' काळ आला होता पण…, प्रसंग पवारांच्या हेलिकॉप्टरचा, थरारक प्रवासाचा! – InMarathi

काळ आला होता पण…, प्रसंग पवारांच्या हेलिकॉप्टरचा, थरारक प्रवासाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचे बुधवारी दुपारी विमान अपघातात निधन झाले आणि जणू देशाचा श्वास थांबला. तामिळनाडूत घडलेल्या या दुर्घटनेत रावत यांच्या पत्नी तसेच संरक्षण दलाच्या १२ अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले.

 

bipin 1 inmaathi

 

देशाचे फार मोठे नुकसान झाल्याच्या प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेते, राजकारणी, सेलिब्रिटी या सर्वांनी या घटनेतील वीरांना आदरांजली वाहिली. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपला शोक व्यक्त केला. मात्र याच निमित्ताने खुद्द शरद पवार यांच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या आठवणीही जाग्या झाल्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

नेमकं काय घडलं?

शरद पवार राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत होते तेंव्हाचा हा प्रसंग! एका कामानिमित्त शरद पवार पुण्याहून मुंबईला परतत होते. त्यांच्यासह पत्नी प्रतिभा पवार तसेच एक राज्यमंत्री यांचाही समावेश होता.

 

shsrad pawar inmarathi

 

दुपारच्या वेळेस हेलिकॉप्टर उड्डाण घेतले. त्यापुर्वीच नियमानुसार विमानाच्या सर्व चाचण्या, तपासण्या करण्यात आल्या होत्या. हेलिकॉप्टरमध्ये  कोणताही बिघाड नसल्याची खात्री पटल्यानंतरच पवारांनी प्रवासाला सुरुवात केली.

लोणावळ्यापर्यंत प्रवास सुरुळीत झाला. मात्र त्यानंतर एका व्हॅलीमध्ये हेलिकॉप्टर येताच खराब हवामानामुळे प्रवासात अडथळा निर्माण झाला. सभोवताली दरी आणि आजुबाजुला चारही दिशांनी ढग अशा विचित्र कात्रीत सापडल्याने पायलटही घाबरला. हेलिकॉप्टर ढगात अडकल्याने त्याला समोरची वाट दिसेना.

हेलिकॉप्टरमधील पवारांच्या पत्नी तसेच राज्यमंत्री हे चांगलेच घाबरले. मात्र पवारांनी त्यानंतर जी भुमिका घेतली त्यामुळे सर्वांचेच प्राण वाचले,

”घुसखोरी केल्यास जमिनीत गाडू”: पाकिस्तान्यांना आव्हान देणारे बिपीन रावत यांचा जीनवप्रवास

पवार कायम सत्तेत असते, तर बाबासाहेबांसह त्यांचे संबंध कधीच बिघडले नसते, कारण…

पवारांचे  प्रसंगावधान

एकंदरित खराब हवामान आणि ढगांत बुडलेले हेलिकॉप्टर यांमुळे विमान डगमगत होते. पायलटलाही घाम फुटला. मात्र यावेळी पवारांनी प्रसंगावधान राखले.

स्वतः पायलटशी संपर्क साधत त्यांनी एक महत्वपुर्ण सुचना केली. पवारांनी आपले हेलिकॉप्टर हे समुद्रसपाटीपासून सात हजार फुट उंच नेण्यास सांगितले. यामागील कारण हे होते की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे साडेपाच हजार फुट उंचीवर आहे. त्यामुळे त्यापेक्षाही उंचीवर विमान असेल तर कोणत्याही खराब हवामानात किंवा प्रचंड वाऱ्याचा प्रतिकार करतानाही हेलिकॉप्टर शिखरावर धडकण्याची भिती उरणार नाही.

 

sharad pawar inmarathi

 

पवारांच्या सुचनेनुसार पायलटने हेलिकॉप्टरची उंची गाठली. तरिही वाऱ्याचा मारा, चारही बाजुला दाटलेले ढग ही आव्हानं होतीच, मात्र शिखरावर हेलिकॉप्टर धडकण्याची भिती नसल्याने पायलटने सावकाश, सावधपणे मार्ग काढला. अखेरिस काही मिनिटांनंतर वातावरणात बदल झाला. पायलटला पुढील वाट स्पष्ट दिसू शकली आणि यामुळे अपघात टळला.

हेलिकॉप्टर  यशस्वीरित्या मुंबईत उतरल्यानंतर पवारांनी ही माहिती अधिकाऱ्यांसह माध्यमांनाही दिली होती.

 

sharad inmarathi

 

पवार दाम्पत्यावर काळ आला होता, मात्र वेळ आली नव्हती. त्यामुळेच पवारांचे प्रसंगावधान, अनुभव आणि पायलटचा संयम यांमुळे महाराष्ट्रात एक भीषण अपघात टळला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?