' आधुनिक यंत्रणा असूनही Mi-17V5 हेलिकॉप्टरचे याआधी सुद्धा झाले होते हे अपघात – InMarathi

आधुनिक यंत्रणा असूनही Mi-17V5 हेलिकॉप्टरचे याआधी सुद्धा झाले होते हे अपघात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज दुपारी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला, या हेलिकॉप्टरमध्ये भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावतही होते. कर्नाटक तमिळनाडू सीमेवरील कुन्नूरजवळ या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.

या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे एकूण १४ लोक होते. हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली. ज्या हेलिकॉप्टरमधून ते प्रवास करत होते, ते Mi-17V5 आहे. हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचं आहे. लष्करी वाहतुकीसाठी या विमानांचा वापर केला जातो.

हा अपघात अतिशय भीषण स्वरूपाचा होता. हेलिकॉप्टरमधून जाणाऱ्या पैकी १४ पैकी १३ जणांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे ANI वृत्तसंस्थेने सांगितले आहे. मृतदेहांची ओळख पटण्यासाठी त्यांची DNA चाचणी करण्यात आली.

दुर्दैवाने या अपघातात संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह पत्नी मधुलिका रावत यांचे निधन झाले आहे.

 

helicopter inmarathi

 

या अपघातामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. खरंतर लष्कर वापरत असलेलं MI-17V5 हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानलं जातं. या हेलिकॉप्टरमधून उड्डाण करण्यापूर्वी हवामान, हेलिकॉप्टरची सुरक्षा या सगळ्या गोष्टी पडताळून पहिल्या जातात. या हेलिकॉप्टरमधून वरिष्ठ अधिकारी प्रवास करत असल्यामुळे सुरक्षा हा या हेलिकॉप्टर्सचा महत्त्वाचा मुद्दा असतो.

या अपघातामागचं कारण अजून नक्की कळालं नसलं, तरीही खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे. भारताप्रमाणे इराण, म्यानमार, इराकसह अगदी अमेरिकेनंही Mi-17 गटातील हेलिकॉप्टर्सचा वापर केला आहे.

२०१९ च्या एप्रिलमध्ये या विमानांच्या देखरेखीसाठी आणि रिपेअरिंगसाठी लष्कराने चंदिगढमध्ये एक सेंटरदेखील स्थापन केलं होतं. या हेलिकॉप्टर्समधील यंत्रणा सुसज्ज आहे. तरीही याआधी या हेलिकॉप्टरचे ३ वेळा अपघात झाले आहेत.

 

helicopter inmarathi

 

२५ जून २०१३ –
या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला होता. उत्तरप्रदेशात आलेल्या पुराचे बचावकार्य चालू असताना MI-17V5 हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. .

६ ऑक्टोबर २०१७ –
हा अपघात अरुणाचल प्रदेशात झाला होता, यामध्ये ७ जण मृत्यमुखी पडले होते.

३ एप्रिल २०१८ –
या अपघातात काहींना किरकोळ दुखापती झाल्या होत्या, सुदैवाने कोणाचा मृत्यू झाला नव्हता. केदारनाथमध्ये MI-17V5 चं क्रॅश लँडिंग यावेळेस करण्यात आलं होतं.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?