' केवळ जातीय तेढ कमी करण्यासाठीच सावरकरांनी मासांहाराचं समर्थन केले होते! – InMarathi

केवळ जातीय तेढ कमी करण्यासाठीच सावरकरांनी मासांहाराचं समर्थन केले होते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल बहुतांश लोकांमध्ये अर्धवट माहिती असल्याचं दिसून येतं. सावरकरांचं साहित्य, लिखाण हे कित्येक वर्ष केवळ मराठी भाषेतच असल्याने सुद्धा असं झालं असावं.

विक्रम संपत सारखे काही गुणी लेखक आहेत जे सावरकरांच्या विचारांना इंग्रजीत उपलब्ध करून देऊन त्यांना जगासमोर आणत आहेत आणि ‘काळाच्या पुढे’ असलेल्या या व्यक्तिमत्वाचा सर्वांना परिचय करून देत आहेत.

 

vikram sampath on savarkar inmarathi

 

हिंदुत्ववादी सावरकरांनी “मांसाहार करावा की नाही ?” या प्रश्नावर सुद्धा आपली मतं स्पष्टपणे आपल्या लेखातून मांडली होती. “प्रत्येक प्राणी, व्यक्तीचा मान ठेवावा. पण, म्हणून मांसाहार करूच नये” असं त्यांचं कधीच मत नव्हतं.

भगवद्गीतेतील एका श्लोकाचा दाखला देत सावरकरांनी ‘मांसाहार’ बद्दल काय मत व्यक्त केलं आहे ? हे जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सावरकरांच्या विचारांमध्ये असलेली सुस्पष्टता ही लेखक वैभव पुरंदरे यांनी ‘सावरकर: द स्टोरी ऑफ द फादर ऑफ हिंदुत्व’ या आपल्या पुस्तकातून मांडली आहे. सावरकरांनी मांसाहराचा विरोध केल्याची कुठेच नोंद नाहीये.

त्यांनी एका लेखातून हा विचार मांडला आहे की, “आपण ब्रिटिशांना गायी वरून हिंदू- मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करण्याची संधी दिली नाही पाहिजे. गाय तर महत्वाची आहेच. पण, आपली एकता ही जास्त महत्वाची आहे. “

 

savarkar on cow inmarathi
thequint.com

वीर सावरकर हे आपल्या मतांवर ठाम असायचे. पण, त्याच बरोबर त्यांच्या विचारसरणीत काळानुरूप बदलणारी एक लवचिकता सुद्धा होती.

“गायींना शोधून त्यांच्यावर अत्याचार करणं चुकीचं आहे. पण, त्याच बरोबर मांसाहार आवडणाऱ्या एखादया व्यक्तीला धर्माचं नाव समोर करून त्यापासून लांब ठेवणं, उपाशी ठेवणं सुद्धा चुकीचं आहे. गायीचं संरक्षण हे देशाच्या, मानवतेच्या संरक्षणाच्या आड येऊ नये. गायींचं संरक्षण करण्यासाठी त्यांना देव मानलंच पाहिजे असं नाहीये.” अशी त्यांची मतं होती. हे विचार १९०५ च्या काळात समाजाच्या विचारांच्या खूप पुढे होतं.

“आहार ही पूर्णपणे वैयक्तिक गोष्ट आहे. त्याला वैयक्तिकच राहू द्यावं.” हे विचार सावरकरांनी लंडन मध्ये गांधीजींना सर्वप्रथम भेटल्यावर सुद्धा सांगितले होते.

 

food inmarathi

 

विनायक दामोदर सावरकरांनी कधीच जातीयवादाचं समर्थन केलं नाही. १९३१ मध्ये ‘सेव्हन शॅकल्स ऑफ हिंदू सोसायटी’ या नावाने लिहिलेल्या लेखात त्यांनी जातीयवादाचा प्रखर विरोध केला होता.

‘आंतरजातीय विवाह’ म्हणजे गुन्हा नव्हे असं मत त्यांनी त्या काळात ठामपणे मांडलं होतं. कोणताही धर्मग्रंथाचा अभ्यास हा केवळ त्या धर्मातील लोकांपुरता मर्यादित असू नये हे त्यांनी कर्मठ लोकांना सांगितलं होतं.

भगवद्गीतेतील ‘चतुर्वर्ण’ संकल्पनेचा दाखला देत सावरकरांनी सांगितलं होतं की, “जर प्रभू श्रीकृष्णाने सर्व प्रकारच्या लोकांना तयार केलं आहे आणि तो त्यांच्या उपजीविकेची जबाबदारी घेत असेल तर त्यांच्यात फरक करणारे आपण कोण आहोत ?”

१९२४ ते १९३७ मध्ये रत्नागिरी मध्ये असतांना सावरकरांनी ‘पतित पावन’ मंदिराची स्थापना केली होती. या मंदिराचं असं वैशिष्ठ्य होतं की, या मंदिरात सर्व जातीच्या, धर्माच्या लोकांना प्रवेश करण्याची परवानगी होती.

 

patit pawan mandir inmararthi

 

समाजातील बहुसंख्य लोकांचा विरोध पत्करून अशी कोणती कृती करणारे सावरकर हे एकमेव स्वातंत्र्य सेनानी होते ज्यांना देशाच्या स्वातंत्र्यासोबतच एक प्रगल्भ समाज निर्माण करण्याची इच्छा होती.

प्रसंगावधान राखून जातीय मतभेद रोखण्यासाठी सावरकरांनी केलेलंमांसाहाराचं समर्थन हे त्यांच्यातील कुशल नेतृत्वाचं दर्शन घडवणारं होतं.

गायींना मान द्या, पण धर्माच्या दडपणाखाली त्यांच्या दूध देण्याच्या धर्माला विसरू नका. हे तर्कशुद्ध विचार त्या काळातील बहुतांश लोकांना कळलेच नाहीत किंवा एका वर्गाने ते विचार कळू दिले नाहीत असं म्हणता येईल.

 

v d savarkar inmarathi

 

“धर्माचा अभ्यास करावा आणि त्यातील आजच्या समाजोपयोगी गोष्टींचं केवळ समर्थन करावं” अशी विचारसरणी असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे आजच्या स्मार्ट पिढीला सुद्धा का आवडतात? हे त्यांचे वरील विचार वाचल्यावर लगेच लक्षात येतं.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?