' ओमीक्रॉन ६० वर्षांपूर्वीच लोकांच्या नजरेत आला होता का? वाचा यामागचं सत्य! – InMarathi

ओमीक्रॉन ६० वर्षांपूर्वीच लोकांच्या नजरेत आला होता का? वाचा यामागचं सत्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

२०२० वर्षं कोरोना माहामरीमुळे कसं गेलं हे कुणीच विसरू शकणार नाही, जगभरात लागलेला लॉकडाऊन आजारावर औषध किंवा कोणतीही लस सापडत नसल्याने जनमानसात बसलेली कोरोनाची भीती हे सगळं ओसरायला काही काळ उलटला.

यादरम्यान तुम्हाला माहीत असेल की बऱ्याच वर्षांपूर्वी आलेल्या एका कोरियन सिनेमात कोरोना व्हायरसची भविष्यवाणी केल्याचा व्हिडिओ तेव्हा चांगलाच व्हायरल झाला होता. ज्या रोगाने साऱ्या जगात हाहाकार माजवला होता त्या व्हायरसबद्दल आधीच वाच्यता झालेली असल्याने सगळेच बुचकळ्यात पडले होते.

 

corona 2.0 inmarathi

 

आता कोविडचा धोका बऱ्यापैकी कमी झाला आहे, एकंदर सगळीकडेच लसीकरण मोहीम दणक्यात सुरू आहे, तरी काही दिवसांपूर्वी डेल्टा किंवा डेल्टा प्लससारख्या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटने चांगलीच खळबळ माजवली होती त्याचं नाव म्हणजे ओमीक्रॉन!

आता जरी या नव्या व्हेरियंट बद्दल पसरलेले समज गैरसमज दूर झाले असले तरी लोकांच्या मनात त्याबद्दलची भीती अजून कमी झाली नाहीये. पण तुम्हाला माहितीये का की कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटबद्दलसुद्धा आधी वाच्यता झालेली आहे आणि ती देखील एका सिनेमाच्या माध्यमातून!

होय ओमीक्रॉन नावाचे एक नव्हे तर तब्बल २ सिनेमे याआधीच येऊन गेले आहेत, महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा आणि प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी या सिनेमाच्या पोस्टर्सबद्दल त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली.

तर काही महाभागांनी त्या पोस्टरला फोटोशॉपमध्ये एडिट करून त्यात व्हेरियंट हे शब्द टाकून वेगळाच गोंधळ निर्माण केला आहे. ६० वर्षांपूर्वी म्हणजेच १९६३ साली ओमीक्रॉन नावाचा पहिला सिनेमा आला होता.

 

omicron inmarathi

या नावावरून तुम्ही अंदाज बांधला असेल की या सिनेमात कोरोनाविषयी काही भाष्य केले असेल, पण नाही तुमचा अंदाज पूर्णपणे चुकीच ठरू शकतो. या सिनेमात एक एलियन पृथ्वीवर येऊन एका माणसाच्या रूपात तो या पृथ्वीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. या सिनेमाचा कोरोनाशी दुरदूरवर काहीच संबंध नाही!

२०१३ साली आलेला ‘व्हिजिटर फ्रॉम प्लॅनेट ओमीक्रॉन’ नावाचा सिनेमा मात्र या सगळ्याशी थोडाफार मिळता जुळता होता असं आपल्याला म्हणता येईल. या सिनेमात एक एलियन पृथ्वीवर येतो आणि एक जैविक विषाणूची मदत घेऊन संपूर्ण पृथ्वीला वेठीस धरतो असं दाखवण्यात आलं आहे!

आता हा सिनेमा आणि त्यांनंतर याच नावाचा कोरोनाचा व्हेरियंट बाहेर येणं हा निव्वळ योगायोग जरी मानला तरी यावरून सध्या होणाऱ्या चर्चेमुळे लोकं चांगलीच चिंतेत आहेत.

 

omicrone virus inmarathi

 

एकंदरच या सिनेमात दाखवली गेलेली गोष्ट आणि आत्ताची कोविड परिस्थिति जरी वेगळी असली तरी लोकांच्या डोक्याला काहीतरी खाद्य हवंच असतं, ओमीक्रॉनची भीती बाळगण्याचं कारण नक्कीच नाही, पण या अशा सोशल मीडियावरच्या फेक फोटोजमुळे लोकांचा संभ्रम वाढतो हे अगदी खरं आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?