' म्हणुन कर्नाटक एसटी महामंडळ भारतामध्ये सर्वात जास्त फायद्यात आहे…. – InMarathi

म्हणुन कर्नाटक एसटी महामंडळ भारतामध्ये सर्वात जास्त फायद्यात आहे….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘वाट पाहीन पण एसटीनेच जाईन’, अशी टॅग लाईन असलेली आपली लाल परी गेल्या महिनाभरापासून आपल्याच जागेवर उभी आहे. एसटी कामगारांनी पुकारलेला संप त्यामुळे होणारे प्रवाशांचे नुकसान हा सध्या एका चर्चेचा विषय बनला आहे.

एसटीच्या इतिहासात हा सर्वात मोठा संप आहे, याआधी देखील एसटी संघटनांनी संप पुकारले होते मात्र या संपाची तीव्रता जास्त आहे, संपाचा मुख्य मुद्दा म्हणजे एसटीचे शासनात विलीनीकरण, आज सरकारवर आधीच आर्थिक बोजा असताना त्यात एसटीची भर पडली तर सरकारला चांगलेच जड जाईल.

 

shivshahi-inmarathi
msrtc.com

 

अस्वच्छ एसटी स्टॅन्ड, कमी पगार, भत्ते न मिळणे, सरकारडून मिळणारे अपुरे अनुदान, प्रवाशांची घटती संख्या या आणि अशा अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र आपल्याच शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यात एसटी महामंडळाची परिस्थती याउलट आहे, आज भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटक महामंडळ सर्वात पुढे आहे, नेमकं काय आहे यामागचं कारण चला तर मग जाऊन घेऊयात..

 

msrtc strike inmarathi

 

आज कर्नाटक एसटी महामंडळाचे नेटवर्क मोठया प्रमाणावर आहे. कर्नाटकाचा भौगोलिक भाग बघता प्रामुख्याने घाट माथे, दुर्गम भाग, रेल्वची स्टेशनची कमतरता यामुळे कर्नाटकात रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे साहजिकच एसटीच्या फेऱ्या तिथे जास्त असतात आणखीन काही मुद्दे सविस्तर पाहुयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सतत मिळणारी बक्षिसे :

कर्नाटक महामंडळ आपल्या कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना एकूण दिवसभराच्या उत्पन्नपैकी १.५ टक्के रक्क्म  पगार व्यतिरिक्त देतात. ही पद्धत नक्कीच इतरांपेक्षा वेगळी आहे. तसेच कंडक्टर आणि ड्रायव्हर हे आत्मियतेने काम करत असल्याने बसेस कायमच  क्षमेतेने धावतात. उदाहरण द्यायचे झाले तर पुण्यात ठाण्यात येणाऱ्या कर्नाटक महामंडळाच्या बसेस त्यांचे ड्रायव्हर प्रवाशांना आपुलकीने विचारत असतात.

 

ksrtc inmarathi 1

 

हमखास मिळणारा बोनस : 

ठरविक अंतर विना अपघात गाडी चालवल्यास, स्टाफला बोनस मिळतो तसेच वार्षिक भत्ते, पगार हे वेळेत मिळत असल्याने साहजिकच सर्व स्टाफ मनापासून काम करतात.

 

bonus inmarathi

 

शिस्त :

ज्या प्रमाणे स्टाफला बक्षीस दिले जाते त्याच प्रमाणे त्यांच्या कामावर देखील लक्ष दिले जाते. महामंडळातील इन्स्पेकटर हे काम करतात. स्टाफपैकी कोणी आपल्या कामात जर कुचराई करत असेल तर त्या कर्मचाऱ्याला बडतर्फ केले जाते.

 

ksrtc inmarathi 2
Deccan chronicle

 

इतर मार्गांचा तुटवडा :

वरती म्हंटल्याप्रमाणे कर्नाटकात रेल्वेमार्ग आणि हवाईमार्ग फार कमी प्रमाणात असल्याने प्रवाशांना पर्यायी मार्ग हा रस्तेच असल्याने साहजिकच प्रवाशी बसेसचा मार्ग अवलंबतात. खाजगी बसेसची वाहतूक करणारे फार कमी असल्याने याचा फायदा महामंडळला होतो.

 

highway-inmarathi
dnaindia.com

 

अत्याधुनिक सेवा :

प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन महामंडळाने अत्याधुनिक अशा लक्झरी बसेस सुरु केल्या आहेत. प्रवासी देखील डोळे झाकून या बसेसचा पर्याय निवडतात. आज कर्नाटकात काही राजकीय मंडळींच्या हातात खाजगी बसेस सेवा आहेत, त्यांनी राजकीय दबाव आणून सुद्धा महामंडळाचे महत्व कमी झाले नाही.

 

ksrtc 2 inmarathi

 

 प्रवाशांची सुरक्षितता : 

आज प्रवासी सुरक्षित तर महामंडळ सुरक्षित, त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा विश्वासहर्ता जपणे हे आपले आद्य कर्तव्य महामंडळ मानते. तसेच अनेक प्रवासी सुद्धा महामंडळाशी प्रामाणिक असल्याने ते कायम महामंडळाच्या बसनेच प्रवास करतात.

 

ksrtc 3 inmarathi

मासिक पास सवलत :

आज ज्या प्रमाणे आपले महामंडळ पासची सुविधा देते त्याचप्रमाणे कर्नाटक महामंडळ देखील पासची सुविधा आपल्या प्रवाशांना देते, आता तुम्ही विचार कराल यात काय नवीन तर जे प्रवासी कामानिमित्ताने नजीकच्या शहरात रोज जात असतात, अशांसाठी महामंडळ रोजच्या तिकीट दरात ५० ते ७०% सवलत पासमार्फत देतात.

 

ksrtc 4 inmarathi

 

कर्नाटक राज्य पाहता त्या राज्याच्या आजूबाजूला एकूण ४ राज्ये आहेत, त्यामुळे महामंडळाच्या अनेक बसेस इतर राज्यात देखील जात असल्याने साहजिकच लांब पल्ल्याच्या गाडयांना फायदा देखील तितकाच मिळतो.

२०२० च्या अहवालानुसार उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील महामंडळ ही नफ्यामध्ये आहेत मात्र कर्नाटक महामंडळाने यात बाजी मारली आहे. आज आपली लाल परी नेहमीप्रमाणे धावत नाहीये, कर्मचारी संपावर आहेत, त्यांचा संप लवकरच संपू दे आणि पुन्हा एकदा लाल परी दिमाखात महाराष्ट्रातील रस्त्यावर धावू दे….

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?