' कुशल युद्धनीती; बिपिन रावतांनी घडवून आणलेला म्यानमार सर्जिकल स्ट्राईक – InMarathi

कुशल युद्धनीती; बिपिन रावतांनी घडवून आणलेला म्यानमार सर्जिकल स्ट्राईक

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काल आपल्या सगळ्यांसाठी एक दुःखदायक बातमी होती ती म्हणजे CDS जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि त्यांच्यासोबत असलेल्या १३ जणांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या जाण्याने पूर्ण देश हळहळला. अगदी अमेरिकेपासून ते तैवानपर्यंत सगळ्या देशांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

भारतीय लष्कराच्या CDS पदावर असलेल्या माणसाचे जाणे हे देशासाठी अत्यंत्य दुर्दैवी आहे, एकेकाळी चिन्यांना, पाकड्यांना वठणीवर आणणारे जनरल बिपीन रावत नेमके कोण होते, त्यांच्या कारकिर्दीतला दोन मोठ्या घटना आज आपण जाणून घेणार आहोत…

 

bipin inmarathi

 

बिपीन रावत :

उत्तराखंडसारख्या भागात १६ मार्च १९५८साली  या पहाडी माणसाचा जन्म झाला. बिपीन रावत यांच्या घराण्याला लष्करी सेवेची परंपरा आहे. त्यांचे वडील देखील भारतीय लष्करात मोठ्या पदावर होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सेंट एडवर्ड स्कुल, राष्ट्रीय रक्षा अकादमी शिमला यासारख्या संस्थांमधून शालेय शिक्षण घेऊन त्यांनी पुढे महाविद्यालयिन शिक्षण घेण्यासाठी मद्रास विश्व् विद्यालयातून एम.फील ची डिग्री पदवी प्राप्त केली होती. त्याच बरोबरीने काळाशी सुसंगत जाण्यासाठी  मॅनेजमेंट आणि कॉम्पुटर क्षेत्रात सुद्धा डिप्लोमा केला होता.

 

bipin inmarathi

 

१९७८ साली त्यांनी भारतीय सैन्य अकादमी डेहराडून मधून ११ गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

सर्जिकल स्ट्राईकची सुरवात  :

आपल्याल सगळ्यांना पाकिस्तानात घुसून केलेला सर्जिकल स्ट्राईक माहिती आहे, त्यावर आलेला URI सिनेमा सुद्धा आपण प्रत्येकाने बघितला असेलच, तो सिनेमा जर आठवत असेल तर त्यात पहिला सीनमध्ये आपल्या सैन्यावर भारत म्यानमार सीमेभागात हल्ला होतो. सिनेमात दाखवलेला हा प्रसंग खरोखरच आपल्या भारतीय सैन्याबाबत घडला होता.

 

strike inmarathi 1

 

भारत पाक सीमेवर जसे सतत काही ना काही घडत असते, त्याचप्रमाणे भारताची ईशान्य बाजू देखील तितकीच संवदेनशील आणि दहशती कारवायांमुळे कायमच चर्चेत असते. २०१५ साली मणिपूरमध्ये झालेल्या दशतवादी हल्य्यात १८ जवान शहीद झाले होते. याला प्रतिउत्तर म्हणून बिपीन रावत यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरा कमांडोंनी म्यानमारमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.

गुप्तचर संस्थेच्या अचूक माहितीमुळे हे मिशन पार पडले. यात दशवाद्यांचे दोन तळ उध्वस्त केले गेले होते. या मिशमध्ये एकूण ७० कमांडो सामील झाले होते, रायफल, रॉकेट लाँन्चर, ग्रेनेड, व्हिजन गॉगल्स असलेले कमांडो दोन गटात विभागले गेले होते.

दशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र दाटजंगलात असल्याने ते नंतर पार करायला तब्बल १५ किमी प्रवास करावा लागणार होता. कमांडोच्या दोन्ही गटांना आपापले काम दिले होते. एका गटाने थेट हल्ला करायचा तर दुसऱ्या गटाने समोरून येणारा गोळीबार रोखून पुन्हा माघारी परतायचे. माहितीनुसार तब्बल ४० मिनिटात हे मिशन आपल्या जवानांनी फत्ते केले होते.

 

strike inmarathi

 

सिनेमात जसे आपण पहिले की जवानांना सुखरूप परत आणण्यासाठी एक हेलिकॉप्टर जसे स्टॅन्ड बाय ला ठेवले होते, त्याचपद्धतीने या मिशनमध्ये सुद्धा I17 नावाचे हेलिकॉप्टर तैनात ठेवले होते. या हल्ल्यानंतर भारत सरकारने म्यानमारला सज्जड दम ही दिला होता.

पाकिस्तानातं सर्जिकल स्ट्राईक :

अनेक वर्ष पाकिस्तानी सैन्य आपल्या सीमेवर कुरापती करतच होत्या, त्यात आपल्याच लष्करच्या बेसवर आंतकवादी हल्ला करून पुन्हा एकदा त्यांनी खुसपट काढले. झोपेत असलेल्या सैनिकांवर हल्ला करणाऱ्या दशवाद्यांना देखील असेच मारले पाहिजे या इराद्यावर पूर्ण प्लॅनिंग केले गेले होते.

भारतीय सैन्याने मध्यरात्री सीमारेषा पार करून जैशचे POK मधले सगळे अड्डे उध्वस्त केले आणि एकही सैनिक शहीद न होता पुन्हा मायदेशी परतला होता, या संपूर्ण घटनेमागे सुद्धा मास्टरमाईंड बिपिन रावतच होते.

 

strike 1 inmarathi

काश्मीरमध्ये ३७० हटवल्यानंतर तिकडचे वातावरण चिघळेल असंही शक्यता असताना देखील बिपीन रावत यांनी कुठल्याही प्रकारचा घातपात होणार नाही याची दक्षता घेतली होती. आतंकवाद्यांनी जर डोके वर काढले की बिपीन रावत यांनी दहशतवाद्यांना पकडून यमसदनी धाडले होते.

आपल्या चोख कामगिरीमुळे आणि कायमच देशाची सुरक्षा हे आद्य कर्तव्य मानणारे बिपीन रावत आज आपल्यात नसले तरी त्यांची कामगिरी नक्कीच प्रेरणादायी आहे, लष्करातले अनेक पुरस्कार देखील त्यांनी मिळाले आहेत.अशा या दिग्गज देशप्रेमीला आमचा त्रिवार सलाम!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?