' पाऊस पडण्यापूर्वी ७ दिवस आधीच त्याचा अचूक संकेत देणारं हे अद्भुत मंदिर! – InMarathi

पाऊस पडण्यापूर्वी ७ दिवस आधीच त्याचा अचूक संकेत देणारं हे अद्भुत मंदिर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारत देश एक असा देश आहे जो आश्चर्याने भरलेला आहे. या देशाच्या प्रत्येक राज्यात आणि राज्याच्या प्रत्येक शहराच्या कोनाकोपऱ्यामध्ये काही न काही अदभूत जागा दडलेल्या आहेत.

यातल्या काही अद्भुत जागांमध्ये काही धार्मिक स्थळे सुद्धा आहेत!

आपल्या देशाला मंदिरांचा एक वेगळा इतिहास सुद्धा लाभला आहे, देशातल्या कित्येक मंदिरांच्या मागे काही अद्भुत गोष्टी सुद्धा दडल्या आहेत!

 

DILWARA JAIN TEMPLE-inmarathi02

==

हे ही वाचा : हे मंदिर पाहिल्यानंतर ५०० वर्षांपुर्वीही भारतीयांकडे असलेल्या सौंदर्यदृष्टीची पुन्हा एकदा साक्ष पटते

==

जसं पद्मनाभ मंदिराच्या तळघरातल्या दारवाज्यामागे सापडलेला खजाना आणि आणखीन एक दरवाजा जो उघडला जाऊ शकत नाही, अशी कित्येक रहस्यं अशा बऱ्याच मंदिरांत दडलेली आहेत!

काही रहस्यं ही खरी आहेत, तर काही ह्या फक्त दंतकथा आहेत, पण तरीही आपण भारतीयांनी हा मंदिरांचा वारसा खूप काळजीपूर्वक जपला आहे!

अशीच एक जागा म्हणजे कानपूरच्या जनपथमधील जगन्नाथ देवांचे मंदिर!

जे एका अनोख्या विशेष कारणासाठी प्रसिद्ध आहे. ह्या मंदिराचे वेगळेपण असे आहे की, हे मंदिर पाऊस येण्याची सूचना ७ दिवस आधीच देते.

तुमचा यावर सहजासहजी विश्वास बसणार नाही, पण ही अगदी खरी गोष्ट आहे!

 

jagannath-temple-kanpur-marathipizza01

 

जगन्नाथ देवांचे हे मंदिर कानपूर मधील जनपथच्या भीतरगाव विकासखंड मुख्यालय पासून तीन किलोमीटरवर बेंहटा गावात आहे.

असे म्हटले जाते की, ह्या मंदिराचे हे वैशिष्ट्य आहे, की पाऊस येण्याच्या ७ दिवस अगोदर ह्याच्या छतावरून पावसाचे काही थेंब आपोआप पडायला सुरवात होते.

हे रहस्य जाणून घेण्यासाठी खूप वेळा प्रयत्न करण्यात आले आहेत. पण या मंदिराचे रहस्य पुरातत्व खात्यालाही उलगडता आलेले नाही.

एवढंच नाही, माहित पडले आहे की, मंदिराचा शेवटचा जीर्णोद्धार ११ व्या शतकात झाला होता. त्याच्या आधी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार कधी झाला होता हे अजूनही माहित झालेले नाही.

पाऊस येण्याची माहिती आधीच समजत असल्याने येथील शेतकऱ्यांना मात्र खूप फायदा होतो.

==

हे ही वाचा : भारतीय मंदिरांमध्ये “घंटा” का असते? हे आहे “घंटानादा”मागील अद्भुत शास्त्र…!!

==

jagannath-temple-kanpur-marathipizza02

ह्या मंदिरात भगवान जगन्नाथ,बलदेव आणि बहिण सुभद्रा यांच्या काळ्या दगडाच्या मूर्ती स्थापन आहेत. तसेच सूर्य आणि पद्मनाभम देवांच्या मूर्ती देखील आहेत.

मंदिराच्या भिंती १४ फुट रुंद आहेत. सध्या हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. या मंदिरातून तशीच रथयात्रा निघते जशी पुरी उडीसा मधील जगन्नाथ देवांच्या मंदिरातून निघते.

मान्सूनचा पाऊस येण्याच्या एक आठवड्यापूर्वी ह्या मंदिराच्या गर्भ ग्रहच्या छतातून मान्सूनी दगडातून घनत्वाकारचे थेंब पडतात, जश्या प्रकारचा पाऊस पडणार आहे अगदी तसे. जसा पाऊस सुरु होतो तसा हा दगड सुकून जातो.

 

jagannath-temple-kanpur-marathipizza03

==

हे ही वाचा : केवळ घरातल्या मोठ्यांचा आदेश म्हणून नव्हे तर या कारणांसाठी प्रत्येक भारतीयाने मंदिरात जायलाच हवं

==

मंदिराचा पुजारी दिनेश शुक्ल यांनी सांगितले की,

खूप वेळा पुरातत्व विभाग आणि आईआईटीच्या शास्त्रज्ञांनी येथे येऊन चाचण्या केल्या,परंतु ते मंदिर वास्तविक कधी निर्माण झाले आणि पावसाचा अंदाज वर्तवणाऱ्या थेंबांचे रहस्य काय हे मात्र त्यांना समजू शकले नाही.

मंदिराचा आकार बौद्ध मठाप्रमाणे आहे.

त्यामुळे लोक मानतात की, हे मंदिर सम्राट अशोकाने बनवले असेल, परंतु मंदिराच्या बाहेर असलेल्या मोर आणि चक्र यांच्या आकृती वरून काही लोकांना वाटते कि ह्या मंदिराचे निर्माण सम्राट हर्षवर्धन यांच्या काळात झाले असावे.

कधी कानपूरला भेट दिलीत तर नक्कीच या मंदिराचे दर्शन घ्या!!

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?