' भारतीय लष्कराचं इतकं सुरक्षित हेलिकॉप्टर नेमकं कोसळलं तरी कसं?

भारतीय लष्कराचं इतकं सुरक्षित हेलिकॉप्टर नेमकं कोसळलं तरी कसं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात अपघात नवीन नाही, रस्ते अपघात नवे नाही, जगात चौथ्या क्रमांकाचे रेल्वे जाळे असणाऱ्या आपल्या भारतीय रेल्वेचा देखील अपघात  होत असतात, अनेक इंजिनियर कामगार दिवसरात्र अथक काम करूनसुद्धा असे अपघात होत

Deadliest Train Accidents InMarathi

असतात.

रस्ते, रेल्वे याखेरीज विमान अपघातसुद्धा आपल्या देशात एक मोठी समस्या बनली आहे. नुकतंच CDS जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि इतर १३ जणांचा विमान अपघात तामिळनाडू जवळ कोईम्बतूर भागात कुंन्नूर भागात झाला. एसएम आई १७ -वी५ नावाच्या हेलिकॉप्टरने ते प्रवास करत होते.

 

हेलिकॉप्टरमध्ये नेमके कोण होते?

जनरल बिपीन रावत त्यांची पत्नी ब्रिगेडियर एल एस लीडेर, लेफ्टिनंट कर्नल हरजिंदर सिंग, एन के गुरसेवक सिंग, एन. के जितेंद्र कुमार, L /NK विवेक कुमार, L /NK बी साय तेजा, हवालदार सतपाल इतके प्रवासी त्या हेलिकॉप्टरने प्रवास करत होते. सूत्रांच्या माहितीनुसार बिपीन रावत,त्यांची पत्नी एका कार्यक्रमात सहभागी होऊन पुन्हा दिल्लीकडे परत येत असताना निलगिरी पर्वत रांगामध्ये हा अपघात झाला.

 

bipin inmarathi

 

अपघात नक्की कशाने झाला?

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार खराब हवामानामुळे हा अपघात झाला आहे. अपघात झाला तो भाग दाटीवाटीचा आहे म्हणजे निलगिरी पर्वत रांगेत अनेक निलगिरीचे डौलदार वृक्ष असल्याने हा भाग जंगल प्रकारात मोडतो. दक्षिण भारतातील जंगल जितकी विस्तीर्ण आहेत तितकीच ती दाटीवाटीची आहेत. आतापर्यंत विमानाच्या ढिगाऱ्यातून तीन जणांना बाहेर काढण्यात आले आहे.

 

nilgiri inmarathi

आपत्कालीन बैठक :

रावत यांची बातमी देशात आता वाऱ्यासारखी पसरली आहे. इतका मोठा अपघात झाल्यावर सरंक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तातडीने बैठक बोलवली आहे. राजनाथ सिंग यांनी नरेंद्र मोदींना फोनवरच संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे असे बोलले जात आहे.

 

sing inmarathi

 

भारतीय सेनेतील एक वरिष्ठ व्यक्तीचा अपघात होणे ही  सामान्य बाब नसून या घटनेची चौकशी देखील केली जाईल. खराब वातारवरण असून सुद्धा या हेलिकॉप्टरचे का उड्डाण करण्यात आले हे आता काही दिवसात समोर येईलच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?