱ्या मुलांचे वर्तन काही दिवसांनंतर बदलते. नंतर केवळ शाब्दिक बोलले तरी त्यांची वागणूक बिघडून जाते. दुसरीकडे अशा मुलांची चांगले काम करण्याची क्षमताही नष्ट होऊ शकते. त्यांचे वर्तन लोकांना विचार करायला लावणारे असते.

आपल्या एका संशोधनातून मिळालेल्या निष्कर्षाच्या आधारावरMcGill University चे developmental psychology expert असणारे डॉ. व्हिक्टोरिया तलवार असे म्हणतात की,

शिस्तीसाठी मारण्याचा पारंपरिक मार्ग अनेक पालकांना श्रेयस्कर वाटत असतो. मूल ऐकत नसले की धपाटा देण्याची सवय पालकांमध्ये दिसून येते. परंतु पालकांनी आपल्या संतापावर नियंत्रण ठेवले पाहिजे. शारीरिक मारहाणीमुळे मुलांमध्ये शिस्तीचे संस्कार रुजत नाहीत.

victoria-talwar-marahipizza01
talwarresearch.com

या संशोधनातून हे देखील स्पष्ट झाले आहे की,

मारण्यामुळे मुले लगेच बिघडतील असे मुळीच नाही. ही गोष्ट केवळ काही दिवसांपुरती ठीक आहे, कारण याचे दीर्घकालीन परिणाम जरूर होऊ शकतात. यातून त्यांचा भावनिक बुद्ध्यांक घटतो. त्यातून त्याला एखादी समस्या कशी सोडवायची याचे कौशल्य शिकता येत नाही. त्याशिवाय चुकीच्या वागणुकीवर मात कशी करायची हेही त्याला शिकता येत नाही. या गोष्टीमुळे त्याचे नुकसान होते.

या अभ्यासासाठी संशोधकांनी ६३ मुलांचे निरीक्षण केले. हे विद्यार्थी दोन खासगी विद्यालयांतील होते. पश्चिम आफ्रिकेतील ही पाच ते सहा वर्षे वय असलेली मुले होती. एका शाळेत मुलांना चुकीबद्दल शारीरिक शिक्षा देण्याची पद्धत होती. दुसऱ्या शाळेत केवळ शाब्दिक शिक्षा होती. यात केवळ मुलांना इशारा देणे अशा शिक्षेचा समावेश होता.

मुलांना शिक्षा दिल्यामुळे त्यांचे वर्तन बिघडू शकते, हे केवळ याच नाही तर अश्या अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

beating-child-marathipizza02
wikihow.com

मुलांनी चांगले वागावे किंवा शिकावे यासाठी पालक अनेकदा त्यांना रट्टे देतात; परंतु मारण्यामुळे मुले शिकत नाहीत. त्याचबरोबर त्यांना कसे वागावे याचीही शिस्त लागत नाही हे आता शास्त्रीयदृष्ट्या स्पष्ट झाले आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?